Sunday, January 20

राजनिति

आमची सायकल ट्युबलेस, कधीच पंक्चर होत नाही : अखिलेश यादव

आमची सायकल ट्युबलेस, कधीच पंक्चर होत नाही : अखिलेश यादव

नवी दिल्ली, आमची सायकल ट्युबलेस आहे. त्यामुळे ती कधीच पंक्चर होत नाही, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेचा कौल आणि निवडणुकीचा निकाल स्वीकारतो. यावेळी अखिलेश यादव यांनी कार्यकर्त्यांचेही आभार मानले आहेत. ते म्हणाले, भाजप सरकार आमच्या पेक्षाही चांगलं काम करेल, अशी अपेक्षा करतो. मायावतींनी जर एश्टबाबत प्रश्न उपस्थित केले असतील, तर सरकारने त्याची चौकशी केली पाहिजे. बुलेट ट्रेनसाठी जनतेनं भाजपाला मतदान केलं. नवं सरकार सपापेक्षा चांगलं काम कसं करणार हे मला पाहायचं आहे. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांसह देशातील शेतकऱ्यांचं कर्ज आता माफ होईल, अशी अपेक्षा करतो. शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं, तर आनंदच होईल, असं म्हणत त्यांनी भाजपावरही निशाणा साधला आहे. 5 वर्षांत उत्तर प्रदेशला प्रगतिपथावर नेण्याचा प्रयत्न केला. काँग्रेससोबत आघाडी कायम ठेवू, असंही
पक्ष चालवायला महापालिकेचा पैसा लागत नाही- मुख्यमंत्री

पक्ष चालवायला महापालिकेचा पैसा लागत नाही- मुख्यमंत्री

ठाणे, दि. 19 - पक्ष चालवण्यासाठी आम्हाला महापालिकेचा पैसा लागत नाही, भाजपात व्यावसायिक कार्यकर्ते नाहीत, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. तसेच महापालिका हे दुकान नाही, तर ते लोकसेवेचे साधन आहे, असंही ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाण्यातील पाचपाखाडीत सभा घेतली. त्या सभेत ते बोलत होते. आज आनंद दिघेंची शिवसेना राहिलेली नाही. ही स्वार्थी लोकांची शिवसेना आहे, एकेका घरात 4-4 तिकिटे वाटली गेली आहेत, असा आरोपही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. स्वराज्याला सुराज्याकडे नेण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. राजाच्या मुद्रेपेक्षा त्याचा लौकिक वाढला पाहिजे, हे शिवरायांनी सांगितले. पण तसे होताना दिसून येत नसल्याची खंतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आणीबाणीवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार तरी
नोटाबंदी फक्त जनतेसाठी, पैसा मात्र भाजपकडे: राज ठाकरे

नोटाबंदी फक्त जनतेसाठी, पैसा मात्र भाजपकडे: राज ठाकरे

मुंबई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात मी नाशिकला दत्तक घेणार. पण ज्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतले ते नाशिकला काय दत्तक घेणार असा खोचक सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. नोटाबंदी फक्त जनतेसाठी असून पैसा मात्र भाजपकडे आहे. जाहिरातींवर भाजप कोट्यावधी रुपये खर्च करत असून हे पैसे आले कुठून असा सवालच त्यांनी भाजपला विचारला. दादरमधील कबुतरखाना परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी प्रचारसभा घेतली. या सभेत राज ठाकरे यांनी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीका केली. दादरमधील सभेसाठी मैदान मिळावे यासाठी मनसेचे प्रयत्न सुरु होते. पण ते मैदान शिवसेनेने सभेसाठी घेऊन ठेवल्याने मनसेला मैदान मिळाले नव्हते. या घटनेचा दाखला देत राज ठाकरेंनी सभेतील भाषणाला सुरुवात केली. शिवसेनेने मैदानाच्या बाबतीत अडवणूक केली पण म्हणून आम्ही सभ
राहुल गांधींसह काँग्रेस कार्यकर्त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ -गडकरी

राहुल गांधींसह काँग्रेस कार्यकर्त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ -गडकरी

नागपूर, शहराचा विकास होत आहे. मोठे उद्योग येत असल्याने मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत. काँग्रेसने गेल्या ४० वषार्ंत उद्योग नाही आणि रोजगार निर्माण करून दिले नाही. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा राहुल गांधी जरी आमच्याकडे आले तरी त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. दक्षिण पश्चिमच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गडकरी यांची रामबागमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आतापर्यंत ९ हजार ८७० युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. येणाऱ्या काळात मिहानमध्ये ५० हजार रोजगार मिळून दिला जाईल. गेल्या ४० वर्षांत उद्योग आणले नाही आणि रोजगार उपलब्ध करुन दिले नाही त्यामुळे मोठय़ा प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. भाजप सरकारने कौशल्य विकास प्रशिक्षणाची सोय करून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू
कोणालाही समर्थन देणार नाही, हे लिहून देतो : शरद पवार

कोणालाही समर्थन देणार नाही, हे लिहून देतो : शरद पवार

मुंबई, दि. 18 - शिवसेनेने पाठिंबा काढल्यानंतर राज्यातील भाजपा सरकार अल्पमतात आले तर, आम्ही पाठिंबा देणार नाही. हे मी लिखित मध्ये लिहून द्यायला तयार आहे. पण तसेच शिवसेनेनेही पाठिंबा काढणार हे लिहून द्यावे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. शनिवारी  पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले. “मी कोणालाही समर्थन देणार नाही हे लिहून देतो. तसंच शिवसेनेनेही लेखी स्वरुपात द्यावं, असं आव्हान  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलं आहे. शिवसेनेने मुंबई आणि अऩ्य महापालिका निवडणुकीसाठी भाजपा बरोबरची युती तोडली आहे. दोन्ही पक्ष दररोज परस्परांवर टोकाची टीका करत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपा बरोबर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने सरकार नोटीस पिरीयडवर असल्याचे विधान केले आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना सरकारचा पाठिंबा काढणार असल्याची चर्चा आहे
सभेला कोणीच नाही, सभा सोडून मुख्यमंत्री रवाना!

सभेला कोणीच नाही, सभा सोडून मुख्यमंत्री रवाना!

पुणे, दि. १८ -  महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने प्रचारसभांचा सपाटा लागला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरमात्र पुण्यातील सभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. सदाशिव पेठेतील टिळक रोडवर आयोजित करण्यात आलेल्या सभेकडे नागरिकांनी पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण मैदान मोकळं पडलं आणि मुख्यमंत्र्यांना सभा रद्द करावी लागली. कोणत्याही मुद्यावर मत व्यक्त करण्यात पुढे असलेल्या नेटीझन्सनी याच मुद्यावरून चांगलीच खिल्ली उडवली आहे. ट्विटर, फेसबूकसह व्हॉट्सअॅपवरही बरेच विनोद फिरत आहेत. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून सभा रद्द झाल्याची घोषणा केली. त्यानंतर अनेकांनी त्या ट्विटवरच खुमासदार सैलीत उत्तर देत मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली. गर्दीच नसल्याने सभाच गुंडाळण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढावली. सदाशिव पेठेतील टिळक रोडच्या सभेकडे पुणेकरांनी पाठ फिरवल्याने, मुख्यम
भ्रष्टाचार करु दिला नाही म्हणून काही जणांनी पक्ष सोडला : राज ठाकरे

भ्रष्टाचार करु दिला नाही म्हणून काही जणांनी पक्ष सोडला : राज ठाकरे

नाशिक : सभेतली गर्दीच आपला विजय निश्चित करत आहे, भाजपने पैसे फेकले आणि ते गेले, पण ते एकटेच गेले आहेत, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्ष सोडणाऱ्यांना ठणकावलं. नाशिक महापालिकेवर पाच वर्षात भ्रष्टाचाराचा एकही दाग नाही, हे झालं म्हणूनच काही जणांनी पक्ष सोडला, असंही राज ठाकरे म्हणाले. नाशिक म्हणजे मनसेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची विराट प्रचार सभा पार पडली. सभेला नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. याच सभेत राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या ‘माझा शब्द’ या जाहीरनाम्याचंही प्रकाशन करण्यात आलं. काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणेच भाजप-शिवसेनेलाही सत्तेचा आणि पैशाचा माज आला आहे, असा घणाघात राज ठाकरेंनी केला. शिवसेना-भाजपने एकट्या नाशिकमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 88 उमेदवार दिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
शिवसैनिक ठरवतील फडणवीस सरकारची डेडलाईन – आदित्य ठाकरे

शिवसैनिक ठरवतील फडणवीस सरकारची डेडलाईन – आदित्य ठाकरे

मुंबई, महापालिका निवडणूक जशजशी जवळ येत चालली आहे त्यानुसार आरोपांची धार तीव्र होत चालली आहे. शिवसेना भाजपाचं तर सख्खा मित्र पक्का वैरी अशी काहीशी परिस्थिती झाली असल्याचं दिसत आहे. एकीकडे भाजपा शिवसेनेवर आरोप करत आहे, तर इकडे त्यांच्या आरोपांना उत्तर देताना शिवसेना नवनवे आव्हान देत आहे. आरोप - प्रत्यारोपांची ही मालिका वाढत चालली असताना युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांनी राज्यातील फडणवीस सरकारच्या नोटीस पीरिअडची डेडलाईन शिवसैनिकच ठरवणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. मुंबईत पार पडलेल्या रॅलीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली असून 'फक्त मंत्रीपद मिळालं म्हणून काही जणांना मुंबई माहिती झाली आहे. नाहीतर अनेकांना मुंबई माहिती तरी होती का?', असा टोला हाणला आहे. 'निवडणूक लढवायला मी कधीच नकार दिला नाही. जर मध्यावधी
महापालिका हातात द्या, पुण्याचा कायापालट करतो – राज ठाकरे

महापालिका हातात द्या, पुण्याचा कायापालट करतो – राज ठाकरे

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्याच्या प्रचारसभेतही शिवसेना-भाजपवर जोरदार हल्ला चढवला. महापालिका निवडणुकीनिमित्त शिवसेना-भाजपमधली भांडणं सुरु आहेत. याचा सर्वसामान्यांशी संबंध नाही. लोकांचं लक्ष्य आपल्यावर कायम राहावं यासाठी त्यांची ही नाटकं सुरु असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. 1952-2017 एवढ्या काळात भाजपला अजून स्वतःचे उमेदवार सापडत नाहीत, असं सांगून राज ठाकरे म्हाणाले की, ”नाशिकमध्ये भाजपनं 77 गुंडांना निवडणुकीचं तिकीट दिलं. निष्ठावंतांना डावलून गुंडांना तिकीट देण्यासाठी पुण्यात बिल्डरचा भाजपवर दबाव आहे. तोच इथलं तिकीट वाटप करतो,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मुंबईतल्या शिवस्मारकाच्या भूमीपूजन कार्यक्रमाचा उल्लेख करुन राज ठाकरेंनी शिवसेनेला लक्ष्य केलं. राज ठाकरे म्हणाले की, ”शिवस्मारकाच्या भूमीपूजनावेळी उद्धव ठाकरे आणि मोदी एकाच बोटीवर गेले, पण मोदींनी त्यांच्
व्हॅलेंटाइन डे मुंबईकरांसोबत 21 फेब्रुवारीला साजरा करू – मुख्यमंत्री

व्हॅलेंटाइन डे मुंबईकरांसोबत 21 फेब्रुवारीला साजरा करू – मुख्यमंत्री

मुंबई, दि. 16 - महापालिका निवडणुकांनंतर शिवसेनेसोबत जाण्याची गरज पडणार नाही. कुणी कितीही टीका करो, महापालिकेत महापौर आमचाच बसेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आम्ही व्हॅलेंटाइन डे 21 फेब्रुवारीला मुंबईकरांसोबत साजरा करणार आहोत. माझा कट्टावर देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, निवडणुकांनंतरही शिवसेना पाठिंबा काढणार नाही, पाच वर्षे युतीचं सरकार सत्तेत राहील आणि मीच मुख्यमंत्री राहीन. पारदर्शकतेच्या मुद्द्यामुळे शिवसेनेलाच युती मान्य नव्हती, असा आरोपही त्यांनी केला. तसेच शिवसेनेच्या नोटिशीला मी अजून नोटीस केलेलं नाही, असं म्हणत शिवसेनेला जुमानत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेने घोटाळे केले असतील तर ते मांडावेच लागतील. महापालिकेत भाजपाही शिवसेनेसोबत असली तरी अनेक प्रस्तावांना भाजपाने वेळोवेळी विरोध केला होता. पण शिवसेनेने इतर पक्षा