Saturday, February 23

विदेश

नवाज शरीफ यांना न्यायालयाचा दिलासा

नवाज शरीफ यांना न्यायालयाचा दिलासा

कॅनडा येथील धर्मगुरू तहिरुल कादरी यांच्या सहत्यांच्या 14 समर्थकांच्या हत्या केल्याच्या प्रकरणी सुनावणी घेण्यात यावी, यासाठी मागणी करणारी याचिका दहशतवादविरोदी न्यायालयाने फेटाळली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासह त्यांचा भाऊ पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शणीफ आणि अन्य काहींचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे बोलले जाते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवाझ शरीफ यांना दिलासा मिळाला आहे. या गुन्ह्यात शरीफ बंधूंबरोबच पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान आणि सरंक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांच्यासह इतर 12 उच्च पदस्थ सरकारी अधिकार्‍यांवर लाहोर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शावना पंड्या ठरणार अवकाशात जाणारी तिसरी भारतीय वंशाची महिला

शावना पंड्या ठरणार अवकाशात जाणारी तिसरी भारतीय वंशाची महिला

टोरांटो - कॅनडामधील शावना पंड्या (वय 32) हिची सिटिझन सायन्स ऍस्ट्रोनॉट कार्यक्रमाअंतर्गत अवकाशमोहिमेमध्ये निवड झाली आहे. 2018 मध्ये ती अवकाशात उड्डाण करणार आहे. शावना पंड्याची या अवकाशमोहिमेसाठी निवड झाल्याने कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांच्यानंतर अवकाशात जाणारी ती तिसरी भारतीय वंशाची महिला ठरणार आहे. या मोहिमेसाठी अर्ज केलेल्या कॅनडामधील 3200 जणांमधून शावना आणि आणखी एकाची निवड झाली आहे. शावना ही कॅनडामधील अल्बर्टा येथे न्यूरोसर्जन आहे. ती मूळ मुंबईची असून आपल्या व्यवसायाव्यतिरिक्तही तिने अनेक आव्हानात्मक अभ्यास केले आहेत. ती तायक्वांदोमध्ये निष्णात असून फ्रेंच, स्पॅनिश आणि रशियन या भाषाही तिला अवगत आहेत. तिने आंतरराष्ट्रीय अवकाश विद्यापीठातून अवकाशशास्त्रात एमएस्सी केले आहे. 'आपणा साऱ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी धन्यवाद. मी नासामध्ये काही काळ काम केले आहे. माझा अवकाश औष

८९ वर्षांच्या सर्जन, दिवसाला करतात ४ सर्जरी

८९ वर्षांच्या सर्जन, दिवसाला करतात ४ सर्जरी रशियातल्या एका रुग्णालयात काम करणा-या ‘आल्ल्या लेव्हूस्किना. वय ८९ वर्ष. पण आजही या रुग्णालयात दिवसाला किमान चार तरी सर्जरी त्या करतात. वयाच्या ८९ व्या वर्षी अनेक वृद्ध माणसे आरोग्याच्या वेगवेगळ्या समास्यांनी ग्रासलेले असतात पण, या आजी मात्र त्याच उमेदीने रुग्णालयात येतात आणि शस्त्रक्रिया करतात. माणसाजवळ असलेलं ज्ञान कधीच संपत नाही. जस जसे वय वाढत जाते तसा अनुभव आणखी दांडगा होत जातो. आल्ल्या यांच्याकडे पाहिले तर याची प्रचीती येईलच. १९५० पासून त्या शस्त्रक्रिया करत आहेत. आजही मॉस्कोमधल्या रुग्णालयात त्या नियमित येतात. दिवसाला ४ शस्त्रक्रिया करतात. आल्ल्याने केलेल्या शस्त्रक्रिया कधीच अपयशी झाल्या नाहीत हेही त्यांचे वैशिष्ट्ये आहे. डॉक्टर हे देवाचे दुसरे रुप असते असे अनेक जण मानतात म्हणूनच आल्ल्यांना देवाचे दुसरे रुपच मानतात. आजही आल्ल्या त्याच
डोनाल्ड ट्रम्पला न्यायालयाचा झटका ; प्रवेशबंदीचा निर्णय ठरविला रद्दबातल

डोनाल्ड ट्रम्पला न्यायालयाचा झटका ; प्रवेशबंदीचा निर्णय ठरविला रद्दबातल

वॉशिंग्टन, मुस्लमी बहुल राष्टांवर अमरिकात प्रवेशबंदीचा जारी करण्यात आलेला आदेश रद्दबादल करण्यात आला आहे. वॉशिंग्टनच्या एका न्यायालयाने  राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णय रद्द केला आहे. न्यायाधिशांच्या  या निर्णयावर ट्रम्प भडकले असून त्यांनी तो पुन्हा बदलण्यात येणार  असल्याचे सांगितले. अमेरिकातील प्रवेशबंदीचा निर्णय रद्द करत सिएटलच्या न्यायालयाने  ट्रम्प यांनी झटका दिला आहे.  या पूर्वी शुक्रवारी बोस्टन न्यायालयानेही ट्रम्प यांचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले होते. मात्र, वाशिंग्टन न्यायालयाचा आदेश संपूर्ण अमरिकेत लागू झाला आहे. दरम्यान, हा निर्णय पुन्हा लागू करण्यासाठी व्हाइट हाऊस कडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दुसीकडे ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डबल्यू बुशद्वारा नियुक्त केलेले अमरिकी जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश जेम्स  रांबर्ट यांची खिल्ली उडविली आहे. याबाबत त
अफगानिस्तानात हिमस्खलनामुळे 100 हून अधिक लोकांचा मृत्यू, भारतात अलर्ट

अफगानिस्तानात हिमस्खलनामुळे 100 हून अधिक लोकांचा मृत्यू, भारतात अलर्ट

काबूल : अफगानिस्तानमध्ये हिमस्खलन लोकांवर कहर करत आहेत. यामध्ये आतापर्यंत 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकाच गावातील 50 लोकांचा यामध्ये समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानमध्ये हिमस्खलनमुळे 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात जम्मू-कश्मीर आणि हिमाचल प्रदेशमधील काही भागात देखील हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. अफगानिस्तानमध्ये हिमस्खलनामुळे तीन दिवसात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात घरांचं आणि रस्त्याचं नुकसान झालं आहे.
समुद्राच्या पाण्यापासून स्वस्तात पेयजल, चैतन्यचा अभिनव शोध

समुद्राच्या पाण्यापासून स्वस्तात पेयजल, चैतन्यचा अभिनव शोध

सॅन फ्रान्सिस्को : भारतीय वंशाच्या अमेरिकन विद्यार्थ्याने एक अभिनव शोध लावला आहे. समुद्राचं खारं पाणी पेयजलात बदलण्याचा सर्वात स्वस्त आणि सोपा उपाय चैतन्य करमचेडूने शोधून काढला आहे. उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचं लक्ष या युवा संशोधकाने वेधलं आहे. ओरेगनमधील पोर्टलँडमध्ये राहणारा चैतन्य माध्यमिक शाळेत शिकतो. चैतन्यने केलेल्या विज्ञानाच्या एका प्रयोगाने अवघ्या देशाचं लक्ष त्याच्याकडे लागलं आहे. ‘माझ्याकडे जगाला बदलवणारी मोठी योजना आहे. प्रत्येक आठ व्यक्तींमागे एकाला पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही. ही एक गंभीर समस्या असून ती दूर करण्याची गरज आहे. पृथ्वीचा जवळपास 70 टक्के भाग समुद्राने व्यापला आहे. मात्र त्यात खारट पाणी आहे. हे पाणी पिण्यायोग्य बनवण्याचा उपाय खूपच महागडा आहे. हाच या मार्गातला मोठा अडथळा आहे’ असं चैतन्यने सांगितलं. ‘शोषून घेणाऱ्या उच्च दर्जाच्या पॉलिमरसोबत मी हा प्
कुवेतकडून पाच देशांच्या नागरिकांना विसा देण्यास नकार

कुवेतकडून पाच देशांच्या नागरिकांना विसा देण्यास नकार

कुवेतने पाच देशांच्या नागरिकांना विसा देण्यास नकार दिला आहे. यात सीरिया, इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण या देशांच्या नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील शुक्रवारी सात मुस्लिम देशांच्या नागरिकांच्या अमेरिकेत येण्यावर बंदी घातली होती. ‘ज्या देशांवर बंदी घातली गेली आहे, त्या नागरिकांनी विसासाठी अर्ज करु नये. या देशांच्या माध्यमातून दहशतवादी आमच्या देशात प्रवेश करु शकतात, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही पाच देशांच्या नागरिकांना प्रवेशबंदी करत आहोत,’ असे कुवेतने म्हटले आहे.