
कुलभूषण जाधवचा खटला आम्हीच जिंकू : पाक परराष्ट्रमंत्री
नवी दिल्ली, आम्हाला आशा आहे, की पाकिस्तान कुलभूषण जाधवप्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात नक्कीच जिंकेल, असा विश्वास पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी आज (गुरुवार) व्यक्त केला.
भारताचे नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानच्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर कथित हेरगिरीचा आरोप करण्यात आला असून, या आरोपाखाली जाधव पाकिस्तानात आहेत. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर भारताने या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. आता पाकचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी कुलभूषण जाधवप्रकरणाचा खटला पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात नक्कीच जिंकेल, असे स्पष्ट केले.
याबाबत कुरेशी यांनी सांगितले, की ''आमच्याकडे कुलभूषण जाधव यांच्याविरोधा