Saturday, February 23

बॉलीवुड

जस्लीन मथारू अनूप जलोटा यांच्यापासून गर्भवती होती का?

जस्लीन मथारू अनूप जलोटा यांच्यापासून गर्भवती होती का?

बिग बॉसच्या १२ व्या पर्वाला सुरुवात झाल्यापासून भजन सम्राट अनूप जलोटा (६५) आणि त्यांची प्रेयसी जस्लीन मथारू (२८) या दोघांचीच चर्चा आहे. बिग बॉसच्या यंदाच्या पर्वात जोडीदार ही थीम ठेवण्यात आली आहे. बिग बॉसमधील अन्य स्पर्धकांच्या तुलनेत अनूप जलोटा आणि जस्लीन यांचीच सर्वाधिक चर्चा होतेय त्यामागे कारणही तसचं आहे. दोघांच्या वयामध्ये थोडेथोडके नव्हे तर तब्बल ३७ वर्षांचे अंतर आहे. आता या जोडीबद्दल नवीन धक्कादायक खुलासा झाला आहे. मागच्यावर्षी जस्लीन अनूप जलोटा यांच्यापासून गर्भवती होती. नंतर तिने स्वत:चा गर्भपात करुन घेतला असा खळबळजनक दावा मॉडेल अनिशा सिंह हिने केला आहे. अनिशा सिंह अनूप जलोटा यांची निकटवर्तीय मानली जाते. अनिशा सिंहने सांगितले कि, अनूप जलोटा आणि जस्लीन ऐकमेकांच्या अंगावर ओरडत होते. यापूर्वी मी दोघांना इतक्या रागात कधी पाहिले नव्हते. जलोटांच्या निष्काळजीपणामुळे आपण गर्भवती राहिल
तारक मेहता का उल्टा चष्मा : निर्मल सोनी नवे ‘डॉ. हाथी’!

तारक मेहता का उल्टा चष्मा : निर्मल सोनी नवे ‘डॉ. हाथी’!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सर्वात प्रसिद्ध मालिकेत डॉक्टर हाथीची भूमिका साकारणाऱ्या कवी कुमार आझाद यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. मालिकेतील त्यांची जागा भरून न निघणारीच. पण असं म्हणतात ना ‘शो मस्ट गो ऑन’ त्याचप्रमाणे मालिकेतील कलाकारांनी चित्रिकरण सुरूच ठेवलं. पण, कवी कुमार आझाद यांच्या जाण्यानं एक पोकळी निर्माण झाली होती. ही जागा भरून काढण्यासाठी ‘तारक मेहता…’चे निर्माते असितकुमार मोदी या भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. अखेर डॉक्टर हाथी यांच्या भूमिकेसाठी अभिनेता निर्मल सोनी यांचं नाव निश्चित करण्यात आले आहे. निर्मल सोनी यांनी काही काळासाठी मालिकेत डॉ. हाथी यांची भूमिका साकारली होती. पुढील आठवड्यापासून निर्मल नव्या हाथीच्या रुपात मालिकेत दिसणार आहे. मालिकेतील ‘डॉ. हाथी’ या व्यक्तीरेखेला पूर्णविराम देता येणार नसल्यामुळेच गेल्या दीड महिन्यापासून नव्या अभिनेत्याच्या श
शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांना पुत्ररत्न

शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांना पुत्ररत्न

बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आता पुन्हा बाबा झाला आहे. कारण मीरा राजपूतने एका मुलाला जन्म दिला. प्रसुती वेदना सुरू झाल्याने मीराला हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले. संध्याकाळी ४ च्या सुमारास मीराला मुलगा झाला. या दोघांना २ वर्षांची एक मुलगी आहे जिचे नाव मीशा असे आहे. मीरा राजपूतमधला ‘मी’ आणि शाहीद मधला ‘शा’ अशी पहिली अक्षरं जुळवत त्यांनी मुलीचे नाव ठेवले आहे. आता मुलाचे नाव काय ठेवले जाणार याची उत्सुकता कायम आहे. शाहीद कपूर आणि मीरा राजपूत सोमवारीच मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्तराँमध्ये डिनर डेटसाठी गेले होते. शाहीद कपूरने सध्या त्याच्या चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलले आहे. या सिनेमाचे शूटिंग आता ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल अशीही चर्चा आहे. मीराला प्रसुती कळा सुरू झाल्यानंतर हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रूग्णालयात मीराची आई, शाहीद कपूरचे वडिल आणि अभिनेते पंकज कपूर, इशान खट्टर
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार पुन्हा लीलावती रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार पुन्हा लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालवली आहे. त्यांना छातीच्या संसर्गामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं सांगितलं आहे. लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर अजय पांडे यांच्या म्हणण्यानुसार, दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे काही कारण नाही, त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या ट्विटर पेजवरून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. याच्या आधी दिलीप कुमार यांना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आधी त्यांना डिहायड्रेशन झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. दिलीप कुमार हे किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा आहे. दिलीप कुमार लवकर बरे होवोत, अशी कामना आम्ही करतो. ट्रेजेड
माधुरी दीक्षित व संजय दत्तने २१ वर्षानंतर केले एकत्र चित्रीकरण

माधुरी दीक्षित व संजय दत्तने २१ वर्षानंतर केले एकत्र चित्रीकरण

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित व संजूबाबा म्हणजेच संजय दत्त २१ वर्षानंतर निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटात एकत्र काम करत आहेत. मात्र हे दोघे एका चित्रपटाचा हिस्सा असले तरी ते एकत्र कोणतेही सीन एकत्र करणार नाही, अशी चर्चा सगळीकडे सुरू होती. मात्र मीडिया रिपोर्ट नुसार या दोघांनी नुकतेच एकत्र काही सीन चित्रीत केले आहेत. मुंबई मिरर रिपोर्टनुसार चित्रपटाच्या सेटवरील एका सूत्राने सांगितले की, आलिया भट आणि वरूण धवन यांच्यासोबत संजय दत्त व माधुरी दीक्षितने तीन दिवस एका ड्रामेटिक सीनचे शूट केले. वरून धवनचे शूटिंग दोन दिवसात आटपले. तर आलिया तीन दिवस सेटवर होती. त्यानंतर ती रणबीर कपूरसोबत आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बुल्गारियाला रवाना झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय दत्त व माधुरी दीक्षित यांनी एकत्र सीन खूप चांगल्याप्रकारे केले आहेत. माधुरीचे एक शूट शेड
सोनम कपूरला करायचे आहे अशा सिनेमात काम

सोनम कपूरला करायचे आहे अशा सिनेमात काम

बॉलिवूडची फॅशन आयकॉन म्हणजेच अभिनेत्री सोनम कपूरने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ती नेहमी वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यावर्षी तिने 'पॅडमॅन', 'वीरे दी वेडिंग' व 'संजू' चित्रपटात काम केले. या सिनेमातील तिच्या कामाचे सर्वत्र खूप कौतूक झाले. आता सोनम म्हणते की तिला अशा चित्रपटांचा हिस्सा बनायचे आहे जे फक्त लोकांचे मनोरंजन करणार नाही तर समाजाला प्रभावित करेल.  सोनम म्हणाली की, 'मी अशा कथेच्या शोधात आहे जी माझी भूमिका समाजाला प्रभावित करेल आणि लोकांचे मनोरंजनदेखील करेल. मला अशा चित्रपटाचा हिस्सा बनायचा आहे जे मनोरंजनासोबतच समाजाला सामाजिक संदेश देईल. ' सोनमला २०१८ वर्ष चांगले असून ती सांगते की, ''रांझना'च्या प्रदर्शनापासून सगळे चांगले होते आहे. काही दिग्दर्शकांना तिच्यावर विश्वास अाहे. तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करून सहा वर्षे झाले. तिचा एकही सिन
लव्ह सोनिया मला बरंच काही शिकवलं : सई ताम्हणकर

लव्ह सोनिया मला बरंच काही शिकवलं : सई ताम्हणकर

तबरेज नुरानी दिग्दर्शित आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘लव्ह सोनिया’मध्ये सई ताम्हणकर दिसणार आहे. 14 सप्टेंबरला रिलीज होणा-या ह्या सिनेमामध्ये वेश्याव्यवसायातल्या अंजली ह्या भूमिकेत दिसणा-या सई ताम्हणकरला देहविक्रयाच्या व्यवसायाविषयी चित्रीकरणाआधी अभ्यास करावा लागला. लव्ह सोनिया करताना केलेल्या निरीक्षणाविषयी सई ताम्हणकर सांगते, “आपण कळत्या वयापासून ह्या व्यवसायाविषयी कितीही ऐकलं असलं तरी,  माझ्यासारखी मध्यमवर्गीय सुखवस्तू घरात लहानाची मोठी झालेली व्यक्ती जेव्हा वेश्यावस्तीत पहिल्यांदा पाऊल ठेवते. तेव्हा पहिल्याच दिवशी मनाला लागणारा चटका शब्दात न सांगण्याजोगा आहे. दहा बाय दहाच्या छोट्या खोलीत पाच-पाच माणसं कशी राहतात, कशा अवस्थेत आणि वातावरणात देहविक्रयाचा व्यापार होतो. हे जेव्हा तुम्ही पाहता, तेव्हा आपल्या मध्यमवर्गीय आयुष्यातली दु:खच तुम्ही विसरून जाता.” सई पूढे सांगते, “चोरलेल्या मुलांना इथे
बॉलिवूड अॅक्ट्रेस दिव्या दत्ताविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार

बॉलिवूड अॅक्ट्रेस दिव्या दत्ताविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ता हिच्यासह तीन जणांविरुद्ध मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. दिवंगत अभिनेता ओम पुरी यांची पत्नी नंदिता पुरी यांनी लिखित स्वरुपात ही तक्रार दाखल केली आहे. लेखक जावेद सिद्दकी आणि अभिनेता अमरीक गिल यांचीही नावे तक्रारीत आहेत. हे प्रकरण पंजाबी नाटक 'तेरी अमृता'शी संबंधित आहे. 'तेरी अमृता'चे कॉपीराइट ओमपुरी कंपनीकडे असताना दिव्या दत्ता हिने नंदिता यांची परवानगी न घेता ते नाटक सुरु करण्याची घोषणा केली आहे. नंदिता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी आपल्या राइट्ससाठी दिव्याला संपर्क केला होता. परंतु दोघींमध्ये तडजोड होऊ शकली नाही. त्यांनी अभिनेता, सिंगर गुरुदास मानसोबत 9 सप्टेंबरला मुंबईत प्रीमियर ठेवला आहे.
चित्रपटाचं प्रमोशन करणं परिणितीला पडलं महागात

चित्रपटाचं प्रमोशन करणं परिणितीला पडलं महागात

‘इश्कजादे’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री परिणिती चोप्रा तिच्या अभिनयामुळे कायम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत असते. सतत सोशल मीडियावर वावरणारी ही अभिनेत्री चाहत्यांच्या घोळक्यात असल्यामुळे चर्चेचा विषय ठरत असते. मात्र यावेळी ती एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली असून ती ट्रोल झाल्याचं पाहायला मिळत आहे. परिणिती लवकरच अभिनेता अर्जुन कपूरबरोबर ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. त्यामुळे चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशनदरम्यान परिणितीने परिधान केलेल्या कपड्यांमुळे आणि तिच्या नव्या हेअर कलरमुळे ती ट्रोल झाली आहे. परिणितीने परिधान केलेला ड्रेस ती सूट होत नसल्याचं मत अनेक नेटकऱ्यांनी मांडलं आहे. इतकंच नाही तर काही जणांची तिची तुलना अभिनेत्री कतरिना कैफबरोबरही केली आहे. ‘फितूर’ चित्रपटामध्ये कतरिनाचा जसा लूक होता तसाच लूक परिणितीने के
संजय दत्त करू शकतो ह्या गँगस्टरची भूमिका

संजय दत्त करू शकतो ह्या गँगस्टरची भूमिका

बॉलिवूडमध्ये संजूूबाबा या नावाने ओळखला जाणारा अभिनेता संजय दत्तने आपल्या करियरमध्ये बऱ्याच चित्रपटांमध्ये गँगस्टरची भूमिका केली आहे आणि तो गँगस्टरची भूमिका खूप चांगल्याप्रकारे करतो. नुकताच प्रदर्शित झालेला तिग्मांशु धूलियाचा रोमँटिक क्राईम थ्रिलर चित्रपट 'साहेब बीवी और गँगस्टर ३'मध्ये संजय दत्त दिसला होता. त्यानंतर आता सूत्रांकडून समजते आहे की संजय अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. करीम लाला मुंबईत राहणाऱ्या पठाणांमधील मोठे नाव होते आणि त्याचबरोबर गुन्हेगारी जगतातील गॉडफादर. करीम लाला अफगाणी वंशातील होता. ज्याने शहरातील स्मगलर हाजी मस्तानसोबत हातमिळवणी करून सत्ता काबीज केली होती. मात्र विचित्र बाब ही आहे की चित्रपट निर्माता मिलन लुथरियाने दहा वर्षांपूर्वी करीम लाला, हाजी मस्तान आणि मुंबईत राहणारा साऊथचा बाहुबली वरदराजन मुदलियारवर चित्रपट बनवण्याची योजना केली होती. ज्य