Saturday, December 15

बिज़नेस

विजय मल्ल्याच्या हस्तांतरणासाठी भारताची ब्रिटनकडे रितसर विनंती

विजय मल्ल्याच्या हस्तांतरणासाठी भारताची ब्रिटनकडे रितसर विनंती

नवी दिल्ली: भारतीय बँकाचं कोट्यवधी रुपयाचं कर्ज बुडवून इंग्लंडला पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या हस्तांतरणासाठी भारत सरकारने युनायडेट किंग्डमला अधिकृत विनंती केली आहे. विजय मल्ल्यावर भारतात कर्ज बुडवेगिरीप्रकरणी खटला सुरु आहे. न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी मल्ल्याला समन्सही जारी करण्यात आलंय. मात्र तो देशाबाहेर असल्याने त्याला समन्स बजावता येत नाही. त्यामुळेच त्याला भारतात आणून त्याच्यावर खटला चालविण्यासाठी हस्तांतरण प्रक्रिया पार पाडणं गरजेचं आहे. म्हणूनच भारत सरकारने विजय मल्ल्या याच्या हस्तांतरणासाठी इग्लंडला रितसर विनंती केलीय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. सीबीआयने मल्ल्या याच्या हस्तांतरणासाठी भारत सरकारची अधिकृत विनंती ब्रिटनच्या भारतातील उच्चायुक्तांमार्फत पाठवली आहे. भारत आणि इग्लंड यांच्यात हस्तांतरण करार झालेला आहे. तसंच भ
रिझर्व्ह बँक गृहकर्जाच्या व्याजदरात कपात करण्याच्या तयारीत?

रिझर्व्ह बँक गृहकर्जाच्या व्याजदरात कपात करण्याच्या तयारीत?

नवी दिल्ली : आगामी द्वैमासिक पतधोरणासाठी आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची 7-8 फेब्रुवारीला बैठक होणार आहे. गृहकर्जाच्या व्याजदरात पुरेशी कपात होईल, याची तरतूद करण्याचं ‘असोचॅम’ने अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सुचवलं आहे. घसरती पतवाढ आणि मंदावलेल्या मागणीचा विचार करता व्याजदरात 0.5 ते 0.75 टक्क्यापर्यंत कपात करावी, असं सुचवण्यात आलं आहे. नोटाबंदीमुळे बँकांना अनपेक्षित लाभ झाल्याचं म्हटलं जात आहे. व्याजदरात 50 ते 75 बेसिस पॉइंट्सची घट होण्याची अपेक्षा इंडस्ट्रीत वर्तवली जात आहे. बँकांनी त्यांना झालेला संपूर्ण लाभ कर्जदारांना पोहचवावा, असं मत असोचॅमने व्यक्त केलं आहे. चालू आणि बचत खात्यातून नोटाबंदीच्या काळात बँकांना मोठा फायदा झाला आहे, बेस रेट अजूनही दोन आकडी असल्यामुळे त्यामध्ये कपात करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
100 रुपयांची नवी नोट येणार

100 रुपयांची नवी नोट येणार

नोटबंदीनंतर आता 100 रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची तयारी रिझर्व्ह बँकेने सुरू केली आहे. मात्र 100 रुपयांच्या सध्या चलनात असलेल्या नोटा बाद न होता चलनात कायम राहणार आहेत. ही नोट महात्मा गांधी सीरिज-2005 सारख्याच असतील. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात आलेल्य अधिसूचनेत म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेकडून लवकरच नव्या बँक नोटा जारी करण्यात येणार आहेत. या नोटा महात्मा गांधी सीरिज-2005 सारख्याच असतील. या नोटांच्या दोन्ही नंबर पॅनलवर इनसेटलेटरमध्ये आऱ हे अक्षर लिहिलेले असेल. तर नोटांचा छपाई वर्ष 2017 असेल.  त्याबरोबरच आरबीआय 50 आणि 20 रुपयांच्या नव्या नोटाही चलनात आणणार आहे. मात्र त्यांच्याही जुन्या नोटा चलनात कायम राहतील.