Sunday, January 20

वास्तुसल्ला

किचन वास्तू टिप्स

* किचनमध्ये भिंतीवर गडद रंग वापरू नये, हलका हिरवा, पिस्ता, ऑफ व्हाईट, ऐवरी असे रंग असले पाहिजे. * किचनच्या ट्रॉली, कपाटे, क्रॉकरी या सर्वांचा रंग गडद नसून हलका असवा. * किचन मध्ये गॅसच्या समोर बाथरूम किंवा देवघर नसावे. * किचनमधील फॉल सिलिंग उतरते नसावे. * किचनमध्ये गळके नळ नसावे तसेच खाली ओल, लिकेज असू नये. * किचनच्या ओट्याचा दगड काळा नसून ग्रीन ग्रॅनाइट वापरावे. * किचनच्या ओट्यावरती कोणत्याही देवाचे फोटो किंवा मुरत्या नसाव्या. * किचनमध्ये गॅस शेजारी पाण्याचे हंडे ठेवू नये. * किचन ओट्यामागे आरसा किंवा काचेचे कपाट नसावे. * नकारात्मकता घालवण्यासाठी किचन ओटा, जमिनीवरील फरशी खडे मिठाच्या पाण्याने स्वच्छ करावी. * किचन मध्ये डायनिंग टेबल पूर्व-पश्चिम असा ठेवावा. * किचन मध्ये पाण्याचे सिंक उत्तर- पूर्व दिशेकडे असावे.

मानसिक ताण दूर करेल हा वास्तू उपाय

जर आपल्याला लहान-लहान गोष्टींवर ताण येत असेल आणि डॉक्टरांचा सल्ला ही फेल होत असेल तर आपल्याला एकदा तरी वास्तू टिप्स अमलात आणले पाहिजे. वास्तूप्रमाणे दिवसातून एकदा चांदीच्या ग्लासात पाणी पिण्याने रागावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. याव्यतिरिक्त आणखी काही वास्तू टिप्स आहेत ज्याने मा‍नसिक ताण कमी होण्यात मदत मिळते. * जर घरात नकारात्मक ऊर्जेचा आभास होत असेल तर घरात संध्याकाळी सुवासिक आणि पवित्र धूर करावा. ज्याने वातावरण सकारात्मक राहील. * काही लोकं बेडरूममध्ये अल्कोहलचे सेवन करतात अशाने ताण वाढतं. बेडरूममध्ये अल्कोहलचे सेवन केल्याने धडकी भरवणारे स्वप्न येतात. आणि यामुळे आजारी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. * घरात कोळीचे जाळ असल्यास मानसिक ताण वाढतो. अर्थात घरात स्वच्छता केली पाहिजे. * सोफा सेटच्या कव्हरचा रंग हलका निळा किंवा आकाशी असल्यास मानसिक शांती लाभते.
वास्तुनुसार बाथरूमची योग्य दिशा कोणती!

वास्तुनुसार बाथरूमची योग्य दिशा कोणती!

वास्तुनुसार 'बाथरूम/टॉयलेट्स', 'टॉयलेट्स ईशान्यदिशेस, आग्नेयस, नैऋत्यकडे कोपर्‍यात किंवा घराच्या मधोमध नसावी. एकत्रित बाथरूम किंवा टॉयलेट ईशान्येकडच्या भागात कालत्रयी नसावी. पाण्याचा पाइप, शॉवर किंवा बाथटब वगैरे बाथरूमच्या ईशान्य भागात ठेवण्यात यावे. टॉयलेट मधील नळ पूर्वेस, उत्तरेकडे किंवा ईशान्य या दिशेस असावे. बाथरूम किंवा टॉयलेटच्या भिंतीवर हिरवा, नीळा किंवा पिवळा रंग दिलेला असावा. पूर्वेकडे बाथरूम असलेले चांगले असते, त्यायोगे सूर्याचा प्रकाश आंघोळ करणार्‍यास लाभतो. बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये वॉश बेसिन पश्चिमेकडे असावे. कुटुंबातील प्रत्येक सभासदासाठी निराळा टॉवेल असावा. प्रात:काळी आंघोळ करताच सूर्याचे दर्शन घेणे शुभलक्षणी असते. टॉयलेटच्या तळभागाचा उतार असा असावा की पाणी वाहून पूर्वेस, उत्तरेकडे किंवा ईशान्य दिशेकडे निघून जाईल. टॉयलेटमध्ये गीजर आग्नेयेस किंवा वायव्य दिशेकडे असावे. टॉयलेटश
वास्तूप्रमाणे डायनिंग रूम कसा असावा

वास्तूप्रमाणे डायनिंग रूम कसा असावा

'डायनिंग रूम', 'भोजन गृह आणि स्वैपाकघर एकाच माळ्यावर असणे बरे असते. भोजन गृहात भिंतीवर हिरवा आणि पिवळा रंग असणे बरे. डायनिंग टेबल भोजनगृहाच्या पश्चिमेकडे ठेवावे. भोजनगृह स्वैपाकघराच्या डाव्या बाजूला आणि लागून असावे. भोजनगृहाचे प्रवेश दार आणि मुख्य दार एका सरळ रेषेत नसावे. डायनिंग टेबल चौरस किंवा चतुष्कोणिय असावे, अंड्याच्या किंवा इतर कोणत्याही आकाराचे टेबल चांगले नसते. डायनिंग टेबल भोजनगृहाच्या मधोमध ठेवण्यात यावे. डायनिंग टेबलच्या खुर्च्या सम संख्येत असाव्या, कारण विषम संख्येत खुर्च्या असण्याने एकाकीपणाची जाणिव वाढवणार्‍या वाटू लागतात. भोजनगृहात डायनिंग टेबल भिंतीला लाऊन किंवा घडी करून ठेऊ नये.
अंकावरून मिळकत व खर्च ओळखा!

अंकावरून मिळकत व खर्च ओळखा!

नवीन घर बांधण्यापूर्वी किंवा खरेदी करण्यापूर्वी ते आपल्या कसे फायदेशिर ठरेल, हे पाहणे आवश्यक आहे. तसेच आपली मिळकत व होणार खर्च याचे गुणोत्तर काढले पाहिजे. मिळकत कशी काढाल: सगळ्यात आधी घराचे क्षेत्रफळ काढावे. काढलेल्या क्षेत्रफळाला आठाने भाग द्यावा. जी संख्‍या बाकी राहत असेल त्याला मिळकत समजावी. जर बाकी राहिलेली संख्‍या 1, 3, 5, 7 ह्या पैकी असेल तर घर आपल्याचा सुख, समृध्दी देणारे ठरेल तर 0, 2, 4, 6, 8 ह्या पैकी संख्या बाकी राहत असेल तर हे घर अशुभ ठरू शकते. अशा घराच्या 'बिल्ट अप एरीया'मध्ये परिवर्तन करता येऊ शकते. खर्च कसा काढाल: घराचे क्षेत्रफळाला आठाने गुणून त्याला 27 ने भाग द्यावा. ही संख्‍या आपल्या घराचे गृह नक्षत्र दर्शवते. या संख्‍येला पुन्हा आठाने भाग भाग दिल्याने बाकी उरलेली संख्‍या म्हणजे 'खर्च'. जर खर्चापेक्षा मिळकतीची संख्या अधिक निघाली तर आपण खरेदी किंवा बांधत असलेले नवीन घ
या दिशेत भोजन तयार करणे योग्य नसत

या दिशेत भोजन तयार करणे योग्य नसत

वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरात अन्न तयार करताना वास्तू सम्मत दिशेबद्दल सांगण्यात आले आहे. वास्‍तुशास्‍त्रानुसार भोजन तयार करणार्‍या व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेकडे असायला पाहिजे, पण जर स्वयंपाकघराचा निर्माण या पद्धतीने झाला नसेल तर स्वयंपाक करणार्‍या व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेकडे असणे उत्तम असत. पश्चिम दिशा किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून भोजन तयार करणे वास्तूप्रमाणे योग्य नसते.
व्यापार सुरू करण्याआधी अमलात आणा ह्या वास्तू टिप्स

व्यापार सुरू करण्याआधी अमलात आणा ह्या वास्तू टिप्स

आपला व्यवसाय सुरू करणे हे सर्वांचे स्वप्न असत. सर्वांनाच वाटतकी त्यांचा व्यवसाय चांगला चालायला पाहिजे. त्यासाठी लोक वास्तू पूजा, ग्रह-नक्षत्र सारख्या गोष्टी बघतात. जर तुम्ही नवीन बिझनेस सुरू करत असाल आणि त्यात तुम्हाला कुठलीही अडचण नको असेल तर अमलात आणा ह्या वास्तू टिप्स : 1. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या कामासाठी नवीन प्लॉट किंवा जागा खरेदी करत असाल तर लक्षात ठेवा की दुकानाचे मुख्य दार पूर्व किंवा उत्तर दिशेत उघडेल असे पाहिजे. असे केल्याने सतत सकारात्मक ऊर्जा राहते. 2. वास्तूनुसार दुकानाचा मालक किंवा मॅनेजरला दुकानाच्या दक्षिण-पश्चिम दिशेत बसायला पाहिजे. याने तुमचा बिझनेस उत्तम चालेल. 3. वास्तूनुसार दुकानाचे कॅशकाऊंटर नेहमी दक्षिण किंवा पश्चिमेकडील भिंतीकडे असायला पाहिजे. या दिशेत ठेवल्याने तुमच्या लॉकरमध्ये पैसा कायमस्वरूपी राहील. 4. दुकानाच्या उत्तर-पूर्व दिशेत देवाचे फोटो