Sunday, January 20

बिज़नेस

फक्त 200 रुपयांत उघडा पोस्टात खातं, बँकेपेक्षा जलद होतील पैसे दुप्पट

फक्त 200 रुपयांत उघडा पोस्टात खातं, बँकेपेक्षा जलद होतील पैसे दुप्पट

नवी दिल्ली, पोस्ट ऑफिसला आजही लोक जुन्या काळातील योजनेच्या स्वरूपात पाहतात. त्यामुळे जास्त करून ग्राहक हे पैसे बँकेत ठेवण्यास प्राधान्य देतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही अशा प्रकारची गुंतवणूक पोस्टातही करू शकता. विशेष म्हणजे पोस्टात जमा केलेले पैसे बँकेपेक्षा दुप्पट नफा मिळवून देतात. तसेच तुमच्या पैशाचीही पोस्ट ऑफिस हमी देतो. तसेच तुम्ही पोस्टात ठेवी ठेवल्यास तुम्हाला बँकेच्या तुलनेत जास्त व्याज मिळतं. तुम्ही एफडीच्या स्वरूपात पैसे ठेवल्यास तुम्हाला विमा सुरक्षा आणि हमी तर मिळते. त्याशिवाय चांगला परतावाही मिळतो. जर बँकेला काही तोटा झाल्यास योजनेंतर्गत पैसे जमा केलेल्या ग्राहकाला फक्त 1 लाख रुपये परत मिळतात. परंतु पोस्टात असं होतं नाही. पोस्ट ऑफिस तुम्हाला तुमच्या सर्व पैशांची हमी देते. बँकेच्या फिक्स्ड डिपॉजिटसारखीच पोस्ट ऑफिसचीही टाइम डिपॉझिट ही स्कीम आहे. ज्यात तुम्ही कमीत कमी
शेअर बाजाराची ऐतिहासिक झेप, सेन्सेक्सनं 35 हजारांचा टप्पा केला पार

शेअर बाजाराची ऐतिहासिक झेप, सेन्सेक्सनं 35 हजारांचा टप्पा केला पार

मुंबई, शेअर बाजारात बुधवारच्या दिवशी सकाळपासूनच चांगली तेजी पाहायला मिळाली. पहिल्यांदा इतिहास रचत सेन्सेक्सनं 35 हजारांचा टप्पा पार केला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीसुद्धा 10,760 हजारांपर्यंत गेला. यावेळी शेअर बाजार खरेदीदार वाढल्यानं मुंबई शेअर बाजारानं हा उच्चांक गाठला आहे. त्याप्रमाणेच आयटी कंपन्यांचं रेटिंग वाढल्याचाही शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला. दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी शेअर बाजारानं 312.89 अंकांची उसळी घेत 35,083पर्यंत पोहोचला. तर बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्येही 300 अंकांची वाढ झाली आहे. तसेच निफ्टीलाही 87.40 अंकांची मजबुती मिळाल्यानं तो 10,787पर्यंत गेला आहे. इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस, एचसीएलसह दुस-या कंपन्यांचं टार्गेटही वाढवण्यात आलं आहे. आयटी रेटिंग वाढल्यामुळे शेअर बाजार वधारला आहे. बँकिंग, ऑटोमोबाईल क्षेत्रातील शेअर्सला याचा चांगला फायदा झाला. अॅ
अनिल अंबानींची कंपनी दिवाळखोरीत, चिनी बॅंकेने दाखल केली याचिका

अनिल अंबानींची कंपनी दिवाळखोरीत, चिनी बॅंकेने दाखल केली याचिका

मुंबई, देशातील प्रमुख उद्योगपती कुटुंब असलेल्या अंबानी कुटुंबातील एक सदस्य अऩिल अंबानी सध्या अडचणीत सापडण्याची चिन्हं आहेत. चीनमधील एका बॅंकेने अनिल अंबानींच्या कंपनीविरोधात कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी)मध्ये याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. चायना डेव्हलपमेंट बॅंकेने (CDB) अनिल अंबानींच्या कंपनीविरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादात दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. दरम्यान, रिलायन्स कम्यूनिकेशनचे शेअर मंगळवारी(28 नोव्हेंबर) 3.37 टक्क्यांपर्यंत पडले. मात्र, बीएसईला माहिती देताना रिलायन्स कम्युनिकेशनच्या प्रवक्त्याने कंपनीला अशाप्रकारे कोणतीच नोटीस मिळाली नसल्याचं म्हटलं आहे. हे वृत्त केवळ मीडियामध्येच सुरू आहे. सर्व शेअरधारकांचं हित लक्षात घेऊन कंपनी जॉइंट लेंडर्स फोरम (JLF) सोबत काम करत आहे, तसंच चायना डेव्हलपमेंट बॅंक देखील जेएलएफमध्ये सक्रिय सहभाग घेत आहे, अस
आरकॉम वायरलेस व्यवसाय बंद करणार? 1200 नोकऱ्या जाणार

आरकॉम वायरलेस व्यवसाय बंद करणार? 1200 नोकऱ्या जाणार

मुंबई, अनिल अंबानी यांची आरकॉम म्हणजेच रिलायन्स कम्युनिकेशन कंपनी वायरलेस बिजनेस सेवा बंद करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या जवळपास बाराशे कर्मचाऱ्यांचं भवितव्य अंधारात आहे. ’30 नोव्हेंबरपर्यंतच तुम्ही कंपनीचे कर्मचारी आहात’ अशी माहिती आरकॉमने आपल्या कर्मचा-यांना दिली असल्याचं वृत्त इकोनॉमिक टाइम्सनं दिलं आहे. मुकेश अंबानींच्या जिओद्वारे मोफत कॉलिंग आणि स्वस्त इंटरनेटचा आरकॉमच्या व्यवहारावर परिणाम झाल्याचं कंपनीने म्हटलंय. आजपासून तीस दिवसांत वायरलेस बिझनेस बंद होईल , कोणत्याही परिस्थितीत आपण 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस हा बिझनेस सुरू ठेऊ शकत नाही, असं आरकॉमचे सीईओ आणि कार्यकारी निदेशक गुरदीप सिंह यांनी म्हटलं आहे.
शेअर बाजाराला नवसंजीवनी; सेन्सेक्स ३३ हजारांवर

शेअर बाजाराला नवसंजीवनी; सेन्सेक्स ३३ हजारांवर

मुंबई, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र सरकारने २.११ लाख कोटी रुपयांचे साहाय्य जाहीर केल्यानंतर याचे परिणाम बुधवारी शेअर बाजारावरही दिसले. बुधवारी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स वधारला आणि ३३ हजारचा पल्ला ओलांडला. तर निफ्टीनेही १०, ३२१.१५ वर झेप घेतली. निफ्टीने हा पल्ला गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दोन वर्षांकरिता २.११ लाख कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. यातील १.५५ लाख कोटी रुपये पुनर्भांडवली रोख्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. तर उर्वरित रकमेची तरतूद ही अर्थसंकल्पीय तरतूद आणि भांडवली बाजारातून निधी उभारणीतून येणार आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कर्जपुरवठा क्षमता आता भक्कम होईल, असा दावा केला जात आहे. केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर बुधवारी शेअर बाजारात बँकांचे शेअर्स वधारले. यात स्टेट बँक ऑफ इंडियाचा सर्वाधिक फा
रियल इस्टेट जीएसटीच्या कक्षेत आणण्यासंदर्भात पुढील महिन्यात चर्चा : अरूण जेटली

रियल इस्टेट जीएसटीच्या कक्षेत आणण्यासंदर्भात पुढील महिन्यात चर्चा : अरूण जेटली

नवी दिल्ली, जीएसटी ही करप्रणाली रियल इस्टेट किंवा बांधकाम क्षेत्राला लागू करण्याबाबत पुढील महिन्यात चर्चा करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले आहे. जेटली सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून हार्वर्ड विद्यापीठामध्ये ते बोलत होते. भारतामध्ये सगळ्यात जास्त करचुकवेगिरी रियल इस्टेट क्षेत्रात होते तसेच सर्वात जास्त रोखीचे व्यवहारही याच क्षेत्रात होतात असे जेटली म्हणाले. त्यामुळे रियल इस्टेट हे क्षेत्र जीएसटीच्या परीघात आणायला हवं असं माझं वैयक्तिक मत असल्याचे सांगत जेटली यांनी जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. "जीएसटी व रियल इस्टेट संदर्भात ज्या काही तक्रारी आहेत, त्यावर या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. काही राज्यांना हे हवंय तर काही राज्यांचा विरोध आहे," जेटली म्हणाले. रियल इस्टेट जीएसटी अंतर्गत आणलं तर ग्रा
टाटा टेलिसर्व्हिसेस बंद होणार; ५००० कर्मचाऱ्यांना नारळ

टाटा टेलिसर्व्हिसेस बंद होणार; ५००० कर्मचाऱ्यांना नारळ

मुंबई, टाटा सन्सच्या मालकीची टाटा टेलिसर्व्हिसेस ही दूरसंचार कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे. यासंबंधीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून टाटा टेलिसर्व्हिसेसकडून ५००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार असल्याचे समजते. त्यादृष्टीने या कर्मचाऱ्यांना तीन ते सहा महिन्यांची नोटीस देण्यात आली आहे. त्याआधी कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष पॅकेज देण्यात येणार आहे. तर मोजक्या कर्मचाऱ्यांना समूहातील इतर कंपन्यांमध्ये सामावून घेतले जाईल. गेली काही वर्षं टाटा टेलिसर्व्हिसेस सातत्याने तोटा सहन करतेय. या कंपनीवर ३४,००० कोटींचं कर्ज आहे. त्यातच, या कंपनीतील आपली २६ टक्के भागीदारी ‘डोकोमो’ या जपानी कंपनीनं काढून घेतलीय. दूरसंचार क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहता, स्वबळावर बाजारात टिकून राहणं “टाटा टेलिसर्व्हिसेस” साठी खूपच कठीण आहे. अशावेळी वेगवेगळ्या पर्यायांचा ते विचार करताहेत. पण, फारशा सकारात्मक हालचाली दि
भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी सलग दहाव्यांदा नंबर १

भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी सलग दहाव्यांदा नंबर १

मुंबई, ‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध मासिकाने नुकतीच २०१७ सालच्या भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली. सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबांनी यांनी India Rich List 2017 यादीतील अग्रस्थान कायम राखले आहे. त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा ३८०० कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात नोटबंदी आणि जीएसटी यासारख्या निर्णयांमुळे अनेक उद्योगांना घरघर लागली असताना मुकेश यांची संपत्ती ६७ टक्क्यांनी वाढली आहे. मुकेश अंबानी यांच्यापाठोपाठ ‘विप्रो’च्या अझीम प्रेमजी यांनी India Rich List 2017 यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यांच्याकडे एकूण १९०० कोटी डॉलर्सची संपत्ती आहे. तर सन फार्माच्या दिलीप संघवी यांची दुसऱ्या स्थानावरून थेट नवव्या क्रमाकांवर घसरण झाली आहे. त्यांच्याकडे सध्या १२१० कोटी डॉलर्स इतकी संपत्ती असल्याचे ‘फोर्ब्स’ने म्हटले आहे. यावेळी ‘फोर्ब्स’ने केलेली टिप्पणी महत्त्वाची म्हणाव
सोन्याच्या दरात मोठी उसळी, या वर्षातली सर्वात उच्चांकी वाढ

सोन्याच्या दरात मोठी उसळी, या वर्षातली सर्वात उच्चांकी वाढ

मुंबई, सोन्याच्या दरात या वर्षातली सर्वात मोठी 990 रुपयांची वाढ झाली आहे. सोनं तब्बल 31 हजार 350 रुपयांवर पोहोचलं आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे 10 महिन्यातील ही सर्वात उच्चांकी वाढ आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये सोन्याचे दर 31 हजार 200 रुपयांवर पोहोचले होते. सोन्याच्या दरवाढीमागे उत्तर कोरियाची बॉम्ब चाचणी हे कारण आहेच. परंतु आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे भारत आणि दक्षिण कोरियामध्ये झालेला करार. या करारानुसार, भारताने कोरियातून सोन्याची नाणी आयात केली तर त्यावर इम्पोर्ट ड्यूटी लागत नाही. मागील दोन महिन्यात दहा टन नाणी आयात झाली आहेत. शिवाय त्यावर जीएसटीही लागत नव्हता. त्यामुळे सोन्याचा दर कमी होता. सराकरने हे सोनं बाजारात आणून ते वितळवलं. परंतु सरकारला अपेक्षित महसूल मिळाला नाही. तसंच दीड महिन्यानंतर ही आयात बंद झाल्याने सोन्याचे दर वधारले आहेत. पुढील काही दिवस सोन्याचे दर चढेच राहण्याची श
लवकरच व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार

लवकरच व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार

मुंबई, व्हॉट्सअॅपसाठी लवकरच पैसे मोजावे लागणार आहेत. व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या यूजर्सना पैसे द्यावे लागतील, असे संकेत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. याबाबत ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने जाहीर केलेल्या अहवालात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. १०० कोटींहून अधिक यूजर्स व्हॉट्सअॅप वापरतात. त्याच्या वापरासाठी यूजर्सकडून पैसे घेतल्यास फेसबुकला मोठा नफा होईल, असे सांगण्यात येत आहे. व्हॉट्सअॅप आता काही नवीन फिचर्सची चाचणी घेत आहे. या फिचर्सचा वापर करुन ग्राहकांना त्याच्या आवडत्या कंपन्यांबरोबर थेट संवाद साधण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येईल, असे व्हॉट्सअॅपच्या एका ब्लॉग पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. आम्ही लहान कंपन्यांना मोफत व्हॉट्सअॅप बिझनेस अॅप्लिकेशन देणार आहोत. या नव्या अॅपमध्ये आपला व्यापार वाढवण्यासाठी कंपन्यांना खास टूल्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तर विमान कंपन्या, ई-कॉमर्स साईट्ससारख्