Saturday, February 23

यात्रा

वाघांचे घर आहे बंधवगर्ह राष्ट्रीय उद्यान

वाघांचे घर आहे बंधवगर्ह राष्ट्रीय उद्यान

वाघांचे गर्ह म्हणून प्रसिद्ध बंधवगर्ह राष्ट्रीय उद्यान मध्यप्रदेश राज्यातील उमरिया जिल्ह्यात स्थित आहे. 1968 साली हे उद्यान स्थापित झाले असून हे सुमारे 437 वर्ग किमी क्षेत्रफळात पसरलेले आहे. येथे सहजरित्या वाघ हिंडताना दिसून येतात. या उद्यानात एक प्रमुख पहाड आहे जे बंधवगर्ह म्हणून ओळखलं जातं. 811 मीटर उंच या पर्वताजवळ लहान-लहान पर्वत आहे. पूर्ण उद्यान साल आणि बांबूच्या झाडांनी सुशोभित आहे. चरणगंगा येथील प्रमुख नदी आहे जी अभयारण्यातून निघते. या क्षेत्रातील पहिला वाघ महाराज मार्तंड सिंग यांनी 1951 साली धरला होता. मोहन नामक या पांढर्‍या वाघाला आता महाराजा ऑफ रीवा येथील महालात सजवलेले आहे. येथील एक वाघीण सीताच्या नावावर सर्वाधिक फोटो घेतले असल्याचे रिकॉर्ड आहे. जेव्हाकी चार्जर नावाच्या एक वाघाला टूरिस्ट गाड्यांच्या जवळ जाऊन काही कृत्य दाखवल्यामुळे प्रसिद्धी मिळालेली आहे. सीता शिकार्‍यांच्या ब
नळदूर्ग किल्ला – एक पर्यटन स्थळ

नळदूर्ग किल्ला – एक पर्यटन स्थळ

ऐतिहासिक पार्श्वभूमी : नळदूर्ग किल्ल्याचं संबंध पुराणकाळातील नल-दमयंतीशी जोडला जातो. नळ राजाने हा किल्ला बांधला. त्याच्या नावावरुन या किल्ल्यास नळदुर्ग हे नाव रुढ झाले. नळदुर्ग हा किल्ला राजा नळ याने आपल्या मुलासाठी बांधला याचा उल्लेख तारीख-ए-फरिश्ता या ग्रंथात आहे. त्यावरुन नळदुर्ग हे नाव रुढ झाले. आदिलशाही राजवटीत शहादुर्ग असे नाव ठेवण्यात आले. परंतू हे नाव प्रचलित होऊ शकले नाही. नळदूर्ग हे ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे संस्मरणीय आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या दुर्गाची नोंद इ.स. ५६७ पासून सापडते. चालुक्य राजा कीर्तीवर्मन याने इ.स. ५६७ मध्ये हा किल्ला नल राजवटीच्या ताब्यातून जिंकला होता. त्यानंतर अनेक राजघराण्यांनी राज्य केले. इ.स. १३५१ मध्ये नळदूर्ग किल्ला बहामनी राज्याच्या ताब्यात गेला. इ.स. १३५१ ते १४८० या काळात मातीच्या भिंतीऐवजी मजबूत दगडी तटबंदीचे बांधकाम करण्यात आले.  बहामनी राज्यांच्या व
भारतीयांची ‘या’ शहराला हनिमूनसाठी सर्वाधिक पसंती!

भारतीयांची ‘या’ शहराला हनिमूनसाठी सर्वाधिक पसंती!

ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाला भारतीयांकडून हनिमून डेस्टिनेशन म्हणून सर्वाधिक पसंती मिळताना दिसते. व्हिएन्ना शहर आपला जाज्वल्य असा इतिहास आणि भव्य राजवाड्यांसाठी ओळखला जातो. व्हिएन्ना पर्यटक बोर्डाच्या जनसंपर्क अधिकारी इसाबेला रुटर यांनी मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सांगितले, व्हिएन्ना शहर तणावपूर्ण वातावरणापासून लांब आहे. राजधानी म्हणून वेगळा अनुभवही मिळतो. 2017 मध्ये 20 ते 30 टक्के किंवा त्याहून अधिक भारतीय पर्यटक व्हिएन्नात येण्याची आशा आहे. 2016 मध्ये सर्वाधिक पर्यटकांनी व्हिएन्नालाच पसंती दिली. त्यामुळे व्हिएन्ना भारतीयांच्या आवडीचं डेस्टिनेशन बनू पाहत आहे. भारतीयांसंबंधी आणखी इंटरेस्टिंग आकडेवारी व्हिएन्ना पर्यटन विभागाकडून देण्यात आली आहे. व्हिएन्नात गेल्यावर 44 टक्के भारतीय फोर स्टार हॉटेल, 19 टक्के फाईव्ह स्टार हॉटेल, तर 25 टक्के भारतीय थ्री स्टार हॉटेलमध्ये राहणं प
जगातील सर्वाधिक उंचीवरचे किब्बर गाव

जगातील सर्वाधिक उंचीवरचे किब्बर गाव

समुद्रसपाटीपासून तब्बल 4850 मीटर म्हणजे साधारण 14 हजार फुटांवर वसलेले हिमाचल प्रदेशातील किब्बर हे जगातील सर्वाधिक उंचीवर वसलेले गाव आहे. हिमाचलच्या स्पिती खोर्‍यात वसलेले किब्बर राजधानी सिमलापासून 430 किमी दूर आहे व येथे जाण्यासाठी खडतर मार्गाचा प्रवास करावा लागतो. स्पितीपासून 12 तासांचा हा खडतर प्रवास सार्थकी लागेल असे निसर्गसौंदर्य या गावाला निसर्गाने बहाल केले आहे. याच गावात जगातील सर्वात उंचावर असलेला बौद्ध मठही आहे. स्पिती नदीच्या उजव्या तीरावर लेसर हे पहिले गाव लागते. स्पिती खोर्‍यातले हे पहिले गाव. तेथून किब्बर 20 किमीवर आहे. चहूकडे बर्फाची चादर व मधून जाणारा रस्ता पाहताक्षणीच मोहात पाडतो. येथे सुमोसारख्या गाडय़ांतून जाता येते. एकदा का या गावात पाऊल टाकले की आयुष्यभर पुरेल इतका ताजेपणा आणि डोळ्यांचे पारणे फिटेल असे निसर्गसौंदर्य लाभतेच लाभते. त्यामुळे या गावाचा विसर पडणे अवघडच. 20
या भागात महिना भर थांबणार दिवस रात्रीचे चक्र

या भागात महिना भर थांबणार दिवस रात्रीचे चक्र

उत्तर ध्रुवावर नॉर्वेचा हिस्सा  असलेला स्लेवबार्ड नावाचा एक  बेटसमूह आहे. हा बेट समूह  आपल्या अनोख्या प्रकारच्या निसर्गासाठी प्रसिद्ध आहे.  जगाच्या बहुतांश भागात  चोवीस तासात रात्रंदिवस  होतात. मात्र इथल्या दिवस  व रात्रीचा कालावधी  अनेक दिवस सुरु असतो. या बेटावर नोव्हेंबरपासून आतापर्यंत रात्र होती  आणि आता तिथे सकाळ झाली आहे. स्लेवबार्ड बेटावर फेब्रवारीच्या महिन्यात "ट्विलाइट सीजन'असतो. म्हणजे  या बेट समूहावर जवलपास एक महिनाभर ना दिवस असतो ना रात्र. या कालावघीत तिथल्या  आकाशाचा रंग संपूर्ण महिनाभर सतत बदलत असतो. त्यामुळे असे वाटते तिथे कधीही सूर्योदय होऊ शकतो, परंतु सुर्याचे दर्शन काही होत नाही. निसर्गाचा हा अद्‍भुत व आट चमत्कार पाहायासाठी तिथे मोठ्या संखयेने पर्यटक येत असतात. यंदाही अनेकांनी तिथे हजेरी लावली आहे. जवळपास सव्वा महिन्याच्या लपाछपीनंतर 6 मार्चला तिथे सूर्य उगवेल. स्लेवबार
विदर्भातील जंगल सफारी

विदर्भातील जंगल सफारी

विदर्भात ताडोबा, पेंच, उमरेड करांडलासारखी अभायारण्ये आहेत. य अभयारण्यांना   भेट देण्यासाठी देश-विदेशातून हजारो पर्यटक नागपूरला येतात. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय  प्राणिसंग्रहालय लवकर झाले तर विदर्भाच्या विकासात मोठी भर पडणार आहे. राजकीय इच्छाशक्ती दाखविली तर हा प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण होईल. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या विकासासाठी निविदा काढली होती. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर प्राणिसंग्रहालाचा विकास करायचा आहे. त्यासाठी महाराष्ट्र वनविकास महामंडळ आणि खासगी गुंतवणूकदारांच्या भागीदारीतून कंपनीची स्थापना केली जाणार आहे. परंतु एकही निविदा प्राप्त न झाल्याने राज्य   सरकारच्या 2019 पर्यंत प्राणिसंग्रहालय विकासाला खीळ बसणार आहे. प्राणिसंग्रहालाच्या विकासासाठी अद्याप निविदा आल्या नाहीत. नागपूर येथील अशफाक अहमद कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड कंपनीला पूर्वीच 1
रेवडीचे पेशवेकालीन ग्रामदैवत श्री खंडोबा

रेवडीचे पेशवेकालीन ग्रामदैवत श्री खंडोबा

पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान, शिखरावरील सोनेरी कळसाचे कोरेगाव तालुक्यातील रेवडी गावचे श्री क्षेत्र मल्हारी म्हाळसाकांत मंदिर हे पेशवेकालीन चिरेबंदी दगडी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. पाली, जेजुरी नंतर श्री खंडोबाचे महात्म्य असणारे रेवडीचे हे ग्रामदैवत. या मंदिराविषयी शिवराज म्हेत्रे, मोहन मोरे आदी ग्रामस्थांनी माहिती दिली. रेवडी या गावाचे मूळ नाव रेवापूर आहे. रेवापूरचे कुलदैवत श्री खंडोबा हे सुळक्याच्या डोंगरावरील विठ्ठलखडी नावाच्या छोट्या टेकडीवर आहे. या ठिकाणी छोट्या देवळात लहान पितळी टाक (मूर्ती) आहे. फार पूर्वी मौजे परतवडी येथील एक भाविक श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी या डोंगरावर येत असे. वयोमानपरत्वे तो थकला. एक दिवस तो या डोंगरावर नेहमीप्रमाणे दर्शनाला आला आणि हात जोडून देवाला म्हणाला, "मी आता म्हातारा झालो आहे, तुझ्या सेवेसाठी, दर्शनासाठी मला येता येणार नाही आपली भेट ही शे
कोका अभयारण्य

कोका अभयारण्य

महाराष्ट्राच्या नकाशावरील अगदी पूर्वेकडच्या कोपऱ्यात असणारा भंडारा जिल्हा 11 लाखांच्यावर लोकसंख्या असलेला आणि नैसर्गिक सौंदर्यासोबतच नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असा हा जिल्हा आहे. एवढ्या छोट्याशा जिल्हातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 1/3 क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. या जिल्ह्यात न्यु नागझिरा, उमरेड कऱ्हांडला आणि कोका अशी तीन अभयारण्ये नव्याने घोषित झाली आहेत. भंडारा – गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या न्यु नागझिरा व नागझिरा अभयारण्याला लागुनच असलेले 10,013 हेक्टर वनक्षेत्र शसनाने 2013 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्याला ‘कोका अभयारण्य’ असे नाव देण्यात आले. ब्रिटीश काळात ‘ओल्ड रिझर्व्ह फॉरेस्ट’ म्हणून जे जंगल ओळखले जात होते त्याच भागाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे. अभयारण्यातील प्राणी : हे अभयारण्य वन्यजीवांसाठी उत्कृष्ट अधिवास असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच या जंगलाला