Sunday, January 20

महाराष्ट्र

पुण्यातून लोकसभेसाठी माधुरी दीक्षितला उमेदवारी?

पुण्यातून लोकसभेसाठी माधुरी दीक्षितला उमेदवारी?

पुणे, भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यातून खासदारकीच्या उमेदवार म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पुण्यात पक्षाकडे अनेक सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे पक्ष दीक्षित यांच्या उमेदवारीचा विचार करणार नाही, असे मत भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे. लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. इच्छुकांच्या उमेदवारीच्या चर्चा जोरात सुरू आहेत. विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्यासह पक्षात किमान तीन-ते चारजण इच्छुक आहेत. या पार्श्‍वभूमीवर माधुरी दीक्षित यांच्या नावाची चर्चा दिल्लीतून सुरू झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई भेटीत दीक्षित यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. हा संदर्भ असल्याने दीक्षितांच्या नावाच्या चर्चेला विशेष महत्व आहे. दीक्षित यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर पक्षातील इच्छुकांम

हजार रुपयांसाठी पुत्राने केला मातेचा खून

रावेर, पाल (ता. रावेर)  येथील स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीचा पोटच्या मुलानेच एक हजार रुपयांसाठी मित्राच्या मदतीने निर्घृणपणे खून केला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना काल (ता. २३) उघडकीस घडली. मृत महिलेचे नाव सुशीलाबाई भगवान भोई (वय ७०) असे आहे. या महिलेचे जावई चिंधू भोई (रा. पाडळसा, ता. यावल) भेटण्यासाठी आले असता त्यांना घराला कुलूप व कुजट वास येत असल्याने संशय आला. याबाबत पोलिसांना माहिती दिली. सपोनि जितेंद्र जैन व हवालदार संदीप धनगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. रावेर येथील पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सपोनि जैन यांनी तपास चक्रे फिरवली. दरम्यान पाल येथील घटनास्थळी श्‍वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. मृत महिलेस संतोष भगवान भोई हा एकुलता एक मुलगा व सहा मुली आहेत. आज दुपारी येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. बी बी बारे

महिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी; त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

परभणी, महिलेच्या त्रासाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिला वारंवार शरीरसुखाची मागणी करत असल्यानं तरुणानं राहत्या घरी गळफास लावून स्वत:चं जीवन संपवलं आहे. पोलिसांना तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. परभणीतील करुणा अपार्टमेंट राहणाऱ्या तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत त्यानं एका महिलेच्या नावाचा उल्लेख केला आहे. संबंधित महिला वारंवार आपल्याकडे शरीरसुखाची मागणी करत असल्यानं त्या त्रासाला कंटाळून आपण जीवन संपवत असल्याचं त्यानं चिठ्ठीत म्हटलं आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

होस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

जळगाव, आदिवासी होस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ही घटना घडल्याचं समोर येतंय. योगेश आजऱ्या पावरा असं मयत विद्यार्थ्याचं नाव आहे. पण ही दुर्घटना नेमकी घडली कशी? याबाबतीत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम दिसून येतोय. अजाणतेपणी ही घटना घडली? की ही आत्महत्या आहे? की कुणी जाणून बुजून घडवून आणलेला घातपात? याबाबत घटनास्थळी चर्चा सुरू आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. विद्यापीठामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण दिसून येतंय. वसतिगृह अधीक्षक जागेवर नसल्याने विद्यार्थी संतप्त झालेत.
पेट्रोलपाठोपाठ डिझेलही चार रुपयांनी स्वस्त होणार : देवेंद्र फडणवीस

पेट्रोलपाठोपाठ डिझेलही चार रुपयांनी स्वस्त होणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल प्रति लिटर पाच रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता डिझेलचे दरही आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारने पेट्रोलवरील कर कमी करताना डिझेलच्या कराला हात लावला नव्हता. त्यामुळे राज्यात पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल फक्त अडीच रुपयांनी स्वस्त झाले होते. याउलट गुजरातसह अनेक राज्यांनी डिझेलही स्वस्त केले. यावरुन काँग्रेससह विरोधकांनी फडणवीस सरकारवर तुफान टीका केली होती. कदाचित याचीच दखल घेत सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. डिझेलही प्रति लिटर आणखी दीड रुपयांनी स्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचे फडणवीस म्हणाले. ‘इंधनांच्या दराबाबत सरकार काहीच करु शकत नाही’, हा पवित्रा धारण केलेल्या केंद्र सरकारने गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलवरील करआकारणीत कपात केली. इंधनावर आकारले जाणारे केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्यात आले असून प्रत

पिंपरीत भूताची भीती दाखवत चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार

पिंपरी, पिंपरीत चार वर्षांच्या मुलीला भूताची भीती दाखवत निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. पिंपरीतील नागसेन झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या चार वर्षांच्या मुलीला मंगळवारी संध्याकाळी एका नराधमाने भूताची भीती दाखवत निर्जनस्थळी नेले. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास त्याने मुलीला निर्जनस्थळी नेले. यानंतर नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. जवळपास अडीच तासानंतर पीडित मुलगी घरी परतली. घरी परतल्यावर तिने वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पीडित मुलीवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी हा तडीपार गुंड असल्याचे समजते. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांन
प्लॅस्टिक बंदी कायम, आता मुदतवाढ नाही तर कडक कारवाई होणार

प्लॅस्टिक बंदी कायम, आता मुदतवाढ नाही तर कडक कारवाई होणार

मुंबई, राज्यात प्लॅस्टिक बंदी कायम असून यापुढे व्यापाऱ्यांना प्लॅस्टिक वापरास मुदतवाढ दिली जाणार नाही. प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करुन राज्यातील प्लॅस्टिक बंदीची मोहिम काटेकोरपणे राबविण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. मंत्रालयात राज्यातील प्लॅस्टिक बंदी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पर्यावरण प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, पर्यावरण विभागाचे सर्व आधिकारी उपस्थित होते. प्लॅस्टिक बंदी मोहिम सुरु असून व्यापाऱ्यांना आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना तीन महिन्यांची मुदत दिली होती. ती संपत असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच वैयक्तीक कारवाईची मोहिम सुरु करावी असे ही रामदास कदम यांनी यावेळी आदेश दिले आहेत. २३ जूनला राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली होती. पण त्यानंतर ही किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांकडून प्लास्टिक पिशव्यांच

खाऊ देण्याच्या बहाण्याने चिमुरडीला झुडपात नेले, मारहान करून केला बलात्कार

पुणे, पाषाण परिसरातील साेमेश्वरवाडीत खाऊ देण्याच्या बहाण्याने तीनवर्षीय मुलीवर तिच्या अाेळखीतील तरुणाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस अाली. याप्रकरणी पाेलिसांनी शंभुकुमार दुखी राय (२१, बिहार) नामक तरुणास अटक केली अाहे. शनिवारी दुपारी ५.३० वाजेच्या सुमारास पीडित मुलगी घराजवळ खेळत हाेती. त्या वेळी तिच्या गावाकडील अाेळखीच्या शंभुकुमारने तिला कुरकुरे खाण्यास दिले आणि त्या भागातील वृद्धाश्रमामागील झुडपात नेले. तिथे तिला मारहाण केली आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कारही केला. त्यानंतर तिला घटनास्थळी टाकून आरोपी पळून गेला. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर चतु:शृंगी पाेलिसांनी अाराेपीचा शाेध घेत त्यास ताब्यात घेतले. याबाबत पुढील तपास पाेलिस निरीक्षक (गुन्हे) वैशाली गलांडे करत अाहेत.

कौटुंबिक वादातून जावयाचा पत्नीसह सासू-सासऱ्यांवर हल्ला, सासऱ्याचा मृत्यू

इचलकरंजी, इचलकरंजीत कौटुंबिक वादातून जावयाने पत्नी आणि सासू- सासऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू झाला असून सासू आणि पत्नीची प्रकृती गंभीर आहे. हल्ल्यानंतर जावई पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरातील कोरवी गल्लीत धोंडीराम रावण, त्यांची पत्नी राधा रावण राहतात. धोंडीराम यांची मुलगी रुपाली पाटीलचे अनिल पाटील याच्याशी १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते. धोंडीराम आणि अनिल यांचे घर जवळच आहे. रुपाली आणि अनिलला पाच वर्षांची मुलगी देखील आहे. अनिल पाटील आणि रुपालीमध्ये वाद सुरु आहे. रविवारी देखील त्यांच्यात वाद झाला होता. रुपाली तिच्या माहेरी गेली होती. रात्री उशिरा अनिल धोंडीराम यांच्या घरी गेला. त्याने सासरे धोंडीराम, सासू राधा आणि पत्नी रुपाली या तिघांवर कोयत्याने वार केले. सुदैवाने या हल्ल्यातून त्याची पाच वर्षांची मुलगी ब

प्रिन्सीपलनेच विद्यार्थ्याला दाखवला अश्लिल व्हिडीअाे

पुणे, वानवडी परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्रिन्सीपलने महिला कॉऊन्सरलच्या मदतीने १४ वर्षीय विद्यार्थ्याला अश्लिल व्हिडीओ दाखवून त्याच्याशी अश्लिल चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात प्रिन्सिपल आणि महिला काँऊन्सिलरविरूध्द पास्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विन्सेंट परेरा आणि महिला कॉऊन्सरल जॅकलिन वॉस अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत विद्यार्थ्याच्या पालकाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा गुन्हा १० ते १२ मार्च २०१८ च्या दरम्यान प्रिन्सिपलच्या कार्यालयात आणि रेस्टरूममध्ये घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा १४ वर्षाचा मुलगा आरोपीच्या शाळेत शिक्षण घेत आहे. आरोपी विन्सेंट परेराने पिडीत मुलाला अश्लिल व्हिडीओ दाखवून त्याच्याशी वेळावेळी अश्लिल चाळे केले. ही घटना महिला कॉऊन्सलर जॅकलिन वॉस यांना माहि