Saturday, July 21

बॉलीवुड

नोरा फतेहीला सलमानची लॉटरी

नोरा फतेहीला सलमानची लॉटरी

अप्रतिम बेली डान्स आणि आपल्या अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री नोरा फतेही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटातील ‘दिलबर’ हे गाणं. सुष्मिता सेन आणि संजय कपूर यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘दिलबर’ या मूळ गाण्याचं हे रिक्रिएटेज व्हर्जन होतं. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून अत्यंत कमी कालावधीत युट्यूबवर त्याला १० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. या प्रसिद्धीमुळेच नोराला आता थेट बॉलिवूडच्या ‘सुलतान’ची म्हणजेच सलमान खानची ऑफर मिळाली आहे. त्याच्या आगामी चित्रपटात नोरा झळकणार आहे. ‘बॉलिवूड लाइफ’ या वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार सलमानच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटातील एका गाण्यात नोरा थिरकणार आहे. हे गाणं कोणतं असणार किंवा यामध्ये सलमानसुद्धा तिच्यासोबत थिरकणार का हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मोरक्कन- कॅनडियन अभिनेत्री नोरा ‘बाहुबली- द बिगनिंग’ या चि
आता दिवंगत अभिनेत्री मधुबालावरही बायोपिक

आता दिवंगत अभिनेत्री मधुबालावरही बायोपिक

बॉलिवुड जगतातील सदाबहार अभिनेत्री मुधबाला यांचा जिवनपट चित्रपटाच्या भव्य पडद्यावर लवकरच झळकणार आहे. आपल्या नितांतसुंदर सौंदर्याने अवघे बॉलिवुड आणि जगभरातील चाहत्यांना भूरळ घालणाऱ्या मधुबालावर बायोपिक बनणार आहे. मधुबाला यांची छोटी बहिण मधुर ब्रिज भूषण हीसुद्धा एक जबरदस्त अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवुडमध्ये आपले स्थान निर्माण केले. त्यामुळे मधुबालाच्या निधनानंतर तिला त्यावेळी टॉप असणाऱ्या डायरेक्टर्स-प्रोड्युसर्सनी अनेकदा ऑफर दिली की, मधुबालावरील चित्रपटाचे हक्क द्यावेत. पण, ब्रज भूषणने कोणाचे ऐकले नाही. त्यामुळे मधुबालावरील बायोपिक बनलेच नाही. दरम्यान, प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार ब्रिज भूषणने मधुबालावर बनणाऱ्या चित्रपटाचे राईट्स एका प्रोड्युसरला दिले आहेत. मात्र, हा प्रोड्युसर नेमका कोण आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, मधुबालाची बहिण ब्रिज
१२ वर्षांनंतर एकत्र येणार सनी देओल-अमीषा पटेल

१२ वर्षांनंतर एकत्र येणार सनी देओल-अमीषा पटेल

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर: एक प्रेम कथा’ हा चित्रपट तुफान गाजला होता. या चित्रपटाचं कथानक प्रेम, देशभक्ती या महत्त्वाच्या निकषांवर आधारलेलं होतं. त्यामुळेच या चित्रपटाला विशेष लोकप्रियता मिळाली होती. तसंच चित्रपटाच्या कथानकाबरोबरच अमिषा पटेल आणि सनी देओल यांनीदेखील उत्तम अभिनय करत चित्रपटाला न्याय दिला होता. त्यानंतर १२ वर्षांमध्ये दोघांनी एकही चित्रपट एकत्र केलेला नाही. पण आता हे दोघं लवकरच एका चित्रपटात एकत्र येणार असल्याचे ऐकण्यात येत आहे. सनी देओलचा आगामी चित्रपट ‘यमला पगला दीवाना ३’ हा चित्रपट येत्या ३१ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सनी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळतं. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सनीला अन्य काही चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत.  मात्र त्यातील ‘भईया जी सुपरहिट’ या आगामी चित्रपटासाठी त्याने होकार दिला असून तो लवकरच या चित्
एका अटीवर सनी लिओनी पॉर्न सिनेमात करायची काम

एका अटीवर सनी लिओनी पॉर्न सिनेमात करायची काम

'करनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी' या आपल्या बालोपिकमुळे अभिनेत्री सनी लिओनी फारच चर्चेक आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला असून यातून सनीचं लाइफ दाखवलं जाणार आहे. या सिनेमातून तिच्या पॉर्न इंडस्ट्रीतील प्रवासावरही प्रकाश टाकला जाणार आहे. सनी लिओनी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करत होती पण आता तिने ती इंडस्ट्री सोडली आहे. आता ती बॉलिवूडमध्ये काम करते. इथेही काम करताना तिने काही नियम तयार केले आहेत. तशात काही अटी की अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करताना ठेवत होते. आपल्या अटींवर ती अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. मीडिया रिपोर्टनुसार, सनीने मे २००७ मध्ये ६ अॅडल्ट सिनेमे साईन केले होते. पण यासाठी तिने एक अट ठेवली होती. तिच्या सर्वच पॉर्न सिनेमांमध्ये तिचा बॉयफ्रेन्ड मेट एरिक्सन तिच्यासोबत होता. त्यावेळी केवळ मेटसोबत म्हणजेच तिच्या होणाऱ्या पतीसोबत तिने अॅडल्ट सिनेमात काम केले हो
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांचे निधन

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांचे निधन

मुंबई, तारक मेहता का उल्टा चष्मा फेम डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांनी नुकताच मीरा रोड मधील रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील डॉ. हंसराज हाथी प्रेक्षकांचे प्रचंड लाडके होते. हि भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांची आज तब्येत बरी नसल्याने ते चित्रीकरणासाठी येऊ शकणार नाहीत असा त्यांनी सकाळी निरोप कळवला होता. त्यांना सकाळ पासूनच अस्वस्थ वाटत होते. घरातच त्यांना हृदय विकाराचा धक्का आल्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. पण तिथे त्यांचे निधन झाले. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला लवकरच दहा वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने आज एक मीटिंग मालिकेच्या सेट वर आयोजित करण्यात आली होती. पण त्या आधीच हि दुःखद बातमी मालिकेच्या सेट वर आली. त्यांच्या निधनाने मालिकेच्या टीमला चांगलाच धक्का बसला आहे.
सनी लियोनीच्या बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित

सनी लियोनीच्या बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड सिनेमांत आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजाने सर्वांना घाय़ाळ करणारी अभिनेत्री सनी लियोनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सनीचे चाहते तिच्या या बायोपिकची आतुरतेने वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले. ते चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले. सनीच्या या बायोपिकचे नाव ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन’ असे आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा ट्रेलर ९ तासात सुमारे 4 लाख 50 हजार लोकांनी पाहिला. सनी लियोनीचा बायोपिक ही एक वेब फिल्म आहे. ही फिल्म १६ जुलैला वेब प्लेटफॉर्म ZEE5 प्रसारित होईल. ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन’चा ट्रेलर २ मिनिटं २४ सेकंदांचा आहे. यात सनीचे बोल्ड सीन्स आणि सेमी न्यूड सीन्स ही आहेत. यात सनीचे विविध पैलू पाहायला मिळतील. सनीचे बालपण, पॉर्न इंडस्ट्रीकडे ती कशी वळल
ABCD 2 मधील वरुणची अभिनेत्री लॉरेन ‘या’ निर्मात्याला करतीये डेट?

ABCD 2 मधील वरुणची अभिनेत्री लॉरेन ‘या’ निर्मात्याला करतीये डेट?

आपल्या जबरदस्त डान्सने बॉलिवूडकरांचे आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधणारी अभिनेत्री-डान्सर लॉरेन गॉटबिल ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. ABCD आणि ABCD 2 या सिनेमांमध्ये दिसलेली ही अभिनेत्री सध्या एका निर्मात्याला डेट करत असल्याची माहिती समोर येतीये. रेमो डिसुझा याच्या ABCD आणि ABCD 2 या सिनेमांमध्ये दिसलेली ही अभिनेत्री एका डान्स रिअॅलिटी शोमधून लोकप्रिय झाली होती. त्यानंतर रेमोनेच तिला या सिनेमांमध्ये संधी दिली. आता लॉरेन सध्या निर्माता बेंजामिन डेव्हिड हॉफमन याला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. खरंतर लॉरेनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही दोघांचे काही फोटो शेअर केले असून त्यातून दोघांमध्ये नक्कीच काहीतरी सुरु असल्याची कुजबूज बॉलिवूडमध्ये होत आहे. पण दोघांनीही याबाबत काहीही अधिकृतपणे जाहीर केलेले नाहीये. पण खरंतर त्यांचे फोटो पाहून त्यांनी काहीही सांगण्याची गरज दिसत नाही.
गोविंदाची भाची म्हणते मामाने कधीच नाही केली मदत

गोविंदाची भाची म्हणते मामाने कधीच नाही केली मदत

‘ससुराल गेंदा फूल’ या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री रागिनी खन्ना हिने चाहत्यांच्या मनात स्वत:च विशेष स्थान निर्माण केलं आहे. काही काळ रागिनी छोट्या पडद्यापासून दूर गेली होती. मात्र आता तिने पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. रागिनी लवकरच ‘जज्बात’ या कार्यक्रमामध्ये दिसणार आहे. या कार्यक्रमाविषयी बोलताना तिने तिच्या मामा गोविंदाविषयी एक खुलासा केल्याचं पाहायला मिळालं आहे. रागिना खन्ना ही अभिनेता गोविंदाच्या बहीणीची मुलगी आहे. त्यामुळे रागिनीने छोट्या पडद्यावर पदार्पण केल्यानंतर ती गोविंदाच्याच मदतीने इथपर्यंत पोहोचल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. मात्र यावर अखेर रागिनीने तिचं मौन सोडलं आहे. गोविंदाची भाची असूनदेखील माझ्या करिअर करताना माझ्या नशीबातील स्ट्रगल मला चुकलेला नाही, असं रागिनीने यावेळी सांगितले. ‘मी गोविंदाची भाची आहे. त्यामुळे मला आरामात या क्षेत
अभिनेत्री किम शर्माची मोलकरणीला मारहाण

अभिनेत्री किम शर्माची मोलकरणीला मारहाण

मोलकरणीला शिवीगाळी करून मारहाण केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा हिच्यावर खार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कपडे खराब केल्याच्या कारणावरून तिने मारहाण करीत पगार थकविला असल्याची तक्रार एस्थर खेस हिने दिली आहे. पीडित तरुणी ही २७ एप्रिलपासून किम शर्माकडे घरकाम करीत होती. २१ मे रोजी ती किमचे कपडे धूत असताना गडद कपड्याचा रंग सफेद कपड्यांना लागला. हे समजल्यानंतर किमने तिला शिवीगाळी करीत मारहाण केली. पगार न देता हाकलून लावल्याची तक्रार खेस हिने खार पोलिसांकडे केली. तर किमने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. दर महिन्याच्या ७ तारखेला मी कामगारांना पगार देते. एस्थरला अजिबात मारहाण केलेली नसून तिनेच माझे ७० हजारांचे ड्रेस खराब केले आहेत, असे तिने पोलिसांना सांगितले.
सोनाली बेंद्रे कॅन्सरग्रस्त; न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू

सोनाली बेंद्रे कॅन्सरग्रस्त; न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाला आहे. सोनालीची कॅन्सरशी झुंज सुरू असल्याची माहिती तिनं स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सोनालीनं बुधवारी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. सध्या अमेरिकेतील न्यू-यॉर्क शहरात सोनालीवर उपचार सुरू आहेत. सोनालीने आपल्या ट्विटर तसंच इन्स्टा अकाऊंटवर भावनिक पोस्ट करत लिहिले आहे की, ''कधी कधी आयुष्यात अशी वळणं येतात, ज्याबाबत आपण कधीच विचार केलेला नसतो. मला हायग्रेड कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे.  माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार मला आजाराशी लढण्याचे बळ देताहेत. या गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी मी न्यूयॉर्कला आले आहे. विचित्र स्वरुपात शारीरिक वेदना झाल्यानंतर काही वैद्यकीय तपासणीअंती कॅन्सरचे निदान झाले''. सोनालीची ही पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. ''सोनाली Get Well Soon', असं म्हणत चाहते  तिच्या