Sunday, January 20

महाशिवरात्री

देवांचा देव महादेव

देवांचा देव महादेव

शिवशंकराला देवांचा देव महादेव मानतात. महादेवाचे मंदिर नाही, असे गाव भारतात शोधून देखील सापडणार नाही. देशभरातील प्रत्येक प्रांतात शिवशकंराची आराधना केली जाते. 'हर हर महादेव...', अशा जयघोषात शिवाचे भाविक तल्लीन होऊन जातात. सदाशिव, सांब, महेश, मंगेश, गिरिजापती, पार्वतीपती, भूतनाथ, नीलकंठ, चंद्रमौली, आशुतोष व महादेव असे नामस्मरण करून भाविक चराचरात सामावलेल्या शिवशंकराचा धावा करीत असतात. शिव हे दैवत मंगलमय, कल्याण करणारे असून त्यांच्यावर भाविकांची अपार श्रध्दा आहे. शिवकृपेने जीवनात कोणत्याच प्रकारचे दुःख येत नाही, अशी श्रद्धा आहे. ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता आहे. विष्णू सृष्टीचा पालनकर्ता. शंकर तिचे संरक्षण करणारा आहे. यामुळेच भोलेनाथाला 'कैलासनिवासी' असे म्हटले जाते. 'आशुतोष' म्हणचे तत्काळ संतुष्ट होणारे. शिव तसाच आहे. समुद्र मंथनात निघालेले विष स्वत: प्राशन करून जगाचे कल्याण करणार्‍
महाशिवरात्रीची पूजन विधी

महाशिवरात्रीची पूजन विधी

महाशिवरात्रीला शंकराची पूजा करण्यात येते. त्यासाठी प्रथम पूजा करणार्‍याने स्नान करून कोरे किंवा धुतलेले शुद्ध वस्त्र घालून मस्तकावर टिळा लावावा आणि शुभ मुहूर्तावर पूजा सुरू करावी. आसनावर बसून पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून पूजा करावी. येथे आम्ही या पूजेच्या विधीची माहिती देत आहोत. पंचदेव पूजन  पंचदेव पूजनासाठी प्रथम देवतांचे ध्यान करून त्यांची पूजा करा... विष्णूचे ध्यान  उद्यत्कोटिदिवाकराभमनिशं शंख गदां पंकजं चक्रं बिभ्रतमिन्दिरावसुमतीसंशोभिपार्श्वद्वयम्‌। कोटीरांगदहारकुण्डलधरं पीताम्बरं कौस्तुभै- र्दीप्तं श्विधरं स्ववक्षसि लसच्छीवत्सचिह्रं भजे॥ ॐ श्री विष्णवे नमः,ध्यानार्थे अक्षतपुष्पाणि समर्पयामि । ॐ विष्णवे नमः, पाद्यं, अर्घ्यं, आचमन्यं, स्नानं समर्पयामि। शिवाचे ध्यान ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारूचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांग परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन
शिवशंकराला महाकाळ का म्हणतात?

शिवशंकराला महाकाळ का म्हणतात?

भगवान शिवशंकराला अनेक नावांनी ओळखले जाते. शिवाला महाकाळही म्हटले जाते. काळांचा काळ भगवान शिव हा सृजनाचा अधिपती आणि मृत्यूचा देवही आहे. शिवाला सृजन आणि विनाश दोन्हींचा ईश्वर म्हटले जाते. शिवाला शरीरातील प्राणाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे पंच देवांमध्ये शिवाचे स्थान महत्त्वाचे आहे. शरीरात प्राण नसेल तर शरीराला शव म्हणतात. त्यात प्राण आले की शरीराचे शिव बनते. शिव निसर्गदेवता आहे. शिवपूजा आणि शिवशृंगारात वापरण्यात येणारी सामुग्रीही निसर्गात सहज मिळणारी असते. शिव मृत्यूदेवता आहे. त्रिदेवात शिवाचे रूप संहारक म्हणून आहे. ब्रह्मा सृष्टी रचेता, विष्णू पालनकर्ता आणि शिव संहारक असे वर्णन केले जाते. परंतु शिव संहारक असूनही सृजनाचे प्रतिक आहे. शिव सृजनाचा संदेश देणारा आहे. प्रत्येक संहारानंतर सृजनाला सुरूवात होत असते. पंचतत्त्वात शिवाला वायूचा अधिपतीही मानले गेले आहे. या वैशिष्ट्यांमुळेच शिवशंकराला
महा‍शिवरात्रीला या पदार्थांनी करा अभिषेक, मिळवा इच्छित फळ

महा‍शिवरात्रीला या पदार्थांनी करा अभिषेक, मिळवा इच्छित फळ

महाशिवरात्रीला या पदार्थांनी महादेवाचे अभिषेक करा आणि इच्छित फळ मिळवा. भिन्न-भिन्न फळ प्राप्तीसाठी भिन्न पदार्थाने अभिषेक करावे. * पाण्याने रुद्राभिषेक केल्याने सुख- शांती लाभते. * कुशोदक अर्थात कुश घास टाकलेल्या पाण्याने अभिषेक केल्याने पाप नाहीसे होतात आणि व्याधी बरी होते. * दह्याने अभिषेक केल्याने पशू प्राप्ती होते. * उसाच्या रसाने अभिषेक केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते. * मधाने अभिषेक केल्याने धन-धान्य आदीची प्राप्ती होते. * आरोग्य समृद्धीसाठी गौघृतने अभिषेक करावे. * मोक्ष प्राप्तीसाठी तीर्थ जलाने अभिषेक करावे. * दुधाने अभिषेक केल्यास पुत्र-पुत्रादि प्राप्ती होते. * ताप शांत करण्यासाठी ताकाने अभिषेक करावे. * गोड गौदुधाने अभिषेक केल्याने बुद्धीची जडता नष्ट होते. * शत्रुनाश करायचा असेल तर मोहरीच्या तेलाने अभिषेक करावे. * संतान कामनेसाठी गोड पाण्याने अभिषेक करावे. तसे सं