Saturday, February 23

बॉलीवुड

सुपरस्टार रजनीकांत वळणार राजकारणाकडे?

सुपरस्टार रजनीकांत वळणार राजकारणाकडे?

चेन्नईः दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यांनी अलीकडेच केलेल्या एका वक्तव्यामुळे ही चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी 'ताकद' विषयावर केलेल्या वक्तव्यामुळे तामिळनाडूत खळबळ माजली आहे. पण यावर स्पष्टीकरण देताना आपण 'ताकद' शब्दाचा प्रयोग अध्यात्मावर बोलताना केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रजनींकात स्वत:चा राजकीय पक्ष निर्माण करतील असे अंदाज लावले जात आहेत. यासाठी दक्षिण भारतात पोहचण्याचा प्रयत्न करु पाहणा-या भाजपाची साथ त्यांना मिळू शकते. तामिळनाडूतील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रजनीकांत नाराज असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावरील अनेकांनी याचा संबंध जयललितांच्या निधनाशी जोडला असून त्यामुळेच ते नाराज असल्याचा दावा केला आहे. तामिळनाडूत जयललिता यांच्यानंतर चिनम्मा यांचे राज्य असणार असून त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे. रजन
अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी 2’ विरोधात हायकोर्टात याचिका

अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी 2’ विरोधात हायकोर्टात याचिका

हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी-2’ या सिनेमाविरोधात याचिका दाखल झाली आहे. सिनेमात वकिली व्यवसायाची आणि न्यायालयीन प्रक्रियेची थट्टा करण्यात आल्याचं याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान औरंगाबाद खंडपीठाचे ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. जे. दीक्षित, आर. एम. धोर्डे आणि डॉ. कानडे यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून समितीने सिनेमा पाहून 3 फेब्रुवारी रोजी अहवाल द्यावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. अॅड. अजयकुमार वाघमारे, अॅड. पंडितराव आनेराव यांनी ‘जॉली एलएलबी 2’ विरोधात याचिका दाखल केली आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये वकील न्यायालयात पत्ते खेळतात, न्यायमूर्तींच्या डायसवर धावून जातात, न्यायमूर्तींसमोर हाणामारी आणि बीभत्स नृत्यही करतात, असं दाखवण्यात आलं आहे. चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे, असं लिहून निर्माता आणि दिग्दर्शकांनी न्यायव्यवस्थेची

शहीदांच्‍या कुटुंबियांना मदत करण्यासाठी नाना पाटेकर सरसावला, 10 कोटींचा निधी जमा करणार

उत्‍कृष्‍ट अभिनय, सेडेतोड प्रत्‍युत्‍तर आणि लोकांच्‍या मदतीसाठी ओळखल्‍या जाणाऱ्या नाना पाटेकरने भारतीय जवानांच्‍या संदर्भात महत्त्‍वाची घोषणा केली आहे. बॉलिवूड भास्‍करच्‍या एक्‍सक्‍ल्‍यूसिव्‍ह मुलाखतीमध्‍ये शहिद जवानांच्‍या कुटुंबियांना मदत करण्‍याची इच्‍छा नाना पाटेकरने व्‍यक्‍त केली आहे. यावेळी नाना पाटेकर म्‍हणाले, ' भारतीय जवान कोणत्‍या परिस्थितीमध्‍ये काम करत असतात, हे सर्वांना ठाऊक आहे. त्‍यांचे कुटुंबही कोणत्‍या मनोभूमिकेत जगत असतील, याचा आपण विचार करु शकतो. विशेषत: शहिद झालेल्‍या जवानांच्‍या कुटुंबावर काय परिस्थिती ओढावत असेल? म्‍हणूनच अशा कुटुंबीयांसाठी नाम फाउंडेशनने 10 कोटी रुपयांचा निधी जमा करण्‍याचे उद्दीष्‍ट ठेवले आहे.' पुढे नाना म्‍हणाले, 'मला माहिती आहे की, इतकी मोठी रक्‍कम जमा करणे काही सोपे उद्दीष्‍ट नाही. मी माझ्यातर्फे 50 लाख रुपये देणार आहे. आणखी 9.50 लाख रुपये ज
सनी नसरु‍द्दीनसोबत झळकणार

सनी नसरु‍द्दीनसोबत झळकणार

बॉलीवूडच्या किंग खानसोबत आयटम साँग नंतर सनी लिओनी आता पुन्हा नसरुद्दीन शहासोबत एका चित्रपटात काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'कोई जाने ना' या चित्रपटात सनी नसरुद्दी शहासोबत काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक लगान चित्रपटात आमिर खानसोबत काम केलेले अमीन हाजी हे आहेत. जर या चित्रपटात नसरुद्दीन शहा आणि सनीने सोबत काम केले तर या जोडीचा हा दुसरा चित्रपट ठरणार आहे. यापूर्वी या दोघांनी जॅकपॉटमध्ये एकत्रित काम केले होते.
गो गो गोविंदा…

गो गो गोविंदा…

अभिनय व डान्समध्ये "हिरो नंबर वन' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा त्याच्या चाहत्यांच्या व रसिकांच्या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी सज्ज झाला आहे. आता तो त्याच्या जुन्या अवतारात पाहायला मिळणार आहे. त्याचा आगामी चित्रपट "आ गया हिरो' मधील "लोहे दा लीवर...' हे गाणे नुकतेच लॉंच करण्यात आले. या गाण्यात सुरूवातीपासून गोविंदा पियानो वाजवत थिरकताना दिसतो आहे. या गाण्यातील त्याचा डान्स पाहून आधीचा गोविंदा डोळ्यासमोर येतो आहे. या चित्रपटात त्याने पोलिसाची भूमिका साकारली असून हा चित्रपट 24 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. आता पुन्हा एकदा गोविंदाचा जुना अंदाज पाहायला मिळणार म्हणून त्याचे चाहते खूप खूश आहेत.
आदित्य नारायणचं कमबॅक

आदित्य नारायणचं कमबॅक

2010 साली "शापित' चित्रपटातून अभिनेता व गायक आदित्य नारायणने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर तो रुपेरी पडद्यावरून गायबच झाला होता. आता तो पुन्हा एकदा संगीतमय सिनेमात काम करण्यासाठी सज्ज झालाय. या चित्रपटात काम करण्यासाठी तो खूपच उत्सुक आहे. कारण तो फक्त अभिनयच करणार नाही, तर चित्रपटातील काही गाणीही तो गाणार आहे. आदित्य सांगतो की, अभिनयाबाबतची घोषणा मी लवकरच करेन. सध्या तरी मी हेच सांगू शकतो की हा म्युझिकल चित्रपट आहे. यात मी मुख्य भूमिका साकारणार आहे आणि यातील गाणी मी गाणार आहे. त्यामुळे मी या प्रोजेक्‍टस्‌साठी खूपच उत्सुक आहे. तसंच आदित्य सारेगमप या सिंगिंग रिऍलिटी शोचे पुन्हा एकदा सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. याविषयी तो म्हणाला, ""या शोचे जवळपास सहा सिझन मी केलेत. देशातील सर्वश्रेष्ठ गायकाला शोधणे ही या शोची खासियत आहे.''
मल्लिकाचा जीनत

मल्लिकाचा जीनत

"ख्वाइश', "मर्डर'फेम मल्ल्लिका शेरावत काही वर्षांपासून हॉलीवूड चित्रपट आणि रिऍलिटी शोमध्ये काम करत होती; पण अनेक वर्षांच्या गॅपनंतर ती आता बॉलीवूडमध्ये परत येतेय. ती दिग्दर्शक संदेश बी. नायक यांच्या चित्रपटातून कमबॅक करतेय आणि या चित्रपटात तिची मुख्य भूमिका आहे. "जीनत' असे या चित्रपटाचे नाव आहे. मल्लिकाने बॉलीवूडमध्ये फारच निवडक प्रोजेक्‍टस्‌ केलेत. तिचा हा "जीनत' चित्रपट फारच स्पेशल असणार आहे. संदेश बी. नायक यांचा हा बॉलीवूडमधला दुसराच चित्रपट आहे. या आधी त्यांनी "लव शगुन' हा चित्रपट केला होता. मल्लिका शेरावतने या चित्रपटाबद्दल सांगितले की, मी या चित्रपटाची कथा किंवा माझ्या भूमिकेबद्दल जास्त काही सांगू शकत नाही. अजून चित्रपटाच्या अन्य कलाकारांची निवड व्हायचीय. या चित्रपटाचे वर्कशॉप नुकतेच सुरू झालेय आणि चित्रीकरण लवकरच मुंबईत सुरू होईल. हा चित्रपट एक सोशल ड्रामा आहे, जो आजच्या रिलेशनशिपवर
तब्बूची गोलमाल फॅमिलीमध्ये एन्ट्री

तब्बूची गोलमाल फॅमिलीमध्ये एन्ट्री

रोहित शेट्टीच्या "गोलमाल' सिरीजमधला नवीन चित्रपट येणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेलेच होते. त्यातही सगळ्यात मोठी उत्सुकता होती की या चित्रपटाची नायिका कोण असणार? याच्या बातम्या येत होत्या; पण "मकबूल', "चांदनी बार', "हैदर", "चिनी कम' अशा चित्रपटांतून त्या भूमिकेशी समरस होऊन अभिनय करणारी अभिनेत्री तब्बू रोहित शेट्टीच्या गोलमाल फॅमिलीत एन्ट्री करणारेय. तिच्याबरोबर अजय देवगण, अर्शद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, परिणिती चोप्रा या चित्रपटात असणार आहेत. परिणितीही या परिवाराची नवीन सदस्य आहे. गोलमाल सिरीज विनोदी चित्रपटांमधील सगळ्यात हिट ठरलेली सिरीज आहे. हैदरनंतर आता तब्बू गोलमाल 4 मध्ये मोठ्या पडद्यावर एन्ट्री करतेय. तिला गोलमालमधील भूमिकेत बघायला तिचे चाहते नक्कीच उत्सुक असतील.
अनुष्काचे नवे अभियान

अनुष्काचे नवे अभियान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा नवीन चेहरा आहे अनुष्का शर्मा. कोणत्याही सरकारी जाहिरातीत एखादा सेलिब्रिटी असेल तर ती जाहिरात किंवा ते अभियान जास्त यशस्वी होते, अशी धारणा आहे. कारण आपल्या देशात सेलिब्रिटी हे भारतातील छोट्यातला छोट्या गावात पोहोचलेले आहेत. त्यामुळे याआधी अमिताभ बच्चन यांना या अभियानासाठी निवडले होते. त्यानंतर आता अनुष्का शर्माही अमिताभ बच्चन यांच्याबरोबर या अभियानाचा फिमेल फेस म्हणून काम करणार आहे. अनुष्का मुख्यतः तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. तरुणींच्या स्वच्छतेबाबतच्या समस्या खूप असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले. म्हणून अनुष्का आता या अभियानात खास महिलांच्या प्रश्‍नांवर काम करणार आहे. या आधी स्वच्छतागृहांच्या अभियानासाठी विद्या बालनने काम केले होते. अनुष्काचे हे नवे अभियान यशस्वी होण्यासाठी तिला शुभेच्छा.