Sunday, January 20

लाइफ स्टाइल

धूम्रपानात भारतीय महिला जगात तिसर्‍या

जगभरात झालेल्या प्रत्येक दहा मृत्यूंपैकी एकापेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूचं कारण हे धूम्रपान होतं, असं एका अहवालातून स्पष्ट झालंय. तर धूम्रपानामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण जास्त असणार्‍या देशांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. एका अभ्यासानुसार 2015 साली झालेल्या 64 लाख मृत्यूंपैकी 11 टक्के लोकांचे मृत्यू हे धूम्रपानाने झाले होते. कारण धूम्रपानच्या सवयीमुळे शरीर कमकुवत होऊन व्यक्तीची रोग‍प्रतिकारक शक्ती कमी होते. धूम्रपान करणार्‍या पुरूषांचं प्रमाण जास्त असलेल्या यादीत भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे तर महिलांचं प्रमाण जास्त असणार्‍या यादीत भारत देश तिसर्‍या क्रमांकावर आहे. तसंच धूम्रपानामुळे होणार्‍या मृत्यूच्या प्रमाणात 5 टक्कयांची वाढ झालीय आणि ही वाढ चिंताजनक असल्याचंही जीबीडीच्या अहवालात म्हटलंय. जवळपास 195 देशांच्या धूम्रपान करणार्‍या लोकांच्या सवयींना अभ्यास करून हा अहवाल प्रका

स्मार्टफोनचा वापर जरा जपूनच करा, नाहीतर…

स्मार्टफोन आणि गॅजेट्सच्या अधिक वापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक स्वास्थ्याशी निगडीत काही समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे त्यांचं वागणं, राहणं यामध्येही फरक पडू शकतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून ही गोष्ट समोर आली आहे. अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठाचे मेडेलीन जॉर्ज यांनी यावर एक संशोधन केलं आहे. त्यांच्या मते, किशोरवयीन मुलांनी स्मार्टफोन किंवा गॅझेटचा अधिक वापर केल्यास त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ते कोणत्याही एक गोष्टीवर लक्ष केंद्रीत करु शकत नाही. यासोबतच त्यांच्यामध्ये हायपर अॅक्टिव्हिटी डिस्ऑर्डरची लक्षणं दिसू लागतात. हे संशोधन ‘चाइल्ड डेव्हलपमेंट’ या मासिकात प्रकाशित झालं आहे. यामध्ये किशोरवयीन मुलांच्या मानसिक स्वास्थ्याशी निगडीत लक्षणं दाखवली आहेत. यामध्ये त्यांच्या दररोजच्या सोशल मीडिया आणि इंटरनेट वापराचा वेळही समाविष्ट करण्यात आला आहे.

ऑफिसच्या कॉम्प्यूटरवर या गोष्टी सर्च करु नका!

ऑफिसच्या कॉम्प्यूटरवर अनेक खाजगी गोष्टी सर्च केल्या जातात. ब्राऊजर आणि सिस्टीम हिस्ट्री क्लीअर केल्यानंतर आपण काय सर्च केलं ते दिसणार नाही, असा अनेकांचा समज असतो. मात्र तुम्ही केलेल्या सर्फिंगची सर्व माहिती आपोआप सेव्ह होते. अॅडल्ट वेबसाईट्स : एका रिपोर्टनुसार ग्रेट ब्रिटनच्या संसदेच्या कार्यालयात 3 लाखांपेक्षा जास्त अॅडल्ट विषय सर्च केले जातात. अशा वेबसाईट सर्च करताना आढळल्यास नोकरीवरुन काढून टाकल्याच्या घटनाही अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. ऑफिसची खाजगी माहिती : ऑफिसच्या कॉम्प्यूटरवर काही गोष्टी सुरक्षित केलेल्या असतात. मात्र त्यानंतरही संबंधित वेबसाईट किंवा फोल्डर ओपन करण्याचा प्रयत्न करु नये. कारण तुमच्या प्रत्येक गोष्टीची माहिती आयटी टीमला मिळते. साईड जॉब सर्च : एका कंपनीत नोकरी करत असताना दुसऱ्या कंपनीची नोकरी किंवा व्यवसाय करण्यासंबंधीत माहिती ऑफिसमध्ये शोधू नये. यामुळे नोकरीही

‘अॅस्पिरिन’मध्ये कॅन्सरविरोधी तत्वं सापडली

डोकेदुखी म्हणजे अॅस्पिरिन. आपल्या देशात काही गोष्टींची सांगड काही दुसऱ्या गोष्टींशी एवढ्या घट्टपणे घातली गेली आहे की एक शब्द उच्चारला की लगेच दुसऱ्याची आठवण यावी. म्हणजे बिसलेरी, अमूल बटर, ग्लुको बिस्किट, टाटा साॅल्ट अशा कितीतरी वस्तूंची यादी काढता येईल. तसंच अॅस्पिरिन, अॅनासीन आणि क्रोसीन ही औषधं डोकेदुखीशी जोडली गेली आहेत. पण आता अॅस्पिरिनचा आणखी एक उपयोग व्यवहारात येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आयआयटी मद्रासच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार अॅस्पिरिनचा वापर कॅन्सर बरा करण्यासाठीही होऊ शकतो. आपलं हे संशोधन त्यांनी ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित केलं आहे. कॅन्सरच्या प्रकारापैकी धोकादायक प्रकारात कॅन्सरच्या पेशींमधलं प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. या पेशींवर अॅस्पिरिन हल्ला करून त्यांचा नायनाट करायला मदत करतात असं या संशोधकांचं म्हणणं आहे. याचा अर्थ अॅस्पिरिन घेऊन

धुम्रपानामुळे होणा-या मृत्यूंमध्ये भारत दुस-या क्रमांकावर

‘धुम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहे.’, ‘ smoking is injurious to health’ सिगारेटच्या पाकिटावरच काय पण वारंवार करण्यात येणा-या जाहिरातींमधूनही ओरडून ओरडून सांगितलं जातं, पण याकडे कोण लक्ष देतेय? धुम्रपान करणं आरोग्यास कितीही हानिकारक असंल आणि त्यामुळे कितीही गंभीर आजार होत असले तरी धुम्रपान करणा-यांच्या संख्येत काही घट नाही हे दुर्दैवाची बाब. नुकत्याच हाती आलेल्या एका अहवालानुसार धुम्रपानामुळे ११ टक्के लोक जगभरात मृत्यूमुखी पडले आहे आणि त्यातले ५०% लोक हे चीन, भारत, अमेरिका आणि रशिया देशातले होते. या चार देशांमध्ये धुम्रपानामुळे मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या अधिक आहे. चीनमध्ये धुम्रपान करणा-यांमुळे सर्वाधिक जणांचा मृत्यू झाला आहे यानंतर भारताचा क्रमांक लागतो. अमेरिका आणि रशिया अनुक्रमे तिस-या आणि चौथ्या स्थानावर आहे. २०१५ मध्ये आरोग्याच्या समस्येमुळे ६४ लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यात ११%
आंघोळीच्यावेळी तुमच्याकडून या चुका होतात का?

आंघोळीच्यावेळी तुमच्याकडून या चुका होतात का?

प्रत्येक व्यक्तीला शरीर स्वच्छतेसाठी आंघोळ गरजेची असते. मात्र, आंघोळीवेळी तुमच्याकडून रोज अशा काही चुका होतात, त्यातून तुमच्या आरोग्यासोबतच सौंदर्यावरही परिणाम होतो. कारण आंघोळीच्या निमित्ताने जास्तवेळ पाण्यात राहिल्याने तुमच्या शरिरातील नॅचरल ऑईल्स नष्ट होऊन, त्याची त्वचा कोरडी बनते. त्यामुळे अशा चुका टाळण्यासाठी आंघोळीवेळी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, याविषयी तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. गरम पाणी : अनेकांना गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते. कारण यातून त्यांच्या स्नायूंना आराम मिळतो असा समज असतो. पण अंघोळीसाठी गरम पाण्याच्या वापराने त्यांच्या शरिरातील आवश्यक ऑईल नष्ट होतं. आंघोळीसाठी गरम पाण्याच्या वापरानं त्याची त्वचा ड्राय (कोरडी) बनते. त्यामुळे शरिराला खाज सुटते. त्यामुळे जर तुम्ही थंड हवामानाच्या परिसरात राहात असाल, तर आंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करावा. शॉवरखाली जास्त क
सेक्सबाबतचा दृष्टिकोन झळकतो चेहर्‍यावर

सेक्सबाबतचा दृष्टिकोन झळकतो चेहर्‍यावर

पुरूषांनो सावधान! तुम्ही फक्त काही काळासाठी भुलवत आहात किंवा जन्म-जन्मांतराचे साथी होवू इच्छिता' हे गुपित स्त्री एका कटाक्षात जाणून घेऊ शकते. डरर्हम विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात व्यक्तीचा सेक्सप्रतीचा दृष्टिकोन त्याच्या चेहर्‍यावर झळकत असतो, हे शोधून काढले आहे. जबड्याचा आकार, नाक व डोळ्यांचा शेप यामधून याचा अंदाज येतो. एखाद्याचा चेहरा बघून सेक्सबाबत दृष्टिकोनाबाबत अंदाज बांधणे शक्य असल्याचे अभ्यासपथकाच्या प्रमुख लिंडा बुथरॉयड सांगतात. संशोधकांनी वयाच्या विशीतील सुमारे सातशे पुरूष व महिलांच्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढला आहे. अभ्यासात सहभागी परस्परभिन्न लिंगाच्या व्यक्तीच्या छायाचित्राकडे बघून ते किती आ‍कर्षक आहेत, सेक्सबाबत त्यांचा दृष्टिकोन काय? दीर्घ कालावधीसाठी ते पार्टनर होऊ शकतात काय? यासारखे प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आले होते.

असे असावे स्मार्ट रेझ्यूम

रेझ्युमे हे आपले फर्स्ट इंप्रेशन. त्यातच आजकाल रेझ्युमे मेल करावा लागता. आणि बघणाराही स्मार्टफोन, टॅबवर चेक करणारं असेल तर रेझ्युमे स्मार्ट असला हवा. पाहू स्मार्ट रेझ्युमे तयार करण्यासाठी काही टिप्स: रेझ्युमेमध्ये फॉन्ट साइज 32 ठेवा. मार्जिन ठेवा. ज्याने अधिक झूम किंवा ड्रॅग करण्याची गरज भासणार नाही. डार्क बॅकग्राऊंडवर व्हाईट फॉन्ट किंवा लाइट बॅकग्राऊंडवर ब्लॅक फॉन्ट वापरा. ज्याने अक्षर स्पष्ट दिसतील. हे रेझ्युमे तयार करताना वाक्य लहान असावे हे लक्षात असू द्या. कमी शब्दात अधिक आणि महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करा. पाच स्लाइडहून अधिक स्लाइड वापरणे टाळा. रेझ्युमेमध्ये चार्ट किंवा इमेज टाकू नये. कारण स्मार्टफोन आणि टॅबवर पाहताना हा फॉर्मेट नीट दिसेल याची गारंटी नाही. रेझ्युमे तयार झाल्यावर आधी तो स्वत:च्या स्मार्टफोन किंवा टॅबवर चेक करा. दिसायला प्रेंझेटेबल आहे

आकर्षक वाटणा-या स्त्री-पुरुषांपासूनच फसवणुकीचा जास्त धोका

आपल्या आसपास वावरणा-या आकर्षक व्यक्तीमत्वांकडे आपण आपसूकच ओढले जातो. आकर्षक व्यक्तीच्या सहवासात वेळ घालवावा असे अनेकांना वाटते. खासकरुन आकर्षक व्यक्तीमत्वाच्या स्त्री-पुरुषांबद्दल एक विश्वास वाटतो. पण आकर्षक व्यक्तीमत्वाचे लोकच फसवणूक करण्याची शक्यता जास्त असते. प्रेम, वैवाहिक नात्यामध्ये आकर्षक व्यक्तीमत्वाच्या स्त्री, पुरुषाकडून धोका होण्याची शक्यता जास्त असते. एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. पर्सनल रिलेशनशिप्सच्या जर्नलमध्ये या अभ्यासचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत. प्रेम संबंधात स्थैर्याची कमतरता हे सुद्धा नाते तुटण्याचे एक कारण असते असे हार्वर्ड विद्यापीठाचे संशोधक डॉ. ख्रिस्टीन यांनी सांगितले. संशोधकांनी दोन महिलांसमोर शालेय जीवनातील 238 पुरुषांचे फोटो ठेवले व त्यांना आकर्षक पुरुष निवडण्यास सांगितले. चेहरेपट्टीवरुन ज्या पुरुषांची आकर्षक म्हणून त्यांनी निवड केली त्यातील अधिक पु
धुम्रपान सोडण्याचा नवा फंडा

धुम्रपान सोडण्याचा नवा फंडा

कुठलीही चांगली सवय लावायची असेल किंवा वाईट सवय सोडायची असेल, तर सकारात्मक विचार आवश्यक असतात. भूतकाळातल्या प्रसन्न, निरागस आणि गंधित जीवनाची ओढ निर्माण करणाऱ्या आठवणी धूम्रपानासारखी जीवघेणी सवय सोडायला लावणार असतील, तर या स्वागतार्ह गोष्टीची अंमलबजावणी आपल्या देशातही व्हायला हवी. एकविसाव्या शतकात धूम्रपानाला आरोग्याचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू मानलं जातं. त्यामुळे आरोग्याच्या आकडेवारीचा टक्का वाढवायचा असेल, तर काहीही करून धूम्रपान रोखायला हवं, याबद्दल जगातल्या यच्चयावत सरकारांच्या आरोग्य खात्यानं चंग बांधलेला असतो. धूम्रपानाबद्दल लोकांच्या मनात भीती निर्माण व्हावी, म्हणून धूम्रपानविरोधी जाहिराती टेलिव्हिजन, सिनेमा, इंटरनेटवर सर्वत्र दाखवल्या जातात. सिनेमात एखादा नट धूम्रपान करताना दाखवत असतील, तर लगेच ‘धूम्रपान आरोग्यविघातक आहे’ असं वाक्य झळकतं. सिगारेटच्या प्रत्येक पाकिटावर ‘धूम्रपानामुळ