Saturday, August 18

विदेश

7 वर्षीय मुलीनं नोकरीसाठी लिहिलं गुगलला पत्र, पिचाईंनी दिलं उत्तर

7 वर्षीय मुलीनं नोकरीसाठी लिहिलं गुगलला पत्र, पिचाईंनी दिलं उत्तर

वॉशिंग्टन, दि. 16 - जगातील सर्वात आघाडीची कंपनी म्हणून गुगल परिचित आहे. गुगलमध्ये नोकरीसाठी अनेक संधी उपलब्ध असतात. तसेच गुगल नुकसानभरपाई पॅकेज, भत्त्यासह अनेक सुविधा कर्मचा-यांना देत असल्यामुळेच गुगलसोबत काम करण्याची अनेकांची इच्छा असते. गुगलकडे हजारोंहून अधिक नोकरीसाठी दररोज अर्ज येत असतात. मात्र या हजारो लोकांमध्ये एका 7 वर्षांच्या मुलीनंही गुगलला पत्र लिहून नोकरी करू इच्छिते, असं कळवलं आहे. विशेष म्हणजे क्लो ब्रिजवाटर या मुलीनं इतर कोणात्याही विभागाऐवजी थेट गुगलच्या सीईओंनाच पत्र लिहिलं आहे.   पत्रात ती म्हणते, प्रिय गुगल मालक, माझं नाव क्लो आहे आणि मी जेव्हा मोठी होईन त्यावेळी मला गुगलमध्ये काम करण्याची इच्छा आहे. मला संगणक फार आवडतात. माझ्याकडे टॅबलेट असून, मी त्याच्यावर गेम खेळते. माझे शिक्षक माझ्या आई-वडिलांना मी अभ्यासात हुशार असल्याचं सांगतात. मी बिन बॅगवर
इराणला अण्वस्त्रसज्ज बनु देणार नाही: ट्रम्प

इराणला अण्वस्त्रसज्ज बनु देणार नाही: ट्रम्प

वॉशिंग्टन - इराणबरोबर झालेला आण्विक करार हा अमेरिकेने आत्तापर्यंत केलेला सर्वांत वाईट करार असल्याचे मत व्यक्त करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "इराणला अण्वस्त्र तयार करण्यात कधीही यश येणार नाही,' असे आश्‍वासन इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना दिले आहे. "इस्राईलसमोर असलेली सुरक्षाविषयक आव्हाने प्रचंड आहेत. या आव्हानांमध्ये इराणच्या आण्विक महत्वाकांक्षेचाही अर्थात समावेश आहे. इराणविषयक करार हा मी आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्वांत वाईट करारांपैकी एक आहे. आम्ही इराणवर याआधीच नवे आर्थिक निर्बंध लादले आहेत. इराणला अण्वस्त्र बनविण्यात यश येऊ नये, यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करु,'' असे ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना आश्‍वस्त करत म्हटले आहे. नेतान्याहू हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे याआधीचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे इस्राईलसंदर्भातील धोरण वादग्रस्त
ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरचं पुढचं टार्गेट भारत?

ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरचं पुढचं टार्गेट भारत?

नवी दिल्ली, दि. 13 - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या व्यापार धोरणांपासून भारत, इंडोनेशिया, मलेशिया आणि व्हिएतनाम काहीसे बचावले असले तरी येत्या काळात त्या देशांवरही ट्रम्प यांची वक्रदृष्टी पडण्याची शक्यता आहे. अमेरिका या सर्व देशांशी व्यावसायिकरीत्या तोट्यात आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमेरिका 12 देशांच्या पॅसिफिक पार्टनरशिपमधून बाहेर पडला. त्यानंतर त्यांनी जपान, चीन आणि साऊथ कोरियाच्या ट्रेड पॉलिसीवर हल्लाबोल केला होता. तसेच अमेरिका कराच्या सुधारित धोरणानुसार आयातीवर कर लावू शकतो. ट्रम्प यांच्या संरक्षणात्मक धोरणांवर अनेक देशांनी चिंता व्यक्त केली असून, ग्लोबल अर्थव्यवस्थेच्या विकासावर त्याचा परिणाम होणार आहे. अमेरिका व्यापाराच्या दृष्टीनं तोट्यात असलेल्या देशांबाबत धोरणांमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ट्रम्प यांचे नॅशनल ट्रेड काऊन्सि
जगातील सर्वांत लांब कार

जगातील सर्वांत लांब कार

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एकाने जगातील सर्वांत लांब कार तयार केली आहे. सामान्य कारची लांबी सरासरी १६ फूट असते आणि ती चार चाकांवर धावते; परंतु या कारची लांबी ११० फूट असून, तिला तब्बल २4 चाके आहेत. ही कार रस्त्यावर धावताना वेगळेपणामुळे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. कॅलिफोर्नियाचे कस्टम कार गुरू जे आर्हबर्ग यांना कारच्या रुपड्यात बदल करून ते अधिक उठावदार करण्याचा छंद आहे. त्यांनीच ही कार तयार केली. ‘द अमेरिकन ड्रीम’ असे या कारचे नाव आहे. जगातील सर्वांत लांब लिमोजिन म्हणून ती ओळखली जाते. या कारची ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली आहे. २७.१ कोटी रुपये मोजण्याची तयारी असेल, तर तुम्ही ही कार आपल्या घरी आणू शकता. लांबीशिवाय ऐषोआराम, स्टाईल आणि सुरक्षेबाबत ती इतर अव्वल कार्सच्या तोडीस तोड आहे. या कारमध्ये काय नाही. शाही बाथटब, डायव्हिंग बोर्ड, किंग साईज वॉटर बेड, लिव्हिंग रूम आणि दोन च
जगातील पहिलंच गर्भनिरोधक अॅप ‘नॅचरल सायकल’

जगातील पहिलंच गर्भनिरोधक अॅप ‘नॅचरल सायकल’

लंडन : गर्भनिरोधक अॅप असू शकतं याची कल्पना अनेकांनी केली नसेल, पण हे शक्य आहे, हे अॅप सध्या प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे ब्रिटिश सरकारने त्यांच्या देशात या अॅपला मान्यता देखीव दिली आहे. गर्भनिरोधक गोळ्यांवर पर्याय म्हणून या अॅपकडे पाहण्यात येत आहे. ब्रिटन सरकारच्या 'मेडिसिन अॅन्ड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी अॅजेन्सी'ने या अॅपला परवानगी दिली आहे. या अॅपल 'नॅचरल सायकल' असं नाव देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे अॅप पारंपरिक गर्भनिरोधकांपेक्षाही ९९ टक्के उत्तम कार्य करतं. संबंधित महिलेला रोज सकाळी जीभेच्या खालील तापमान नोंदावं लागेल, या तापमानाची अचूक नोंद अॅपमध्ये करा, या नुसार हे अॅप गर्भवती राहण्याची किती शक्यता आहे, हे सांगेल. ज्या दिवशी अॅप हिरवा रंग दाखवेल, त्या दिवशी सेक्स केल्यास गर्भवती राहण्याची शक्यता फारच कमी असेल. पण ज्या दिवशी लाल रंग दाखवेल, त्या दिवशी गर्भवती रा
तेलंगणाच्या राहणारा 26 वर्षाच्या विद्यार्थ्याचे अमेरिकेत गोळी घालून हत्या

तेलंगणाच्या राहणारा 26 वर्षाच्या विद्यार्थ्याचे अमेरिकेत गोळी घालून हत्या

वारंगल, तेलंगानात राहणार्‍या 26 वर्षाच्या युवकाची अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. ममिडाला वामशी चंदर रेड्डी नावाच्या या युवकाच्या पित्याने दिलेल्या माहितीनुसार गोळी मारणारा शख्स कार चोरणारा होता आणि ही घटना शनिवारी सकाळी झाली जेव्हा वामशी कॅलिफोर्नियाच्या मिलपिटासच्या एका स्थानीय स्टोअरवर आपले पार्ट टाइम शिफ्ट करून परतत होता. वामशीचे वडील संजीव रेड्डी यांना भारतात फोनवर या अपघाताची माहिती मिळाली. ते म्हणाले 'वामशीच्या मित्रांनी मला फोन करून सांगितले की माझा मुलगा गायब आहे आणि नंतर त्यांनी सांगितले की वामशीचा मृत्यू झाला आहे.' वामशी 2013मध्ये कॅलिफोर्निया गेला होता जेथे त्याने सिलिकॉन वॅली युनिव्हर्सिटीहून आपल्या एमएसचा अभ्यास पूर्ण केला होता. तो सॉफ्टवेयर इंडस्ट्रीत नोकरी शोधत होता आणि या दरम्यान त्याने एका स्टोरमध्ये पार्ट टाइम नोकरी सुरू केली होती. रेड्ड
दहशतवादी हाफिज सईदचे वाईट दिवस सुरु

दहशतवादी हाफिज सईदचे वाईट दिवस सुरु

नवी दिल्ली : 10 मिलियन डॉलर बक्षीस असलेला दहशतवादी हाफिज सईदचे वाईट दिवस सुरु झाले आहेत. लाहोर हायकोर्टाने त्याच्यावरील नजरकैद संपवण्याच्या मागणीची याचिका फेटाळली आहे. हाफिजच्या वकिलांनी म्हटलं की, परदेशी शक्तींच्या दबावात सरकारने हाफिजला अनावश्यक आणि अवैध पद्धतीने बंधन बनवलं आहे. कोर्टाने मात्र हाफिजच्या वकिलांचं म्हणणं बाजुला करत हाफिजला नजरकैदेतून मुक्त करण्याची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे सध्या तरी हाफिजच्या अडचणी काही कमी होतांना दिसत नाही आहे.
जमैकामध्ये मुंबईतील युवकाची हत्या

जमैकामध्ये मुंबईतील युवकाची हत्या

मुंबई : जमैका येथे राहात असलेल्या मुंबईतील राकेश तलरेजा (वय 25) नावाच्या युवकाची दरोड्याच्या उद्देशाने चार अज्ञात हल्लेखोरांनी जमैकातील किंगस्टन येथील त्याच्या निवासस्थानी हत्या केली आहे. या घटनेत राकेशच्या दोन मित्रांच्या पायाला बंदुकीच्या गोळ्या लागल्याने ते जखमी झाले आहेत. किंगस्टन येथे राकेश आपल्या दोन भारतीय मित्रांसोबत राहात होता. तेथे दरोड्याच्या उद्देशाने चार अज्ञात व्यक्ती घुसले. त्यावेळी राकेश पहिल्या मजल्यावर बेडरूममध्ये होता. दरोडेखोरांनी सुरूवातीला बंदुकीचा धाक दाखवत राकेशच्या मित्रांचा फोन आणि त्यांच्याकडील रोख रक्कम घेतली. त्यानंतर त्यांनी राकेशचा फोन घेण्याचा प्रयत्न केला. त्यास राकेशने प्रतिकार केला किंवा नाही याबाबत काहीही माहिती समजलेली नाही. त्यानंतर त्यांनी राकेशच्या पाठीत तीन गोळ्या घातल्या आणि त्याच्या मित्रांच्या दिशेनेही गोळीबार करत पळ काढला. राकेशला तातडीने रुग
नवाज शरीफ यांना न्यायालयाचा दिलासा

नवाज शरीफ यांना न्यायालयाचा दिलासा

कॅनडा येथील धर्मगुरू तहिरुल कादरी यांच्या सहत्यांच्या 14 समर्थकांच्या हत्या केल्याच्या प्रकरणी सुनावणी घेण्यात यावी, यासाठी मागणी करणारी याचिका दहशतवादविरोदी न्यायालयाने फेटाळली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासह त्यांचा भाऊ पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शणीफ आणि अन्य काहींचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे बोलले जाते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवाझ शरीफ यांना दिलासा मिळाला आहे. या गुन्ह्यात शरीफ बंधूंबरोबच पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान आणि सरंक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांच्यासह इतर 12 उच्च पदस्थ सरकारी अधिकार्‍यांवर लाहोर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शावना पंड्या ठरणार अवकाशात जाणारी तिसरी भारतीय वंशाची महिला

शावना पंड्या ठरणार अवकाशात जाणारी तिसरी भारतीय वंशाची महिला

टोरांटो - कॅनडामधील शावना पंड्या (वय 32) हिची सिटिझन सायन्स ऍस्ट्रोनॉट कार्यक्रमाअंतर्गत अवकाशमोहिमेमध्ये निवड झाली आहे. 2018 मध्ये ती अवकाशात उड्डाण करणार आहे. शावना पंड्याची या अवकाशमोहिमेसाठी निवड झाल्याने कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांच्यानंतर अवकाशात जाणारी ती तिसरी भारतीय वंशाची महिला ठरणार आहे. या मोहिमेसाठी अर्ज केलेल्या कॅनडामधील 3200 जणांमधून शावना आणि आणखी एकाची निवड झाली आहे. शावना ही कॅनडामधील अल्बर्टा येथे न्यूरोसर्जन आहे. ती मूळ मुंबईची असून आपल्या व्यवसायाव्यतिरिक्तही तिने अनेक आव्हानात्मक अभ्यास केले आहेत. ती तायक्वांदोमध्ये निष्णात असून फ्रेंच, स्पॅनिश आणि रशियन या भाषाही तिला अवगत आहेत. तिने आंतरराष्ट्रीय अवकाश विद्यापीठातून अवकाशशास्त्रात एमएस्सी केले आहे. 'आपणा साऱ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी धन्यवाद. मी नासामध्ये काही काळ काम केले आहे. माझा अवकाश औष