Saturday, February 23

राजनिति

भाजपमध्ये सैन्यभरती प्रमाणे गुंडभरती – संजय राऊत

भाजपमध्ये सैन्यभरती प्रमाणे गुंडभरती – संजय राऊत

मुंबई : पोलीस किंवा सैन्य भरती होते त्याप्रमाणे भाजपमध्ये गुंड भरती होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. अशा प्रकारे गुंडांची भरती होणं हे संघ विचारांच्या विरोधात आहे. म्हणून आरएसएसचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी शिवसेनेवर मतप्रदर्शन करण्याआधी भाजपला उपदेश करावा, असा टोला संजय राऊत यांनी नागपुरात लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सद्गृहस्थ असून त्यांच्या हेतूबद्दल आपल्याला शंका नाही. मात्र ज्या प्रकारे दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी तलवारी बाहेर उपसल्या आहेत, त्या आता म्यान होणं शक्य नाही. आणि तलवारी म्यान झाल्या तरी खडखडाट सुरुच राहील, असा स्पष्ट इशाराही राऊतांनी यावेळी दिला.
बाळासाहेबांचे नाव घेऊन तुमचा गैरकारभार लपवू नका…

बाळासाहेबांचे नाव घेऊन तुमचा गैरकारभार लपवू नका…

दिवा, दि. 15 - शिवसेनेच्या होर्डिंगवर करून दाखवलंची जाहिरात केली जात आहे. पण काही करण्याआधी कुणी असं कुणी सांगतं का? बाळासाहेबांचे फोटोही जाहिरातीत वापरले जात आहेत. पण बाळासाहेबांचे नाव घेऊन तुमचा गैरकारभार लपवू नका, असा टोला राज ठाकरे यांनी आज शिवसेनेला लगावला. दिव्यात झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत. पण मतदारांच्या हाती काय लागते आहे घंटा असा सवाल त्यांनी केला. ठाण्यात मोठ्या प्रमाणावर परप्रांतियांचे लोंढे येत आहेत. महाराष्ट्रातील राजकारण्यांनाही त्यांचा पुळका आला आहे. भाजपाचा तर परप्रांतियांच्या मतावर डोळा आहे. असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. दिवावासीय डम्पिंग ग्राऊंडच्या समस्येने त्रस्त आहेत. पण मी नाशिकमध्ये डम्पिंग ग्राऊंडचे काय केले आहे ते बघा. तेथे कचऱ्यापासून खत
फडणवीस – उद्धवमध्ये लुटूपुटूची लढाई: पृथ्वीराज चव्हाण

फडणवीस – उद्धवमध्ये लुटूपुटूची लढाई: पृथ्वीराज चव्हाण

पुणे, राज्यात भाजप आणि शिवसेनेमधील भांडणावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. भाजपने अपयश झाकण्यासाठी मुद्दामून शिवसेनेसोबत लढाई केली. दोन्ही पक्षांमधील ही लढाई लुटूपुटूची असल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पुण्यात काँग्रेससाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. देशभरात सध्या अस्थिरतेचे वातावरण दिसत आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्ता मिळणार नाही असे भाकित त्यांनी वर्तवले. नरेंद्र मोदींवर टीका करताना चव्हाण म्हणाले, माजी पंतप्रधानांवर मोदींनी केलेली टीका निंदनीय आहे. नोटाबंदीकरुन मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला केला. यामुळे देशभरात विविध क्षेत्रांमधील ४० लाख नोकऱ्या गेल्या. यामध्ये तरुण वर्ग नाहक भरडला गेला असा आर
शिवसेनेचे नेते हे अर्धवटराव : तावडे

शिवसेनेचे नेते हे अर्धवटराव : तावडे

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत विकासावर बोलण्याऐवजी शिवसेनेचे नेते सध्या देशपातळीवर राम मंदिर, संरक्षण विभाग, नोटबंदी आदी प्रश्‍नांवरून भाजपला लक्ष्य करत आहेत. शिवसेनेच्या या अर्धवटरावांनी मुंबईकरांना काय देणार यावर अधिक भाष्य करायला हवे अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी विकासाचे मुद्दे न घेता, शिवसेनेकडून भावनिक मुद्यावर प्रचार केला जात आहे. मुंबईकरांना कोणत्या आरोग्यसेवा पुरविणार आणि विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करण्याचा पास देण्याचे आश्‍वासन शिवसेनेने दिले आहे. गेल्या 20 वर्षात सत्तेवर असताना शिवसेनेने विद्यार्थ्यांना मोफत प्रवास सुविधा का दिली नाही, असा सवाल तावडे यांनी काल (मंगळवारी) पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप पारदर्शकता आणि विकासाच्या मुद्यावर लढत आहे. शिवसेनेकडून मात्र राम मंदिर, सैनिकांना काय ज
नागपूर पालिका घोटाळ्यामागे देवेंद्र फडणवीस- शिवसेना

नागपूर पालिका घोटाळ्यामागे देवेंद्र फडणवीस- शिवसेना

मुंबई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि पारदर्शी कारभारावरुन शिवसेनेवर हल्लाबोल केला असतानाच आता शिवसेनेनेही नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचारावरुन थेट मुख्यमंत्र्यांवरच पलटवार केला आहे. फडणवीस महापौर असताना नागपूर महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोपच सेनेने केला आहे. नागपूर पालिका घोटाळ्यामागे देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले. रस्ता डांबरीकरण, पाणी शुद्धीकरण यातील भ्रष्टाचाराचे हे प्रकरण आहे. नागपूर पालिका घोटाळा प्रकरणी 27 फेब्रुवारी 2001 ला नंदलाल समितीने अहवाल दिला. त्या अहवालात नंदलाल समितीने देवेंद्र फडणवीसांवर ठपका ठेवल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे. या घोटाळ्याविरोधात शिवसेना आवाज उठवणार असल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे. नंदलाल समितीने आपल्या अहव
गरज पडल्यास मी स्वतः निवडणूक लढेन : आदित्य ठाकरे

गरज पडल्यास मी स्वतः निवडणूक लढेन : आदित्य ठाकरे

मुंबई, मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत असला, तरी ठाकरे घराण्यातील व्यक्ती आतापर्यंत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली नाही. मात्र ठाकऱ्यांची तिसरी पिढी कदाचित आखाड्यात स्वतः उतरु शकते. बाळासाहेब ठाकरेंचा नातू, उद्धव ठाकरेंचे ज्येष्ठ सुपुत्र आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गरज पडल्यास स्वतः निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी यासंदर्भात सूतोवाच केलं आहे. ‘मी कधीच स्वतःला निवडणुकांपासून दूर ठेवलेलं नाही. जर कधी वेळ पडलीच तर मी तयार आहे’ असं आदित्य यांनी म्हटलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने आदित्य ठाकरे प्रचारसभा आणि बाईक रॅली काढत आहेत.
वेगवेगळ्या विषयांवर लोकसभेत येऊन बोलण्याची हिंमत होत नाही : सुशीलकुमार शिंदे

वेगवेगळ्या विषयांवर लोकसभेत येऊन बोलण्याची हिंमत होत नाही : सुशीलकुमार शिंदे

उस्मानाबाद : लोकसभेची निवडणूक जिंकताच संसदेच्या पायरीवर डोके ठेवून नतमस्तक होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता त्याच संसदेची विटंबना करीत आहेत. वेगवेगळ्या विषयांवर लोकसभेत येऊन बोलण्याची त्यांची हिंमत होत नसल्याची टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारार्थ उपळा मा (ता. उस्मानाबाद) येथे मंगळवारी झालेल्या सभेत शिंदे बोलत होते. ते म्हणाले, ""संसदेत पहिल्यांदा प्रवेश करताना पंतप्रधान मोदी यांनी पायरीवर डोके ठेवून नमन केले होते. त्यानंतर अडीच वर्षांच्या कालावधीत हेच मोदी लोकसभेत येऊन बोलायला घाबरत आहेत. ऊठसूट कोणत्याही बाबीची जाहिरातबाजी करण्यावर भर दिला जात आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरात सुमारे सव्वाशे जणांचे प्राण गेले. याला जबाबदार कोण? काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करू, असे आश्‍वासन त्य
मुख्यमंत्री हे गुंडांचे कॅप्टन – रामदास कदम

मुख्यमंत्री हे गुंडांचे कॅप्टन – रामदास कदम

औरंगाबाद, दि. 13 -  राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडांना पक्षात प्रवेश दिला आहे. ते चारही बाजूंनी गुंडांना सोबत घेऊन चालतात ते गुंडाचे कॅप्टन आहेत असा आरोप पालकमंत्री रामदास कदम यांनी आज औरंगाबादेत केला. मुख्यमंत्री सध्या शोले सिनेमातील गब्बरच्या भूमिकेत असल्याचा चिमटा त्यांनी यावेळी काढला. पालकमंत्री कदम म्हणाले, शिवसेनेची औकात दाखविण्याचा कुणातही दम नाही पण मुंबई मनपाची निवडणुक होऊ द्या, शिवसेनेन टेकू काढल्यावर भाजपची औकात दिसेल. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपाच्या तोंडाला फेस आणला असून भाजप नेस्तानाबूत झाल्याशिवाय राहणार नसल्याचे भाकीत त्यांनी केले. ज्यांनी शिवसेनेचे बोट धरून आपल्या पक्षाची व्याप्ती वाढविली तेच शिवसेना संपविण्याची भाषा करीत आहेत. भाजपा हा पक्ष कपटी असून अशा मित्रा पेक्षा दुश्मन बरा आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या होत असताना केवळ शिवसेनेने त्यांच्या कुट
‘शिवसेना नेत्यांनी मनी लॉण्डरिंग केलं’

‘शिवसेना नेत्यांनी मनी लॉण्डरिंग केलं’

मुंबई : भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना संपत्ती जाहीर करण्याचं आव्हान दिलं आहे. किरीट सोमय्या यांनी सात कंपन्यांची यादी जाहीर केली असून या कंपन्यांशी असलेले लागेबांधे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावे, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. सात कंपन्यांपैकी 2 कंपन्यांवर सेबीने बंदी घातली असून 2 कंपन्यांमध्ये छगन भुजबऴांनी पैसे गुंतवले असल्याची माहिती सोमय्यांनी दिली. शिवाय पंतप्रधान मोदींनी बोगस कंपन्यांविरोधात टास्क फार्स नेमला म्हणून उद्धव ठाकरे मोदींवर टीका करत असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं नाही तर सर्व कागदपत्र माध्यमांना देणार असल्याचा इशाराही सोमय्यांनी दिलाय. त्यामुऴे आता उद्धव ठाकरे आपल्या सभेत सोमय्यांच्या आरोपांना काय उत्तर देतात, हे पाहावं लागेल. दरम्यान किरीट सोमय्यांनी त्यांची संपत्ती वेबसाईटव
उद्धव ठाकरेंचा घणाघात, लाचारी शिवसेनेच्या स्वभावात नाही

उद्धव ठाकरेंचा घणाघात, लाचारी शिवसेनेच्या स्वभावात नाही

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले आहेत. दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी भाजपचा कारभार, सत्तेत मित्रपक्षांना दिली जाणारी वागणूक याबाबत सविस्तर भाष्य केलं. भाजप मुस्कटदाबी करत असल्याचा आरोपही उद्धव यांनी केला. लाचारी पत्करणं शिवसेनेच्या स्वभावात नाही. समविचारी पक्ष म्हणून आम्ही 25 वर्ष युतीत राहिलो. मात्र आमची फसवणूक झाली, असा दावाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. मध्यावधी निवडणुका झाल्याच तर केंद्रात आणि राज्यात परिवर्तन होईल, असे संकेत त्यांनी दिले. युती खरं तर विधानसभा निवडणुकीच्या वेळीच तुटली होती. तेव्हा त्यांनी चर्चेचं गुऱ्हाळ घालून हा डाव साधला होता, पण शिवसेनासुद्धा लेचीपेची नाही हे त्यांना दाखवून दिलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘देशात लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या. मोदींचं वारं होतं. सत्ता