Wednesday, September 26

फॅशन

चेहर्‍याच्या शेपप्रमाणे निवडा गॉगल्स

चेहर्‍याच्या शेपप्रमाणे निवडा गॉगल्स

उन्हात गॉगल्स लावून निघणे फॅशन नसून आवश्यकता आहे. परंतू फॅशनेबल गॉगल्सने व्यक्तिमत्त्वात भर पडते. जर आपण ही गॉगल्स घेयला जात असाल किंवा स्टाईलिश दिसण्याची इच्छा असेल तर हे टिप्स आपल्यासाठी आहे- चेहर्‍याचा शेपप्रमाणे निवडा गॉगल्स * आपल्या चेहर्‍याच्या त्वचेनुसार योग्य रंगाची फ्रेम निवडा. पांढरा आणि सिल्वर भडक दिसतो. हलका गोल्डन, काळा, ब्राउन रंगाची फ्रेम चांगली दिसते. तसेच गडद निळी फ्रेम चेहर्‍यावरील डाग लपवण्यात मदत करतं. लाल फ्रेम चंकी-फंकी असल्यामुळे रेग्युलर यूज करणे योग्य ठरणार नाही. * ओव्हल फ्रेम ओव्हल चेहर्‍यावर सूट करत नाही. स्क्वेअर चेहर्‍यासाठी राउंड फ्रेम असलेले गॉगल्स छान दिसतात. तसेच राउंड किंवा ओव्हल शेप चेहर्‍यासाठी स्क्वेअर शेप फ्रेम सूट करेल. * गॉगल्सच्या मधला भाग नाकावर येत असेल असे गॉगल्समध्ये चेहरा लांब दिसतो. अशात गाल आणि डोळ्यांचा काही भाग दिसत असतो. अशी फ्रेम लह
स्टायलिश नाइटविअर

स्टायलिश नाइटविअर

प्रसंगानुरूप मनुष्य वेगवेगळ्या प्रकारचे आणि आवश्यकतेनुसार तर्‍हेतर्‍हेचे वस्त्रप्रकार उपयोगात आणत असतो. त्यातलाच एक प्रकार आहे नाइटविअर. हा एक असा प्रकार आहे, जो आपले स्थान केवळ टिकवूनच नाही, तर दिवसेंदिवस अधिकाधिक 'स्टायलिश' होत आहे. ज्या नाइटविअरला आपण अधिककरून गाउन या एकाच नावाने ओळखत, संबोधत असू तो आज कमालीच्या विविध अवतरांमध्ये दिसतो. कोणे एकेकाळी ज्याची सुरुवात झाली असावी, केवळ सोय व आवश्यकता म्हणून. दिवसभराच्या हर तर्‍हेच्या कपड्यांचे ओझे वागवून जीव व देह दोन्हींना जरा आराम मिळावा, यासाठी सुटसुटीत असा हा झोपतानाचा पोशाख म्हणजेच नाइटविअर. हे खरे वाटत नाही ना? तेव्हा या अपेक्षांची पूर्ती करायला रोज वापरून मऊसूत झालेला, अक्षरश: अंगवळणी पडलेला एखाद दुसरा रोजच्यातल्याच ड्रेसने तेव्हा सुरुवात झाली असावी. हळूहळू याच्याकडेही लक्ष दिले जाऊ लागले असावे. त्यामुळेच याला एक विशिष्ट रूप आले. मग
क्रेझ फिंगर वेव्हची

क्रेझ फिंगर वेव्हची

नेहमी त्याच-त्या हेअरस्टाइलचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर १९३०च्या दशकात लोकप्रिय ठरलेली ‘एस वेव्ह किंवा फिंगर वेव्ह’ स्टाइल तुम्हाला नवा लूक देऊ शकते. या स्टाइलमध्ये घरच्या घरीच केस सेट करता येतात, हे विशेष. नव्या जमान्यात व्हिंटेजचा फील देणाऱ्या या स्टाइलविषयी... केस ठेवा ओलसर - सर्वात आधी शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. केस पूर्णपणे कोरडे करु नका. काहीसे ओलसर केस असतानाच ही स्टाइल जास्ती चांगल्या प्रकारे सेट होते. हेअरस्टाइल अधिक वेळ टिकावी म्हणून जेलचाही वापर करा. केसांचं विभाजन करा - कंगव्याच्या एका बाजूला थोडे अधिक केस घ्या. यामुळे तुमचा भाग एका बाजूने दिसेल. केसांचं विभाजन शक्य तितक्या लांबपर्यंत करा, विभाजनाची रेषा सुंदर आणि सरळ दिसेल याकडे लक्ष द्या. केसांच्या मोठ्या भागाला कंगव्याच्या सहायाने समोरच्या बाजूला ओढा. आता केस मागच्या बाजूला ढकला. यामुळे पुढे आणलेले केस आणि मागच्या बाजू

परतली पॅरललची फॅशन

पेहरावातला थोडासा ट्रेंड लक्षात घेतला तर फॅशनशी हात मिळवणं सहज शक्य आहे. सलवार-कुडता हा अगदी सामान्य पेहराव. पण त्यातही कितीतरी आकर्षकता आणता येते. सध्या लांब कुडत्यावर पॅरललची फॅशन आहे. 'दुनियादारी'पासून ही फॅशन परतलीय. कॉलेजगोइंग मुलींबरोबर मुलांसाठीही पॅरलल हटके लूक देते. पार्टी असो किंवा सहल कुठेही पॅरलल शोभून दिसते. पार्टीसाठी पॅरललवर एम्ब्रॉयडरी किंवा लटकन असणारा कुडता लक्षवेधी ठरेल. मरूम आणि क्रीम रंगाची रंगसंगती आकर्षक दिसते. यामुळे पारंपरिक लूकही मिळतो. कुंदनयुक्त कलाकुसर पारंपरिकतेबरोबरच स्मार्ट लूक देऊ शकते. रोजच्या वापरासाठी लेस असलेला पॅरलल आणि कुडता जास्त छान दिसतो. या ड्रेसवर तुमच्या आवडीनुसार ओढणी घेतली किंवा नाही घेतली तरी चालते. अशा प्रकारे ही जुनी फॅशनही तुमच्या स्टाईलनुसार वेगळाच प्रभाव टाकण्यास पुरेशी आहे.

कसा घ्याल ‘ब्रा’चा माप

जर आपण ब्रा खरेदी करायला जात असाल आणि आपल्या स्तनाचा माप बदलून गेला असेल किंवा इतर कोणता ब्रँड घेत असाल तर अंदाज गडबडणे साहजिक आहे. म्हणून ब्रा खरेदी करण्यापूर्वी घरी व्यवस्थित माप घेऊन बाहेर पडला तर योग्य मापाची ब्रा घेणे सोपे जाईल. खाली दिलेल्या टिप्सने आपल्याला योग्य कपसाइज ब्रा खरेदी करता येईल. स्तन आणि ब्राचा साइज जाणून घेणे आवश्यक आहे कारण विभिन्न ब्रँडेचे माप भिन्न असतात, कप साइजचा माप वेगळा असतो जो आपल्या स्तनाला सुंदर आणि सुडौल दिसण्याचसाठी आवश्यक आहे. ट्रायल घेता येत असेल तर सर्व प्रश्नच सुटतील परंतू हे शक्य नसल्यास घरीच ब्राचा साइज मापून घ्या. खालील दिलेल्या स्टेप्सने आपण माप घेऊ शकता. स्तनाचा आकार मापण्यासाठी: आपल्या ब्रेस्टच्या खाली टेलरिंग टेप गुंडाळा. स्तनाच्या अगदी खालून सुरू करून पाठ कव्हर करत मापा. टेप जुळल्यावर जो नंबर दिसत असेल त्यात 5 जोडा. उदाहरणासाठी
समरसाठी खास क्यूलॉट्स

समरसाठी खास क्यूलॉट्स

उन्हाळा म्हटलं की घाम, चिकचिक आणि अस्वस्थता आलीच. त्यामुळे या दिवसात सुती आणि आरामदायी कपड्यांचा पर्याय निवडला जातो. अशा प्रकारांमध्ये पलझोसोबतच क्यूलॉट्सने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. हा ट्रेंड गेल्या वर्षापासनूच आहे पण यंदा हटके डिझाईन्सचा बोलबाला असेल. वॉर्डरॉब अपडेट करायच्या विचारात असाल तर क्यूलॉट्सची नक्की खरेदी करा. क्यूलॉट्‍सच्या य ट्रेंडवर एक नजर टाकूया.... * पार्टी, कॉलेज किंवा व्हेकेशनसाठी कपडे खरेदी करत असाल तर फ्लोरल क्यूलॉट्सना प्राधान्य देता येईल. विविध रंग आणि कॉम्बिनेशन्सचे क्यूलॉट्स लक्षवेधक ठरत आहेत. * थोडा हटके लूक मिळवायचा असेल तर फ्रंट लिस्टवाले क्यूलॉट्स ट्राय करा. क्रॉप टॉपसोबत ही फॅशन कॅरी करता येईल. * ऑफिससाठी फ्लेअरवाले हलक्या रंगांचे क्लूलॉट्स घेता येतील. * टिपीकल क्यूलॉट्सऐवजी काही वेगळं शोधत असाल तर तिरपा खिसा असलेले क्यूलॉट्स निवडा. हे अँटी फिट क्यूलॉ