Saturday, February 23

राजनिति

‘देशासाठी तुमच्या घरातून कुत्रा तरी गेला का?’

‘देशासाठी तुमच्या घरातून कुत्रा तरी गेला का?’

नवी दिल्ली : देशासाठी महात्मा गांधी आणि इंदिरा गांधींनी बलिदान केलं, देशासाठी तुमच्या घरातून कुत्रा तरी गेला का? असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गेंनी केली आहे. खर्गेंच्या या वक्तव्याचा भाजपनं जोरदार निषेध करत हे वक्तव्य लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी भाजपनं केली. यानंतर हे वक्तव्य लोकसभेच्या कामकाजातून वगळण्यात आलं.
अखंड महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या आव्हानाला भाजपचं प्रत्युत्तर

अखंड महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या आव्हानाला भाजपचं प्रत्युत्तर

पुणे : हुतात्मा स्मारकावर जाऊन पारदर्शकतेची शपथ घेणाऱ्यांनी तिथेच अखंड महाराष्ट्राचीही शपथ घ्यावी, असं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला केलं होतं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरेंना याच मुद्द्यावरून प्रत्युत्तर दिलं आहे. असंतोष असताना राज्यांचं विभाजन होता कामा नये अशी भाजपची भूमिका असल्याचं रावसाहेब दानवेंनी म्हटलंय. भाजप छोट्या राज्यांच्या संकल्पनेला नेहमीच पाठिंबा देत आलं आहे, पण त्याचा अर्थ जनतेला मान्य नसताना विभाजन करणे हा भाजपचा अजेंडा नसल्याचं दानवेंनी स्पष्ट केलंय.
पैसे घेऊन तिकीटवाटप, मनविसे उपाध्यक्ष अखिल चित्रेंचा पदत्याग

पैसे घेऊन तिकीटवाटप, मनविसे उपाध्यक्ष अखिल चित्रेंचा पदत्याग

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनविसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप करत उपाध्यक्ष अखिल चित्रेंनी पदाचा राजीनामा दिला आहे. वांद्रे पूर्वच्या वॉर्ड क्रमांक 95 मधून निवडणूक लढण्यास चित्रे इच्छुक होते. मात्र या ठिकाणी मनसेकडून सुमन तारिक यांना उमेदवारी देण्यात आली. मनसेच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्यानं विभाग अध्यक्ष सुनिल हर्षे यांनी अयोग्य रितीनं तिकीट वाटप केल्याचा आरोप चित्रेंनी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे पदाचा राजीनामा दिला असला तरी पक्ष सोडून जाणार नसल्याचंही अखिल चित्रे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र यानिमित्ताने पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मुंबईसह दहा महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे महापालिकांवर कोणत्या पक्षाचा
मुंबई महापालिकेसाठी मनसेचे हे उमेदवार रिंगणात

मुंबई महापालिकेसाठी मनसेचे हे उमेदवार रिंगणात

मुंबई: महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र, भाजपनं  काल आपली उमेदवार यादी जाहीर केली. तर  शिवसेना आणि मनसेनं अद्याप उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. मात्र, दोन्ही पक्षांनी कालपासून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप सुरु केलं आहे. मनसेनंही मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 175 जणांना एबी फॉर्मचं वाटप केलं आहे. यादी जाहीर न करता मनसेकडून थेट एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं. निवडणुकीच्या तोंडावर बसलेला बंडखोरीचा फटका बसू नये यासाठी यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचं वाटप केल्याचं बोललं जात आहे. मनसेकडून मुंबई महापालिकेसाठी १७५ एबी फॉर्मचं वाटप: 9 – महेश नर 13 – विनोद सोळंकी 14- निशा गुजर 15 महेश भोईर 16 – रेशमा निवळे 17 – संगीता मयेकर   18 – कबीरदास मोरे 19 – संगिता कारंडे 20 – राजेंद्र कदम 21 – सीमा कुलकर्णी 22 – पायल घाडी 30 –