Saturday, July 21

सेक्स लाईफ

९०% भारतीय तिशी गाठण्यापूर्वीच करतात सेक्स

भारतातील ९० टक्के लोक तिशीच्या आतच पहिल्यांदा सेक्स करतात, असे निरीक्षण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनं २०१५-१६मध्ये केलेल्या अभ्यासातून नोंदवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पंधरा वर्षांपेक्षा कमी वय असतानाच सेक्स केल्याचे या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या २५ ते ४९ वयोगटातील १० टक्के महिलांनी सांगितले. भारतात खूपच कमी वयात मुलींची लग्नं लावून दिली जातात. त्यामुळेच पुरुषांच्या तुलनेत येथील मुली कमी वयातच सेक्स करतात, असं भीषण वास्तव या अहवालातून मांडण्यात आलं आहे. ३८ टक्के महिलांनी १८ वर्षांहून कमी वय असताना सेक्स केल्याचे सांगितले. सर्व्हेनुसार, २५ ते ४९ वयोगटातील ५८ टक्के महिलांनी विसाव्या वर्षात पर्दापण करताना पहिल्यांदा सेक्स केले होते, अशी माहिती दिली. हा सर्व्हे करताना देशभरातील लोकसंख्या, आरोग्य, आहार याबाबत माहिती घेण्यात आली. वास्तव समोर आणणं हा या सर्व्हेमागचा हेतू होता. मात्र, देशात अ

कोणत्या वयात करावे सेक्स

तज्ज्ञांप्रमाणे वयाच्या 25 वर्षांनंतर सेक्स करणे सुरक्षित आणि योग्य आहे. तरुणावस्थेत मुलीचा पूर्ण विकास होऊ पात नाही. 15 वर्षांनंतर वयात आल्यावरही हे वय शारीरिक संबंध बनवण्यासाठी योग्य नसतं. तसेच पहिल्यांदा संभोग करणे वेदनादायक असतं म्हणून तरुणावस्थेत हे करणे योग्य नाही. हल्लीचे तरुण सेक्स करणे फॅशन समजतात. आणि सेक्स पार्टनर बनवून स्वत:ला मॉर्डन म्हणवू इच्छितात. पण या सगळ्यात ते विसरतात की यासाठी मानसिक, शारीरिक आणि भावनिक तयारी असली पाहिजे. संभोग केवळ शारीरिक भूक मिटवण्यासाठी नव्हे तर आपसात संबंध मजबूत करण्यासाठी केलं पाहिजे. सेक्स सुरू करण्यासाठी योग्य वय: तज्ज्ञांप्रमाणे सेक्स करण्यासाठी योग्य वय आपल्या समजदारीवर अवलंबून आहे. कारण सेक्स करणे म्हणजे केवळ इंटरकोर्स नव्हे तर भावनिक, विचार, संवेदना आणि विश्वास समजून घेणे आहे. एक सर्व्हेप्रमाणे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये सेक्स करण्याची इच्

पुरुषांना का आवडतात भरलेल्या, वळणदार देहाच्या स्त्रिया

अंगाने भरलेल्या स्त्रिया फॅशनचा भाग नसल्या तरी पुरुषांच्या डोळ्यांत त्या सामावून जातात. रँपवर वॉक करण्‍यार्‍या सुपर मॉडल्स फॅशनेबल वाटत असल्यास तरी बेडवर पुरूष सेक्सी स्त्री म्हणून वळणदार देहाच्या स्त्रियांचे स्वप्न बघतात. होय, हे खरं आहे की पुरुषांना कर्व आवडतात. त्यामागील कारणं जाणून घ्या :- * संशोधनात कळून आले आहे की भरलेल्या देहाची स्त्री बघितल्यावर पुरुषांमध्ये उत्तेजना जागृत होते. या उत्तेजनाचे स्तर अगदी एखाद्या व्यसनानंतर झालेल्या नशाप्रमाणे असतो. * शोधाप्रमाणे 10 मधून 8 पुरुषांना वळणदार आणि भरलेल्या देहाच्या स्त्रिया आवडतात. अनेक लोकांप्रमाणे प्लस साइज असलेल्या स्त्रिया अधिक आकर्षक असतात. या सर्व्हेत 20 ते 50 वयाच्या पुरुषांनी भाग घेतला होता. *दुबळ्या स्त्रियांच्या तुलनेत भरलेल्या देहाच्या स्त्रिया प्रजननासाठीही फिट असतात. या कारणामुळेही त्या पुरुषांना अश्या स्त्रिया आकर्षित कर

सावध रहा! सेक्सदरम्यान होऊ शकता जखमी

सेक्स दोन लोकांना शारीरिक आणि मानसिक रूपानेही जुळण्यासाठी मदत करतं. परंतू कधी कधी असे काही घडतं जे आपल्या सेक्स अनुभवाला प्रभावित करतं. जसे जखम होणे. आता आपण विचार कराल की सेक्स सारख्या सुखद क्षणांमध्ये जखम कशी होऊ शकते? पण कधी-कधी उत्तेजित होऊन एक लहानशी चूक आणि आपण जखमी होऊ शकता. कोणत्या परिस्थिती जखमी होण्याची शक्यता वाढते आणि आपण त्यापासून कसे वाचू शकतो जाणून घ्या: बॅकपेन - सेक्स दरम्यान कंबर लचकणे सामान्य बाब आहे. अनेक लोकांना विभिन्न मुद्रेत सेक्स करायला आवडतं. परंतू ओव्हर एक्ससाइटमेंटमध्ये लव सेशनऐवजी पेन सेशन होऊन बसतं. या वेदनेतून बाहेर पडण्यासाठी बर्फाने पाठ शेकावी. योनीत जखम - सेक्स दरम्यान योनीत स्क्रॅच येणे किंवा कट लागणे सामान्य आहे. परम आनंद प्राप्त करण्यासाठी जेव्हा महिला अपेक्षाकृत अधिक वेदना सहन करतात तेव्हा ही स्थिती होऊ शकते. अनेकदा या दरम्यान योनीतून रक्तस्त्राव हो

कंडोम वापरणाऱ्या अविवाहित महिलांचं प्रमाण वाढलं

भारतात अविवाहित महिलांमध्ये कंडोम वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. आरोग्य विभागाने नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षणात ही गोष्ट पुढे आली आहे की, लग्नाआधीच कंडोमचा वापर करणाऱ्या महिलांचं प्रमाण ६ टक्क्यांनी वाढलं आहे. मागील १० वर्षांमध्ये अशा महिलांचा आकडा  2 टक्क्यावरुन १२ टक्करे झाला आहे. हा सर्वे १५ ते ४९ वर्षांच्या मधील अविवाहीत महिलांमध्ये करण्यात आला. सर्वेमध्ये हे समोर आलं आहे की, सर्वात अधिक कंडोम वापरणाऱ्या महिला २० ते २४ वर्षांच्या मध्ये आहे. या सर्वेमध्ये हे देखील समोर आलं आहे की, ८ मधील ३ पुरुषांचं असं मत आहे की, कॉन्ट्रासेप्शनची काळजी घेणं हे महिलांचं काम आहे. पुरुषांना याची काळजी करण्याची गरज नाही. सर्वे रिपोर्टनुसार १५ ते ४९ वर्षाच्या मधील देशातील ९९ टक्के जोडप्यांना फक्त १ टक्केच गर्भनिरोधकबद्दल माहिती असते. देशातील १५ ते ४९ वर्षातील विवाहित महिलांमध्ये कॉन्ट्रसेप्टिव प्रिवलेंस रेट

यामुळे लग्नापूर्वी शारीरिक संबंधासाठी तयार होतात मुली

लग्नापूर्वी शारिरीक संबंध हा विषय अजूनही आपल्या समाजामध्ये सहज मान्य होईल असा नाही. पण तसे असले तरी तसे काही घडतच नाही असेही नाही. शहरांमधील लोकांची मानसिकता मोठ्या प्रमाणावर बदललेली पाहायला मिळते. तसेच नोकरी करणारे तरुण तरुणीदेखिल स्वतंत्र विचार करू लागले आहेत. त्यामुळे ही गोष्ट किमान शहरांमध्ये तरी अगदीच अमान्य अशी राहिलेली नाही. हळू हळू त्याचे प्रमाण वाढत असल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये समोर आले आहे. यामागे कारणे मात्र अनेक आहेत. आपल्या समाजामध्ये पुरुषांना किंवा मुलांना अशा गोष्टीसाठी थेट कोणी प्रश्न विचारत नाही. पण मुली मात्र तसे करू शकत नाही, अशी आपल्या समाजाची मानसिकता आहे. मुलींनी विवाहापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे म्हणजे तर अगदी गुन्हा मानला जावा असे असते. पण तरीही काही मुली तसे करतात, पण त्यामागची नेमकी कारणे काय असतात हे लक्षात घेणे गरजेचे आहे. प्रियकरासाठी, तो म्हणतो म्हणून -

सेक्स लाईफ बोर झालाय? तर अमलात आणा हे 5 टिप्स

सेक्स लाईफमध्ये आधी-आधी सर्व छान आणि सुखद वाटत असलं तरी नंतर ती केवळ एक ड्यूटी किंवा एकमेकाला खूश करण्याचा माध्यम मात्र होऊन बसतं. सेक्स लाईफ बोर होऊ लागतं. पुरुषांमध्ये ही समस्या अधिक‍ दिसून येते. कारण लग्नानंतर कौटुंबिक जबाबदार्‍यांमुळे स्त्रिया यावर हवं तेवढं लक्ष देऊ पात नाही. परंतू सेक्स लाईफला जीवनातील आवश्यक भाग बनवणे गरजेचे आहे. यासाठी तसे वातावरण निर्मित करावं लागतं. यासाठी काही सोपे टिप्स वाचा... * सर्वात आधी घरा स्वच्छ ठेवा. घरातील लाइट्स आणि फाउंटेन (असल्यास) संध्याकाळी ऑन करा. घरात रूम फ्रेशनर स्प्रे करा. बेडवर स्वच्छ चादर घाला. ज्याने संध्याकाळपासूनच स्वच्छ, सुं‍गधित वातावरण निर्मित होतं. * अनेक स्त्रिया काही काळ पार पडल्यावर गबाळ्यासारख्या राहिल्या लागतात. नेहमी टिप टॉप राहावे. व्यवस्थित कपडे, हलका मेकअप, केस आवरलेले असावे. * शारीरिक सुगंधावर लक्ष देण्याची गरज आहे. दि

या गोष्टी करतात अपोटिज सेक्सला आकर्षित

आपल्या अनेकदा हा विचार डोक्यात येत असेल की त्या व्यक्ती असे काय आहे की लोकं त्याच्याकडे सहज आकर्षित होतात. अनेकदा समोरच्यात काही विशेष दिसत नसलं तरी अपोजिट सेक्स त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसून येतात. तर बघू अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या वि‍परित लिंगला त्याच्याकडे खेचून नेतात. * एक शोधाप्रमाणे सुंदर चेहर्‍या प्रती लोकं सहज आकर्षित होतात. सुंदर आणि आकर्षक चेहरा पहिल्या नजरेतच लोकांना आपलंस करून घेतं. * शारीरिक शेप महत्त्वाचं ठरतं.‍ शोधप्रमाणे लोकं विपरित लिंगच्या शरीराला नोटिस करतात. समोरच्याचा शरीराचा आकार शेपमध्ये असल्यास फीचर्सकडे दुर्लक्ष केले तरी आकर्षण निर्माण होऊन जातं. * विपरित लिंगाचे तरूण, फ्रेश आणि निरोगी असणे हेही आकर्षणाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. * आवाज आणि हाव-भावही लोकांना आकर्षित करतं. मुलींचा मधुर आवाज तर मुलांचा टफ आवाज हे आकर्षणाचे बिंदू आहेत. * मॉर्डन युगात क

काय असतं हे आकस्मिक संभोग?

आकस्मिक संभोग म्हणजे अॅक्सीडेंटल ऑर्गेज्म हे आपण पहिल्यांदाच ऐकले असेल कदाचित पण अनेक महिलांना हे नक्की काय हे माहीत नसेल. महिलांप्रमाणे आकस्मिक संभोग होऊच शकत नाही. परंतू सत्य वेगळंच आहे. अनेक महिलांच्या जीवनात ही स्थिती येते पण त्यांना याची जाणीव होत नसावी. आकस्मिक संभोग कधीही आणि केव्हाही होऊ शकतं परंतू याबद्दल विचार करत राहिला तर हे आकस्मिक राहणार नाही. बघू याबद्दल काही तथ्य: आकस्मिक संभोग होण्यामागे दोन कारणं असू शकतात. पहिला शारीरिक घर्षण आणि दुसरं भावनात्मक. प्रत्येक महिलेचं चरम सुख प्राप्तीचं मार्ग वेगळं असू शकतात. कोणी शारीरिक तर कोणी मानसिक तर कोणी भावनात्मक मार्गातून चरम सुख गाठतं. सेक्सची आवड यावर खूप काही अवलंबून असतं. हे कशाप्रकारे शक्य आहे: गुप्तांग घर्षण: जर महिलेने असे कपडे घातले आहे ज्यात गुप्तांगात घर्षण होत असेल किंवा स्कूटर चालवताना घर्षण होत असल्यास आकस्मिक

जास्त सेक्स करा, आजार पळवा!

जास्तीत जास्त सेक्स केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते असा दावा एका अभ्यासाअंती करण्यात आला आहे. सेक्समुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही टळू शकतो, असेही या संशोधकांचे म्हणणे आहे. हार्वर्ड टी. एच. चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ च्या संशोधकांनी हा शोध लावला आहे. महिन्यातून किमान 21 वेळा वीर्यस्खलन करणार्‍या 20 वर्षीय तरूणाचा प्रोस्टेट कॅन्सरचा धोका 19 टक्क्यांनी कमी होतो तर 40 वर्षीय व्यक्तीच्या बाबतीत हेच प्रमाण 22 टक्के इतके आढळले, असे संशोधकांचे म्हणरे आहे. सेक्स करताना आणि नंतर बराच वेळ तुमचा मेंदू नोरपाइनफ्रिन, सेरोटॉनिन, ऑक्सिटॉसिन आणि वॅसोप्रेसिनचे उत्सर्जन करत असतो. त्यामुळे आपल्याला परमोच्च आनंदाची अनुभूती होते. विशेषत: या सर्वाचा परिणाम म्हणून निवांत झोप लागण्यासही मदत होते. सेक्स केल्याने तणावही आपसूक दूर होतो, असा निष्कर्षही या संशोधनातून काढण्यात आला आहे.