Saturday, February 23

बिज़नेस

एअरटेलचा 4G फोन लवकरच बाजारात येणार!

एअरटेलचा 4G फोन लवकरच बाजारात येणार!

मुंबई, रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेल आपला नवा 4G स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी एअरटेलनं स्मार्टफोन मेकर्स कंपन्यांशी चर्चाही सुरु केली आहे. एअरटेलचा हा फोन दिवाळीपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. तसेच या स्मार्टफोनची किंमत 2,500 रुपयांपर्यंत असू शकते. इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, कंपनी या फोनसोबत अधिक डेटा आणि फ्री कॉलिंग देऊ शकतं. हा स्मार्टफोन कंपनी अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे. हा फोन सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये लाँच होऊ शकतो. एअरटेल यासाठी कार्बन आणि लावा या स्मार्टफोन मेकर कंपन्याशी चर्चा करत आहे. दरम्यान, दूरसंचार कंपनी आयडिया सेल्यूलर देखील आपल्या 4जी फोनवर सध्या काम सुरु आहे. हा फोन देखील लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे.
अॅक्सिस बँकेची खास ऑफर, गृहकर्जाचे १२ मासिक हप्ते माफ

अॅक्सिस बँकेची खास ऑफर, गृहकर्जाचे १२ मासिक हप्ते माफ

मुंबई, बॅंकींग क्षेत्रातही दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बॅंकांकडून नवनवीन घोषणा केल्या जात आहेत. खासकरून गृहकर्जाच्या क्षेत्रात ही स्पर्धा अधिक बघायला मिळते. यानुसार आघाडीच्या अॅक्सिस बँकेने आपल्या गृहकर्ज ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. अॅक्सिस बँकेने गृहकर्जदारांना तब्बल १२ मासिक हप्ते माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. या घोषणेचा लाभ घेण्यासाठी तुमचं गृहकर्ज ३० लाखांवर असायला हवं. इतकंच नाहीतर या कर्जाचा एकही हप्ता तुमच्याकडून थकायला नको. तरच तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे. अॅक्सिस बँकेने आणलेल्या शुभारंभ नव्या योजने अंतर्गत ही ऑफर दिली आहे. मात्र, जर तुम्हाला वाटत असेल की, बॅंकेकडून सलग १२ महिन्यांचे हप्ते माफ होतील, तर तसं नाहीये. जर कर्जदाराने नियमित कर्ज भरलं, तर त्याला चौथ्या, आठव्या आणि बाराव्या वर्षी असे चा
इन्फोसिस’चे मुख्य कार्यकारी विशाल सिक्का यांचा राजीनामा

इन्फोसिस’चे मुख्य कार्यकारी विशाल सिक्का यांचा राजीनामा

मुंबई, 'इन्फोसिस' या आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सिक्का यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्याला मुक्तपणे काम करू दिले नसल्याचे सांगत सिक्का यांनी व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. सिक्का यांच्या कार्यपद्धतीबाबत काही संचालकांनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर मूर्तीसुद्धा नाखूश होते. त्या पार्श्वभूमीवर सिक्का यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. सिक्का यांच्या जागी यूबी प्रवीण राव यांची हंगामी व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड केल्याची माहिती इन्फोसिसने शेअर बाजाराला दिली आहे. सिक्का यांच्याकडे तात्पुरता कार्यकारी उपाध्यक्षपदाचा भार सोपवण्यात आला आहे. गेल्या दिड वर्षात इन्फोसिसमधून अनेक वरिष्ठ अधिका-यांनी राजीमाने दिले आहेत. सिक्का यांना
मोफत मिळणार जिओचा 4G स्मार्टफोन

मोफत मिळणार जिओचा 4G स्मार्टफोन

मुंबई, रिलायन्सचा 4जी स्मार्टफोन मोफत असेल असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना जाहीर केले. अर्थात, कुठलीही गोष्ट मोफत दिली तर तिचा दुरुपयोग होतो असे सांगत, हे टाळण्यासाठी 1500 रुपये सुरक्षा अनामत म्हणून घेण्यात येणार असून तीन वर्षांनी ही रक्कम ग्राहकाला परत करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जिओ स्मार्टफोनमध्ये 12 भाषा देण्यात आल्या आहेत. या फोनमध्ये वायफाय, ब्लूट्यूथ, जीपीएस आणि यूएसबीच्या सुविधा आहेत. जिओ स्मार्टफोन हा इतर स्मार्टफोनपेक्षा खूप पावरफूल आहे. जिओ म्युझिक, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही हे फिचर्स आधीपासून या स्मार्टफोनमध्ये लोड करण्यात आले आहेत. या फोनवर 153 रुपयांत प्रत्येक महिन्याला फ्री व्हाइससह अनलिमिटेड इंटरनेट मिळणार आहे. जिओ 4 जी व्होल्ट फोनची इफेक्टिव्ह किंमत शून्य आहे. मात्र 1500 रुपयांचं सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागणार
आता एमआरपीपेक्षा जास्त किंमत घेऊ शकणार नाहीत दुकानदार

आता एमआरपीपेक्षा जास्त किंमत घेऊ शकणार नाहीत दुकानदार

नवी दिल्ली, मॉल, चित्रपट गृह, विमानतळ,  स्टेडियम या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तूंची किंमत वेगवेगळी असल्याचे किंवा काही वस्तू छापील किमतीपेक्षा अधिक किमतीला मिळत असल्याचे तुमच्या पाहण्यात आले असेलच. मात्र आता कंपन्या एकच वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या किमतीला विकू शकणार नाहीत. सरकारने केलेल्या नव्या नियमानुसार 1 जानेवारी 2018 पासून कुठल्याही वस्तूची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी किंमत वसूल करता येणार नाही.  लीगल मेट्रॉलॉजी (पॅक्ड कमोडिटीज) नियम, 2011 पुढील वर्षाच्या सुरुवातीला लागू होणार आहे. लीगल मेट्रॉलॉजीशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही  उत्पादकांना काही वेळ देत आहोत. ज्यामुळे ते नव्या नियमांचे पालन करण्याची तयारी करू शकतील. ग्राहकांसंबंधीच्या विभागाने सांगितले की, व्यापक विचार विनियमयानंतर हे पाऊल उचलले आहे. नियमांना लागू करण्याचा अनुभव आणि विविध घटकांशी केलेल्या व्या
चंदा कोचर यांना ६७ टक्क्यांची वेतनवाढ! प्रतिदिन दोन लाख रुपये वेतन

चंदा कोचर यांना ६७ टक्क्यांची वेतनवाढ! प्रतिदिन दोन लाख रुपये वेतन

मुंबई, आयसीआयसीआय बँक या देशातील दुसऱ्या मोठय़ा बँकेच्या प्रमुख व मानाच्या फोर्ब्ज यादीतील अव्वल चंदा कोचर यांचे वार्षिक वेतन गेल्या आर्थिक वर्षांत तब्बल ६४ टक्क्यांनी वाढले आहे. त्यांना दिवसाला २.१८ लाख पगार तर मूळ वेतनात १५ टक्के वाढ झाली आहे. तुलनेत बँकेतील मध्यम फळीतील कर्मचाऱ्यांचे वेतन २०१६-१७ मध्ये १२ टक्क्यांनी वाढले आहे. आयसीआयसीआय या खासगी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना गेल्या आर्थिक वर्षांत एकूण ७.८५ कोटी रुपये मिळाले आहेत. आधीच्या वर्षांत ही रक्कम ४.७९ कोटी रुपये होती. गेल्या आर्थिक वर्षांत कोचर यांना २.६७ कोटी रुपये मूळ वेतन मिळाले आहे. तर कामगिरी लाभांश म्हणून त्यांना २.२० कोटी रुपये मिळाले आहेत. उत्कृष्ट कामगिरी म्हणून दिल्या जाणाऱ्या लाभांशामुळे कोचर यांचे गेल्या वर्षांत एकूण उत्पन्न कमालीचे वाढले आहे. आधीचे वित्त वर्ष २०१५-१६ मध्य
सेन्सेक्सची ऐतिहासिक भरारी, सर्वोच्च पातळी गाठली

सेन्सेक्सची ऐतिहासिक भरारी, सर्वोच्च पातळी गाठली

मुंबई, मुंबई शेअर बाजाराने आज ऐतिहासिक टप्पा गाठला. 456 अंकांनी उसळी घेत सेन्सेक्स 30,750 अंकावर बंद झाला. त्यापूर्वी सेन्सेक्स 30,768 अंकापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे सेन्सेक्सने गाठलेला हा आजवरचा सर्वात मोठा टप्पा आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीतही 149 अंकांची वाढ होऊन तो 9500 अंकावर बंद झाला. दरम्यान आज शेअर मार्केटमध्ये आयटी कंपन्या इन्फोसिस, टीसीएससह लार्सन अँड टर्बो, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी उसळी घेतली. गेल्या सहा ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांकडून शेअर्सची विक्री सुरु आहे. त्यातच आता मुंबई शेअर बाजाराने उसळी घेतल्याने सेन्सेक्स आणखी मजबूत झाला आहे.
भारतात बंद होणार शेवरले गाड्यांची विक्री

भारतात बंद होणार शेवरले गाड्यांची विक्री

मुंबई, भारतीय बाजारपेठेतील दिवसेंदिवस घटत जाणारी लक्षात घेता जनरल मोटर्सनं भारतातून आपला विक्रीचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय. जनरलम मोटर्स भारतात यापुढे आपल्या वाहनांची विक्री करणार नाही. जीएम भारतात शेवरले ब्रँडच्या गाड्यांची विक्री करते. जवळपास दोन दशकांपासून ही कंपनी भारतात बस्तान बसवून आहे. परंतु, त्यांच्या पदरी निराशाच पडली. कंपनीनं गुजरातमधील आपल्या कारखान्यातून उत्पादन गेल्या वर्षी थांबवलं होतं. सध्या महाराष्ट्रातील तळेगाव स्थित आपल्या कारखान्यातून निर्माण होणाऱ्या गाड्या निर्यात करण्यावर कंपनीनं आपलं लक्ष केंद्रीत केलंय. 'मेड इन इंडिया'चा तर हा झटका नाही ना, असंही कंपनीच्या या निर्णयावर म्हटलं जातंय. कंपनीनं रशिया आणि युरोपसहीत चार अन्य आंतरराष्ट्रीय बाजारांतूनही काढता पाय घेण्याचा निर्णय घेतलाय. २०१६-१७ साली जनरल मोटर्सची भारतातील विक्री जवळपास २१ टक्क्यांनी कमी होत केवळ २
भारतात iPhone ची निर्मिती, लवकरच ग्राहकांच्या हाती

भारतात iPhone ची निर्मिती, लवकरच ग्राहकांच्या हाती

बंगळुरू, तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी अॅपलने आयफोनचे भारतात प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन सुरु केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आयफोनचे सर्वात स्वस्त मॉडेल  'द एसई'ची चाचणी घेण्यात आली. तैवानच्या विस्ट्रन कॉर्पने आपल्या बंगळूरू येथील प्रकल्पात ही चाचणी घेतल्याचं वृत्त आहे. त्यामुळे याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भारतात अॅसेम्बल झालेला हा आयफोन ग्राहकांच्या हातात पडण्याची शक्यता आहे. तैवानची विस्ट्रन कंपनी बंगळुरु येथील पीन्या या औद्योगिक क्षेत्रात स्थापन होणाऱ्या जुळणी प्रकल्पाचे व्यवस्थापन करणार आहे. आयफोन एसई या मॉडेलच्या जोडणीचे काम बंगळुरु येथे सुरू झाले आहे. या प्रकल्पातील उत्पादने आठवडाभरात भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांना देशात निर्मिलेल्या आयफोनचे मॉडेल वापरण्याचा आनंद घेता येणार आहे. हा फोन भारतात अॅसेम्बल झाल्या
सॅमसंगचा नवा स्मार्टफोन Z4 लवकरच भारतात

सॅमसंगचा नवा स्मार्टफोन Z4 लवकरच भारतात

सॅमसंगचा सलग चौथा स्मार्टफोन झेड4 येत्या महिनाभरात भारतात दाखल होत आहे. टायझन ३.० या ऑपरेटिंग सिस्टिमवर हा मोबाईल वापरता येईल. सॅमसंगने अद्याप या फोनची किंमत घोषित केलेली नाही, मात्र फोन काळा, सोनेरी आणि चंदेरी रंगात उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले आहे. सॅनफ्रान्सिस्कोमध्ये येत्या आठवड्यात होत असलेल्या टायझन डेव्हलपर परिषदेत झेड4 चे सादरीकरण होणार आहे. स्मार्टफोन पहिल्यांदाच खरेदी करणारे ग्राहक डोळ्यासमोर ठेवून झेड4 ची निर्मिती केली आहे. 4जी, ४.५ इंचाची स्क्रिन, १.५ गीगा हर्ट्झ क्वाड कोअर प्रोसेसर आणि १ जीबी रॅम ही झेड4 फोनची वैशिष्ट्ये आहेत. मोबाईलला ५ मेगा पिक्सलचा कॅमेरा आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या मोबाईल कम्युनिकेशन बिझनेसचे अध्यक्ष डी जे कोह यांनी सांगितले, की टायझनच्या विस्तारासाठी झेड4 स्मार्टफोन उपयुक्त ठरणार आहे. 'हा स्मार्टफोन वापरायला अतिशय सोपा असेल. पहिल्यांदा स्मार्टफोन घ