Saturday, July 21

मुंबई

हुंड्यामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

हुंड्यामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

कळवा, मुंब्रा येथील कौसा मधील मिनार रेसिडेन्सी येथील एका 25 वर्षीय महिलेने आपले पती, सासू व सासरे यांच्या जाचाला कंटाळून बुधवारी (ता. 18) आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी विवाहितेच्या पती, सासू व सासरे यांना अटक केली आहे. मुंब्रा येथील अमृत नगर येथील नासीमा खातून चौधरी (ता. 25) हिचे कौसा मिनार रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या शाबीर अली चौधरी (ता. 26) यांच्या बरोबर 12 फेब्रुवारी 2017 ला विवाह झाला होता. लग्नानंतर पती शाबीर व सासू अमिनुसा, सासरे जुबेर यांनी तिला माहेरहुन पैसे आणण्यासाठी सतत मानसिक, शारीरिक असा क्रुरपणे छळ चालविला होता. अखेर या छळाला कंटाळून नासीमा यांनी आपल्या कौसा येथील राहत्या घरी स्वयंपाक घरातील पंख्याला गळफास लावून बुधवारी आत्महत्या केली. विवाहितेची बहिण शहाबुल्ला चौधरी हीने मुंब्रा पोलिसात हुंडाबळीची तक्रार दाखल केल्या
वसईत गर्भवती महिलेचे बोटीने स्थलांतर

वसईत गर्भवती महिलेचे बोटीने स्थलांतर

वसई, वसईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे एका गर्भवती महिलेला आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्थलातरीत केलं आहे. आशा डिसुजा असं या महिलेच नाव आहे. वसईच्या १०० फूट रोड वरच्या मथूरा इमारतीत ही महिला राहत होती. वसईत वाढता पाऊस आणि साचलेलं पाणी यामुळे तिला काहीं वेळापूर्वी घरातून हलवण्यात आलं. वसई अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या साह्याने महिलेला बाहेर काढलं. महिलेला अॅम्ब्युलन्सच्या मदतीनं नातेवाईकांच्या घरी हलवण्यात आलं आहे. कुठल्याही वेळी तीची प्रसुती होवू शकते त्यामुळं खबरदारी म्हणून तिला हलवण्यात आले. सध्या तिची प्रकृती ठीक आहें.
मुंबईतल्या शाळांना 3 दिवसांची सुट्टी जाहीर

मुंबईतल्या शाळांना 3 दिवसांची सुट्टी जाहीर

मुंबई, मुंबईत आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावरची वाहतूक उशिरानं सुरू आहे. जोरदार पाऊस आणि आणखी 2 दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्यानंतर राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. राज्यात जिथे पाणी साचलं असेल तिथे शांळांना सुट्टी देण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. सकाळी सात वाजेपर्यंत ४ तासात मुंबई शहरात १६२ पूर्व उपनगरात ११२ तर पश्चिम उपनगरात १६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या २४ तासात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रात्रभर मुसळधार बरसल्यावर पहाटेच्या सुमारास पावसानं विश्रांती घेतली. पण साडे सातच्या नंतर मुलुंड, भांडूप, दादर, वडाळा, बोरीवली या उपनगरांमध्ये जोरदार पावसानं पुनरागमन केलं. मुंबईच्या बोरीवलीत गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे रात्री १०च्या सुमारास ३ घरं कोसळल

मुंबईतील समुद्रात वॉटर स्पोर्टस, दोन फ्लोटिंग रेस्टॉरंटस : गडकरी

मुंबई, मुंबईच्या समुद्रात लवकरच एफ वनसारखे वॉटर स्पोर्टस सुरु होणार आहेत. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केलीय. आणखी एक खूषखबर म्हणजे मुंबईतल्या समुद्रांमध्ये लवकरच दोन फ्लोटिंग रेस्टॉरंटस सुरु होणार आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून ही रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार आहे. मुंबईतल्या गेटवे आणि गिरगाव चौपाटीवर ही फ्लोटिंग रेस्टॉरंट सुरू होणार आहेत. नितीन गडकरींनीच यासंदर्भातली माहिती दिलीय. देशातील प्रमुख बंदरातील गोदी कामगारांना दरमहिन्याला ४ हजार ते १६ हजार रुपये वेतनवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. इंडियन पोर्ट असोसिएशन आणि कामगार नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या वेतन काराराला मान्यता देण्यात आली.
भाजपा खासदार गोपाळ शेट्टी राजीनामा देणार?

भाजपा खासदार गोपाळ शेट्टी राजीनामा देणार?

मुंबई, भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. मालवणी येथील सभेत ख्रिश्चनांसंदर्भात केलेल्या विधानामुळे खासदार गोपाळ शेट्टी यांची पक्षाच्या मुंबईतील नेत्यांनी कानउघाडणी केल्यानं गोपाळ शेट्टी नाराज झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे नाराज गोपाळ शेट्टी यांनी थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. मालवणीतील एका सभेदरम्यान शेट्टी यांनी ख्रिश्चनांनी स्वातंत्र्यलढ्यात कोणतंही योगदान दिले नसल्याचे वक्तव्य केले होते. या विधानावरुन त्यांच्यावर चौफेर टीकाही झाली होती. दरम्यान, आपल्या विधानावर ठाम असून पक्षातील पदापेक्षा भाषणस्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, असे सांगत राजीनामा देण्यास तयार असल्याचे गोपाळ शेट्टी यांनी सांगितले आहे. गोपाळ शेट्टी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यानंच असे विधान केल्यानं 2019 च्या निवडणुकीच्या पार्श
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 कोटींच्या रोकडसह एकाला अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 कोटींच्या रोकडसह एकाला अटक

मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिका-यांनी मोठी कारवाई केली आहे. जेट एअरवेजच्या विमानानं पैसे घेऊन जाणा-या एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. भूपेंद्र सिंह या व्यक्ती दुबईत जात असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. 1 लाख 48 हजार 500 अमेरिकन डॉलर म्हणजे 1 कोटी 2 लाख 4 हजार 177 रुपयांची रक्कम त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. कार्डबोर्ड रोलमध्ये गुंडाळून तो पैसे नेत असल्याचं समोर आलं आहे.

मुंबईत सेक्स करताना गर्लफ्रेंडचा मृत्यू, बॉयफ्रेंडला अटक होणार

मुंबई, मुंबईत सेक्स करताना गर्लफ्रेंडचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी बॉयफ्रेंडवर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. हे दोघेही इस्त्रायली नागरिक आहेत. ते मुंबईत आले होते. पोलिसांनी २३ वर्षीय तरूणाला अटक करण्यात येणार आहे. ओरिरन याकोव असे या तरुणाचे नाव आहे. तो गेल्या वर्षी आपल्या गर्लफ्रेंडसोबत मुंबईत आला होता. मुंबईतील कुलाबा भागात असलेल्या एका हॉटेलमध्ये हे दोघे वास्तव्यास होते. टुरिस्ट व्हिसावर ते दोघेही मुंबईत आले होते. हे दोघे हॉटेलमध्ये सेक्स करत असताना त्याच्या गर्लफ्रेंडचा गुदमरून मृत्यू झाला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. ही हत्या आहे का? असा संशय पोलिसांना आधी होता. याप्रकरणी फॉरेन्सिक लॅबने दिलेल्या अहवालानुसार २० वर्षीय मुलीचा मृत्यू सेक्स दरम्यान गुदमरूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ओरिरन याकोवने सेक्स दरम्यान आपल्या गर्लफ्रेंडचा गळा
अनधिकृत बांधकामप्रकरणी पालिकेची अभिनेत्री प्रियांका चोप्राला नोटीस

अनधिकृत बांधकामप्रकरणी पालिकेची अभिनेत्री प्रियांका चोप्राला नोटीस

मुंबई, अनधिकृत बांधकामप्रकरणी अभिनेत्री प्रियांका चोप्राला मुंबई महानगर पालिकेनं नोटीस बजावली आहे. अंधेरी पश्चिममधील ओशिवरा येथील एका व्यापारी संकुलातील जागा प्रियांकानं भाड्यानं दिली आहे. या जागेत अनधिकृतरित्या बांधकाम करण्यात आलं आहे यासाठी पालिकेनं तिला नोटीस बजावली आहे. या व्यापारी संकुलात स्पा आणि सॅलोन आहे. काही स्थानिकांच्या  माहितीनुसार या जागेत सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून काही बदल करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात येथे अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आहे अशी तक्रारही स्थानिकांनी पालिकेकडे केली आहे. अशा प्रकाराच्या पाच तक्रारी स्थानिकांनी केल्यानंतर पालिका अधिकाऱ्यानं या सॅलोनला भेट दिली. अधिकाऱ्यांच्या तपासणीत येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्याचप्रमाणे पालिका अधिकाऱ्यांनी वास्तु प्रिसिंक्ट बिल्डिंगमधील प्रियांकाच्या ऑफिसलाही भेट दिली. प्रियांका
कलिना येथे डबल डेकर बसची रेलिंगला धडक

कलिना येथे डबल डेकर बसची रेलिंगला धडक

मुंबई, सांताक्रुझ येथील कलिना परिसरात डबल डेकर बसने रेलिंगला धडक दिली असून या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. सांताक्रूझमध्ये कलिना विद्यापीठाजवळ हा अपघात घडला आहे. प्राथमिक माहितीनुसार ‘बेस्ट’ची डबल डेकर बस वांद्रे येथून मुंबई विद्यापीठाच्या दिशेने जात होती. कलिना विद्यापीठाजवळ बसने ओव्हरहेड रेलिंगला धडक दिली. यात बसच्या समोरील भागाचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. सांताक्रूझजवळ खोळंबलेल्या प्रवाशांसाठी बेस्ट प्रशासनाने जादा बसेस सोडल्या आहेत. ही बसही खोळंबलेल्या प्रवाशांना घेऊन जात होती. दरम्यान, बेस्टने ८४ जादा बसेस सोडल्या असून बोरिवली आणि वांद्रे या भागातही बसेस सोडण्यात आल्या आहेत.
अंधेरीत पूल कोसळून पाच जखमी; रेल्वेसेवा ठप्प

अंधेरीत पूल कोसळून पाच जखमी; रेल्वेसेवा ठप्प

मुंबई, अंधेरी येथे पादचारी पूल रेल्वेवर कोसळल्याने पाच जण जखमी झाले असून, त्यातील दोघे गंभीर आहेत. त्यामुळे पश्‍चिम रेल्वेचे वाहतूक अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. तर सतत सुरु असलेल्या पावसाने मध्य रेल्वेही ठप्प पडली असून, रस्ते वाहतूकही धीम्या गतीने सुरु होती. अंधेरी येथे रेल्वेवरील पादचारी पूल आज सकाळी पडला. त्यामुळे ऐन वर्दळीच्या वेळी रेल्वे वाहतूक ठप्प पडली. नंतर काही काळाने चर्चगेट ते वांद्रे आणि गोरेगाव ते विरार वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र, यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. पूर्व पश्‍चिम जोडणारा हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर रस्त्यांवरही वाहनांची प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. अंधेरी स्थानकाच्या फलाट क्रमांक सात आणि आठवर या पुलाचा भाग कोसळला. यात पाच जण जखमी झाले असून, त्यातील सिंह (48) आणि एक 60 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर विलेपार्ले येथील अतिदक्ष