Tuesday, May 22

विदेश

क्युबामध्ये विमान कोसळून १०० पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू

क्युबामध्ये विमान कोसळून १०० पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू

हवाना, क्युबामध्ये विमान कोसळून १०० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. क्युबामध्ये प्रवासी विमान हवानाच्या मुख्य विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही क्षणातंच कोसळले. क्युबाची अधिकृत वेबसाईट क्युबेडिबेटने यासंदर्भात वृत्त दिल्याचे एपी या वृत्तसंस्थेने म्हटलेय. हवाना विमानतळावरुन बोईंग ७३७ प्रवाशी जेट विमानाने उड्डाण केले. त्यानंतर हे विमान कोसळले. या अपघातात १००हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. या अपघातात झालेल्या वित्त आणि जीवितहानी झाल्याबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. हवाना विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. विमानतळावर सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे, तसे एएनआयच्या वृत्तात म्हटलेय.
मुंबई हल्ल्याबद्दलच्या विधानाचा भारतीय माध्यमांकडून अर्थाचा अनर्थ : नवाज शरीफ

मुंबई हल्ल्याबद्दलच्या विधानाचा भारतीय माध्यमांकडून अर्थाचा अनर्थ : नवाज शरीफ

लाहोर, मुंबईवरील हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याची कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली होती. पण आता भारतीय माध्यमांनी माझ्या वक्तव्याची चुकीची व्याख्या केल्याचं नवाज शरीफ यांनी म्हटलं आहे. रविवारी (ता. 14 मे) नवाज शरीफ यांनी हे वक्तव्य केलं. 'मुंबई हल्ल्याबद्दलच्या माझ्या वक्तव्याचा भारतीय मीडियाने चुकीचा अर्थ काढल्याचं', नवाज शरीफ यांनी म्हटलं. मुंबईवरील हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याची कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली होती. आम्ही दहशतवाद्यांना आसरा देत नाही, असा दावा कायम पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर केला जातो. मात्र शरीफ यांच्या कबुलीनं पाकिस्तानचा पर्दाफाश केला. पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना सक्रीय असल्याचं शरीफ यांनी एका मुलाखतीत मान्य केलं होतं. नवाज शरीफ यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,
विजय मल्ल्या ब्रिटनमध्ये 10 हजार 432 कोटींचा खटला हरला

विजय मल्ल्या ब्रिटनमध्ये 10 हजार 432 कोटींचा खटला हरला

लंडन, भारतीय बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवून परदेशात पळून केलेला मद्य व्यावसायिक विजय मल्ल्याला यूकेमध्ये मोठा झटका बसला आहे. भारतीय बँकांनी ब्रिटनच्या कोर्टात दाखल केलेला 1.55 बिलियन डॉलर म्हणजे अंदाजे दहा हजार 432 कोटी रुपयांचा खटला मल्ल्या हरला. विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मागे घेण्यास ब्रिटनच्या कोर्टाचे न्यायाधीश अँड्रयू हेनशॉ यांनी नकार दिला. 13 भारतीय बँकांनी मल्ल्याविरोधात फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा खटला दाखल केला होता. मल्ल्याची जगभरातील संपत्ती गोठवण्याचा आदेश कोर्टाने कायम ठेवला आहे. त्याचप्रमाणे मल्ल्याकडून 10 हजार कोटींची वसुली करण्यास बँकांना परवानगी दिली आहे. इंग्लंड किंवा वेल्समधील कोणत्याही संपत्तीची विक्री किंवा ट्रान्सफर मल्ल्याला करता येणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बैंक, फेडरल बँक लिमिटेड, आयडीबीआय बँक, इंडियन ओ
अल्जेरियाच्या लष्करी विमानाला भीषण अपघात, २५० जण ठार

अल्जेरियाच्या लष्करी विमानाला भीषण अपघात, २५० जण ठार

अल्जेरिया, अल्जेरियामध्ये लष्करी विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात २५० जण ठार झाले आहेत. अल्जेरियाची राजधानी बोयुफारीक विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर लगेचच हे विमान शेतामध्ये कोसळले. अपघाताच्यावेळी Ilyushin Il-78 या लष्करी वाहतूक विमानामध्ये मोठया प्रमाणावर सैनिक होते. २५७ जण या विमान अपघातात ठार झाल्याचे अल्जेरियामधील वृत्तवाहिनीने म्हटले आहे. कोसळल्यानंतर लगेचच या विमानाने पेट घेतला. सध्या अपघाताची जी छायाचित्र समोर आली आहेत त्यामध्ये आगीच्या ज्वाळा, काळया धुराने परिसर व्यापून टाकल्याचे दिसत आहे. रशियन बनावटीचे हे Ilyushin Il-78 वाहतूक विमान दक्षिण-पश्चिमेला बीचरच्या दिशेने चालले होते. वेस्टर्न सहारा पोलीसारीयो चळवळीचे सदस्यही या अपघातात ठार झाले आहेत. पोलीसारीयोचे २६ सदस्य या विमानामध्ये होते. अल्जेरियाच्या शेजारी वेस्टर्न सहारा प्रांत असून त्याच्या स्वातंत्र्यासाठी हे सदस्य लढत होते.
जपानच्या मसाझो आजोबांचं वय 112 वर्ष, गिनीज बुकमध्ये नोंद

जपानच्या मसाझो आजोबांचं वय 112 वर्ष, गिनीज बुकमध्ये नोंद

जपानमधले मसाझो नोनाका यांच्या नावावर जिवंत असलेल्या जगातल्या सर्वात वृद्ध व्यक्तीचा विक्रम नोंदवला गेलाय. त्यांचं वय आहे 112 वर्षं. जपानच्या ओकायदो नावाच्या बेटावर ते राहतात. तिथे जाऊन गिनीज बुकच्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रशस्तीपत्र दिलं. त्यांच्या नीतानं त्यांच्या तब्येतीमागचं रहस्य सांगितलं. थोडंसं गोड खाणं आणि गरम पाण्यानं अंघोळ करणं, यामुळे ते फिट राहतात, असं नात युकोचं म्हणणं आहे. त्यांना व्हीलचेअरची गरज लागते, पण ते फिट आहेत. वृत्तपत्र वाचल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही. तरुणपणी ते शेतीचा व्यवसाय करायचे.
दुबईत दोन भारतीयांना 500 वर्षांची शिक्षा

दुबईत दोन भारतीयांना 500 वर्षांची शिक्षा

अबू धाबी, दुबईत दोन भारतीयांना अटक करण्यात आली. या अटकेनंतर या दोघांनाही न्यायालयात सुनावणीसाठी नेले. न्यायालयाने त्याला तब्बल 500 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 37 वर्षांच्या सिडनी लिमोस आणि त्याच्या पत्नीने कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. तसेच या गैरव्यवहारातून हजारो गुंतवणुकदारांना धोका दिल्याप्रकरणी दुबई न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. लिमोस यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवून आपल्या कंपनीमध्ये गुंतवणुकीतून अधिक परतावा देण्याबाबत आश्वासन दिले होते. या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लिमोस यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या बेकायदेशीपणे कार्यालयात घुसून महत्वाची कागदपत्रे लंपास करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, लिमोसला डिसेंबर 2016 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामिनावर सुटका करण्यात आली. तसेच मागील व
कॅलिफोर्निया – युट्युबच्या मुख्यालयात गोळीबार, हल्लेखोर महिला ठार

कॅलिफोर्निया – युट्युबच्या मुख्यालयात गोळीबार, हल्लेखोर महिला ठार

वॉशिंग्टन, कॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनो येथील यु-ट्यूबच्या मुख्यालयात बुधवारी (4 एप्रिल) गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. एका बंदुकधारी महिलेनं मुख्यालयात अंदाधुंद गोळीबार केला व यानंतर स्वतःवरच  गोळी झाडून आत्महत्या केली. यावेळी लोकांनी घाबरुन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळापळ करण्यास सुरुवात केली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यु-ट्यूब मुख्यालयात गोळीबार करणारी महिला इमारतीत मृतावस्थेत आढळून आली. गोळीबार केल्यानंतर तिनं स्वतःवर गोळी झाडली. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अॅम्ब्युलन्स दाखल झाली. पोलिसांनी लोकांना घटनास्थळी न येण्याचं आवाहन केले. यानंतर काही काळ यु-ट्युबचे मुख्यालयदेखील बंद करण्यात आले व लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे कार्य सुरू करण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या 4 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आ
अॅमेझॉनची मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात

अॅमेझॉनची मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात

नवी दिल्ली, नोटाबंदीनंतर ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. लॅपटॉप आणि मोबाईल यांचा वाढता वापर यांमुळे ऑनलाइन शॉपिंगमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, इ-बे यांसारख्या साईटसवरुन खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले. आता या कंपन्यांचा विस्तार झाल्यावर त्यांनी नोकरभरतीही केली. पण मागच्या काही काळात आर्थिक गणिते कोलमडल्याने काही कंपन्यांनी कर्मचारी कपातही केली. अॅमेझॉननेही नुकतीच आपल्या कर्मचारी संख्येत कपात केली असून गेल्याच आठवड्यात ६० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्यात आले आहे. ई कॉमर्स कंपन्यांमध्ये अग्रेसर असलेल्या या कंपनीने जगभरातील आपल्या व्यवसायाचे रि-स्ट्रक्चर करण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही तर येत्या काळात कंपनी आपल्या आणखी काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करु शकते असे सांगण्यात आले आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्
हाफिज सईदचा पक्ष दहशतवादी संघटना; अमेरिकेची घोषणा

हाफिज सईदचा पक्ष दहशतवादी संघटना; अमेरिकेची घोषणा

इस्लामाबाद, पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांच्या आगोदर अमेरिकेने दहशतवादी हाफीज सईदचा पक्ष मिल्ली मुस्लिम लीग पार्टी (एमएलएम) पक्षाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड असलेल्या हाफीज सईदवर पाकिस्तानकडून यापूर्वीही निर्बंध आणण्यात आले आहेत. आता अमेरिकेने त्याने पाकिस्तान निवडणुकीत आपल्या पक्षाला उतरविण्याच्या तयारीला धक्काच दिला आहे. त्याच्या मिल्ली मुस्लिम लीग पार्टी ही दहशतवादी संघटना असल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेने एमएलएमच्या सात सदस्यांना परदेशी दहशतवादी संघटनांचे सदस्य म्हणून घोषित केले आहे. याबरोबरच अमेरिकेने दहशतवादी संघटनांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये तेहरिक-ए-आझादी-ए-काश्मीर (टीएजेके) या संघटनेची नावही आहे. ही संघटना लष्करे तैयबाशी संबंधित आहे. ट्रम्प प्रशासनाने हे पक्ष कोणत्याही निर्बंधांशिवाय पाकिस्तानमध
भारतावरचा धोका टळला; चीनची ‘स्पेस लॅब’ प्रशांत महासागरात कोसळली

भारतावरचा धोका टळला; चीनची ‘स्पेस लॅब’ प्रशांत महासागरात कोसळली

बीजिंग, सध्या वापरात नसलेले, अनियंत्रितपणे अवकाशात भ्रमण करत असलेले चीनचे अंतराळस्थानक (स्पेस लॅब) भारतात कोठेही कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर हा धोका टळला असून, ही स्पेस लॅब दक्षिण प्रशांत महासागरात कोसळल्याची माहिती चीनच्या वैज्ञानिकांनी दिली आहे. या स्पेस लॅबने रविवारी सायंकाळी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला अखेर ही लॅब दक्षिण प्रशांत महासागरात कोसळली. यापूर्वी ती लॅब ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत कोठेही कोसळू शकते, अशी शक्‍यता चीनच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली होती. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई व महाराष्ट्रात कोठेही ही लॅब कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. 'तियांगोंग-1' असे या अंतराळ स्थानकाचे नाव असून, त्याला चीनमध्ये "स्वर्गातील महाल' असेही संबोधले जाते. हे अंतराळ स्थानक रविवारी दुपारी पृथ्वीच्या वातावरणापासून सुमारे 179 किलोमीटर अंतरावर होते