Saturday, February 23

Hot News

पुण्यातून लोकसभेसाठी माधुरी दीक्षितला उमेदवारी?

पुण्यातून लोकसभेसाठी माधुरी दीक्षितला उमेदवारी?

पुणे, भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यातून खासदारकीच्या उमेदवार म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पुण्यात पक्षाकडे अनेक सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे पक्ष दीक्षित यांच्या उमेदवारीचा विचार करणार नाही, असे मत भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे. लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. इच्छुकांच्या उमेदवारीच्या चर्चा जोरात सुरू आहेत. विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्यासह पक्षात किमान तीन-ते चारजण इच्छुक आहेत. या पार्श्‍वभूमीवर माधुरी दीक्षित यांच्या नावाची चर्चा दिल्लीतून सुरू झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई भेटीत दीक्षित यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. हा संदर्भ असल्याने दीक्षितांच्या नावाच्या चर्चेला विशेष महत्व आहे. दीक्षित यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर पक्षातील इच्छुकांम
लालबागचा राजा मंडळावर सरकारी अंकुश

लालबागचा राजा मंडळावर सरकारी अंकुश

मुंबई, मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा गणेश मंडळावर आता सरकारी अंकुश लागणार आहे. कार्यकर्त्यांची मुजोरी, व्हीव्हीआयपींची अरेरावी आणि त्यामुळे सर्वसामान्य भाविकांची होणार परवड रोखली जाण्याची शक्यता आहे. धर्मादाय आयुक्तांनी लालबागचा राजा मंडळाच्या विरोधात आलेल्या तक्रारींची दखल घेत एकंदर परिस्थितीची पाहणी केली आणि काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. या निर्णयामुळे लालबागच्या राजावर आता सरकारची नजर असणार आहे. पारदर्शक कारभारासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती दर्शन रांगेबाबात धोरण ठरवणार आहे. तसंच लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात येणाऱ्या पैसे, दागिने आणि मौल्यवान गोष्टींची मोजदाद धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. भाविकांच्या रांगा कशा असाव्यात, कोणाला अग्रक्रम मिळावा किंवा मिळू नये आदी सर्व बाबींवरती धर्मादाय आयुक्तांच्या समितीची नजर राहणार आहे. यामुळे कार्
घरपोच दारुचा निर्णय नाहीच, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

घरपोच दारुचा निर्णय नाहीच, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई, घरपोच दारुची सुविधा सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असल्याचे वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आहे. अशा स्वरुपाचा कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही आणि घेणारही नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मद्यप्राशन करुन वाहन चालवल्याने होणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारने घरपोच दारुची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी प्रकाशित झाले. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर पसरली. राज्य सरकारच्या निर्णयावर अनेक समाजसेवी संघटनांनी आक्षेप घेतला. राज्य सरकार मद्यप्राशनाला प्रोत्साहन देत आहे, अशी टीकाही अनेकांनी केली. उत्पादनशूल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये या निर्णयासाठी सरकार अनुकूल असल्याचे म्हटल्याने राज्य सरकारच्या अडचणीत भर पडली. ज्या पद्धतीने इ-कॉमर्स वेबसाइट इतर वस्त
अब्रु वाचविण्यासाठी आलोकनाथ यांचा नुकसानीचा दावा

अब्रु वाचविण्यासाठी आलोकनाथ यांचा नुकसानीचा दावा

मुंबई, बॉलिवूडचे 'संस्कारी बाबू' आलोकनाथ यांच्यावर प्रसिद्ध निर्मात्या-दिग्दर्शिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर आता आलोकनाथ यांनी विनता नंदांवर कायद्याचा आधार घेत अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. काही दिवसांपूर्वी विनता नंदा यांनी फेसबुक पोस्टद्वारे '20 वर्षांपूर्वी बॉलिवूडमधील एका संस्कारी अभिनेत्याने बलात्कार केला होता' अशा आशयाची पोस्ट केली होती. 'संस्कारी अभिनेता' असे म्हणल्यामुळे संशयाची सुई ही आलोकनाथ यांच्यावर होती. सध्या सर्वच क्षेत्रात #MeTooचे वारे वाहत आहेत. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील अनेक दिग्गज नावे या संदर्भात समोर येत आहेत. विनता नंदा यांच्यानंतर काही इतर अभिनेत्रींनीही त्या आलोकनाथ यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. या पोस्टमुळे माझी मानहानी झाल्याचे सांगत आलोकनाथ यांनी विनता नंदा यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा केला आहे. आलोकनाथ यांनी नंदा यांच्याव
दिग्दर्शक सुभाष घईंवर बलात्काराचा आरोप

दिग्दर्शक सुभाष घईंवर बलात्काराचा आरोप

मुंबई, बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर आता हे प्रकरण चांगलेच पेटले आहे. अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ता हिने आरोप केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांची नावे समोर आली आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावरही आता एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. तनुश्री दत्ताने याविषयात आवाज उठवल्यानंतर अनेक महिलांनी या मोहिमेत सहभागी होत आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांची माहिती दिली आहे. यामध्ये बॉलिवूडमधील संस्कारी बाबू अलोक नाथ, रजत कपूर, कैलाश खेर, विकास बहल यांचा समावेश आहे. सुभाष घई यांच्यावरील आरोपामुळे या यादीत भर पडली आहे. या महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर सुभाष घई यांनी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अमली पदार्थाचं सेवन करुन आपल्यावर बलात्कार केला असे तिने म्हटले आहे. ती म्हणते, सुरुवातीला ते मला गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी घेऊन जात असत. इतकेच नाही तर याठ
आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप

आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप

मुंबई, तनुश्री दत्ता - नाना पाटेकर प्रकरणानंतर इंडस्ट्रीतील अनेक महिलांनी मोठा खुलासा केला आहे. विकास बहल, रजत कपूर आणि कैलास खेर सारख्या कलाकारांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावण्यात आले. हॉलिवूडपाठोपाठ आता बॉलिवूडमध्ये देखील #metoo ही चळवळ सुरू झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे #metoo च्या या चळवळीचे संस्कारी बाबा आलोकनाथ शिकार झाले आहेत. टीव्ही शो 'तारा' ची निर्माती आणि लेखिकेने आलोकनाथ यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने हा खुलासा केला आहे. तिने फेसबुकवर ही पोस्ट लिहीली आहे या पोस्टमध्ये आलोकनाथ यांचं नाव न घेता आरोप केले आहेत. तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, जेव्हा मी 1994 साली 'तारा' या मालिकेसाठी लिहीत होती आणि निर्मीती करत होते तेव्हा माझ्यासोबत शारीरिक दुर्व्यवहार करण्यात आला. या पोस्टम्ये तिने काही अशा गोष्टी लिहील्या आहेत ज्या वाचून तुम्ह
उत्तर भारतीयांनी ठरवले तर, मुंबई बंद पडू शकते : संजय निरुपम

उत्तर भारतीयांनी ठरवले तर, मुंबई बंद पडू शकते : संजय निरुपम

मुंबई, उत्तर भारतीयांनी काम बंद केल्यास मुंबई आणि पर्यायाने महाराष्ट्र ठप्प होईल, असं वादग्रस्त विधान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं आहे. नागपूर येथे उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना निरुपम असे बोलले आहेत, यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात. उत्तर भारतीय माणूसच मुंबई-महाराष्ट्र चालवतो. दूध विकण्यापासून घरकाम करण्यापर्यंत सर्व कामे ही मुंबई आणि महाराष्ट्रात उत्तर भारतीय माणूसच करतो. त्यांनी काम नाही केले तर, कोण करणार? त्यांच्या जीवावरच मुंबई चालू आहे असे निरुपम यांनी सांगितले आहे. निरुपम पुढे म्हणाले की, तुम्ही कुठलेही क्षेत्र सांगा, त्यामध्ये उत्तर भारतीय आहेत. उत्तर भारतीय माणूस कुठलेही काम करु शकतो. सर्व क्षेत्रांमध्ये उत्तर भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे. जर एक दिवस सगळ्या उत्तर भारतीयांनी ठरवलं, तर मुंबईकारांना खायला मिळणार नाही.
पेट्रोलपाठोपाठ डिझेलही चार रुपयांनी स्वस्त होणार : देवेंद्र फडणवीस

पेट्रोलपाठोपाठ डिझेलही चार रुपयांनी स्वस्त होणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल प्रति लिटर पाच रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता डिझेलचे दरही आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारने पेट्रोलवरील कर कमी करताना डिझेलच्या कराला हात लावला नव्हता. त्यामुळे राज्यात पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल फक्त अडीच रुपयांनी स्वस्त झाले होते. याउलट गुजरातसह अनेक राज्यांनी डिझेलही स्वस्त केले. यावरुन काँग्रेससह विरोधकांनी फडणवीस सरकारवर तुफान टीका केली होती. कदाचित याचीच दखल घेत सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. डिझेलही प्रति लिटर आणखी दीड रुपयांनी स्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचे फडणवीस म्हणाले. ‘इंधनांच्या दराबाबत सरकार काहीच करु शकत नाही’, हा पवित्रा धारण केलेल्या केंद्र सरकारने गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलवरील करआकारणीत कपात केली. इंधनावर आकारले जाणारे केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्यात आले असून प्रत
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी स्वस्त

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी स्वस्त

मुंबई, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल पाच रुपयांनी स्वस्त करण्यात आलं आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडून कर कपातीची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता 5 रुपयांनी स्वस्त झालं आहे. उद्यापासून नवे दर लागू होतील अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून इंधनाचे दर कमी करण्यात आल्याची घोषणा केली आहे. केंद्राने जसा अडीच रुपयाचा दिलासा दिला तसाच दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अडीच रुपयांची कपात करावी असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं होतं. त्यानुसार सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील राज्यात पेट्रोल आणि डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त करत असल्याची घोषणा केली. याआधी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इंधनावरील एक्साइज ड्युटी क
सर्वसामान्यांचे कपडे काढून घेणारे मोदी आधुनिक गांधी : राज  ठाकरे

सर्वसामान्यांचे कपडे काढून घेणारे मोदी आधुनिक गांधी : राज ठाकरे

मुंबई, 'सर्वसामान्यांचे कपडे काढून घेणारे मोदी आधुनिक गांधी' असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज  ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर केली आहे. राज यांनी काढलेली व्यंगचित्रे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. ते व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजप सरकारवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. आता त्यांनी गांधी जंयतीच्या पार्श्वभुमीवर एक नवीन व्यंगचित्र रेखाटले आहे. या व्यंगचित्रातून त्यांनी टीकात्मकपणे महात्मा गांधीजींच्या जयंतीचे अभिवादन केलं आहे. या व्यंगचित्रात राज यांनी कापडापासून सूत तयार करणारे गांधींजी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दर्शवले आहेत. नरेंद्र मोदी या व्यंगचित्रात चरखा चालवताना दिसत आहेत. तर नेहमीप्रमाणे मोदींच्या बाजूला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दाखवले आहेत. राज यांनी एकप्रकारे पंतप्रधान मोदींवर टीक