Wednesday, September 26

पाक कृती

उन्हाळा स्पेशल : कांद्याचे आंबट गोड लोणचे

साहित्य :- छोटे-छोटे कांदे १०, मोहरी डाळ अर्धी वाटी, तेल १ वाटी, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, जिरेपूड, धणेपूड, मेथीदाणा प्रत्येकी १ चमचा, कैरी किस अर्धी वाटी, चिमूटभर साखर. कृती :- कांद्याचे साल काढून त्याला चार चिरे द्यावेत. (मसाल्याच्या वांग्यासारखे) कैरीच्या किसात हळद, तिखट, मीठ, मेथी भाजून त्याची पूड, जिरेपूड, धणेपूड, साखर एकत्र करावे. हा मसाला कांद्यात भरावा, गॅसवर पातेल्यात तेल गरम करा, थोडे कोमट असताना मोहरी डाळ घाला. तेल थंड झाल्यावर त्यातच भरलेले कांदे सोडा. कोरड्या बरणीत लोणचे भरून दादरा बांधा. टीप :- या लोणच्यात गूळ किवा साखर व कैरी किस थोडा जास्त घातल्यास छान आंबट-गोड लोणचे तयार होईल.

चिकन बिर्याणी

साहित्य : 650 ग्रॅम चिकनचे तुकडे, दीड कप बासमती तांदूळ, 2 मोठे चमचे तेल, 1 कापलेला कांदा, 2 पाकळ्या लसूण, 1 हिरवी मिरची कापलेली, 1 तुकडा अद्रक, 2 चमचा चिकन मसाला, 1 चमचा मीठ (चवीनुसार), 1/2 चमचा गरम मसाला, 3 कापलेले टोमॅटो, 1/2 चमचा हळद, 2 तेजपान, 4 लहान वेलची, 4 लवंगा, 1 चमचा केसर. कृती : तांदूळ धुऊन अर्था तास पाण्यात भिजवावे. एक पॅनमध्ये तेल गरम करून कांदे परतून घ्यावे. नंतर लसूण, आलं व हिरवी मिरची टाकून फ्राय करावे. चिकन टाकून पाच मिनिट फ्राय करावे. चिकन मसाला, मीठ आणि गरम मसाला घालून पाच मिनिट फ्राय करावे नंतर टोमॅटो घालून तीन-चार मिनिट आणखी भाजावे नंतर उतरवून एकीकडे ठेवावे. दुसऱ्या सॉस पॅन मध्ये तांदूळ, तीन कप पाणी, हळद, तेजपान, वेलची आणि केसर घालून पाणी आटेपर्यंत शिजवावे. शिजून झालेला भातात चिकन हळूच मिसळावे आणि कमी आंचेवर आठ-दहा मिनिट शिजवून आंच विझवावी व आठ-दहा मिनिटानंतर वाढावे.

व्हेजिटेबल हक्का नूडल्स

साहित्य - 250 ग्रॅम नूडल्स, 50 ग्रॅम कोबी, 25 ग्रॅम गाजर, दोन सिमला मिरच्या, 25 ग्रॅम फरस बीन, 25 ग्रॅम कांदा पात, आठ-दहा लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, चिली सॉस, सोया सॉस, मिरेपूड, टोमॅटो सॉस, तेल. कृती - सर्वप्रथम नूडल्स पाण्यात उकडावे. उकडताना पाण्यात एक चमचा तेल घालावे. त्यामुळे नूडल्स एकमेकांना चिकटत नाही. नूडल्स शिजल्यानंतर चाळणीत गाळून टेबलावर थंड होण्यासाठी पसरावे. तेल घालून मिक्स करावे. कोबी, गाजर, सिमला मिरच्या, फरस बीन, कांदापात पातळ लांबट कापून घ्यावे. एका कढईत तेल घालून गरम करून त्यात लसूण, कापलेल्या भाज्या घालून परतावे. चिली सॉस- सोया सॉस, टोमॅटो सॉस- मिरेपूड- मीठ मिक्स करून नूडल्स घालून हलवावे. चवदार हक्का नूडल्स तयार आहे.

एग मलाई

साहित्य - 4 अंडी उकळलेली, 1 चमचा तूप, मोहरी-जीरे थोडेसे, 3-4 चमचे फेटलेली दूधाची साय, 10-12 काळ्यामिरची पावडर, मीठ चवीनुसार. कृती - सर्वप्रथम उकळलेली अंडी 4 भागात कापावे. एक पॅन मध्ये तूप गरम करून मोहरी-जिर्‍याची फोडनी करून कापलेल्या अंडीवर टाकावे. त्यानंतर फेटलेली साय टाकून मीठ आणि मिर्‍यांचे पावडर टाकून सर्व्ह करावे.

ड्राय फ्रूट्स मँगो लस्सी

साहित्य: 1 कप दही, 3 चमचे साखर, 1 आंबा, 5 बदाम, 2-3 ड्राप रोज वाटर, पिस्ते, बर्फाचे तुकडे कृती: आंब्याचे साले काढून लहान तुकडे कापून घ्या. बदाम आणि पिसते मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता मिक्सरमध्ये दही, आंबाच्या फोडी, पाणी, साखर टाकून पिसून घ्या. रोज वाटर मिसळा. अता हे मिश्रण गाळून घ्या. अता एका ग्लासात बर्फाचे तुकडे टाकून त्यात लस्सी आणि वरून ड्राय फ्रूट्स पावडर टाकूनसर्व्ह करा.

मटण दम बिर्याणी

साहित्य- अर्धा किलो मटण, बासमती तांदूळ तीन वाटय़ा, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, दोन टोमॅटो, दही, लिंबू, तिखट, मीठ, हळद, दोन कांदे, बिर्याणी मसाला. कृती- मटण धुऊन त्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबिरीची जाडसर पेस्ट लावून त्यातच दही, लिंबू, बारीक चिरलेले दोन टोमॅटो, तिखट, मीठ, ह़ळद, बिर्याणी मसाला घालून एक तासभर ठेवावे. हे सगळे मिश्रण मुद्दाम डायरेक्ट कुकरमध्येच ठेवून द्यावे, कारण बिर्याणी कुकरमध्येच करायची आह.   तांदूळ धुऊन पंधरा मिनिटं निथळत ठेवावे. त्यानंतर एका वेगळ्या पातेल्यात तांदूळ जेमतेम बुडतील एवढे पाणी घालून जरासा मोकळा भात शिजवून घ्यावा. कांदे उभे चिरून कढईत थोडे जास्त तेल घालून ब्राऊन रंगावर तळून घ्यावे. मग ते बाजूला एका पेपरवर काढून घ्यावे. 

गुढी पाडवा स्पेशल : श्रीखंड

साहित्य - दही दोन लिटर, साखर पाऊण किलो, विलायची 20 ग्रॅम, बादाम व काजू पन्नास ग्रॅम पूर्वतयारी - दही पांढरया शुभ्र कापडात बांधुन लटकवून ठेवावे बादाम व काजूचे बारीक तुकडे करावे विलायची बारीक करायची कृती - तासभर्‍या नंतर दही कापडातून पातेल्यात काढावे. संपूर्ण पाणी निघून गेल्याची खात्री करावी. साखर मिक्सर मधून काढून पिठी करावी. साखरेची पिठी पाणी काढलेल्या दह्यात मिसळावी. बारीक केलेले बादाम व काजू मिश्रणात घालावे. विलायची घालावी. मिश्रण चमच्याने फेटून घ्यावे. तयार झालेले श्रीखंड थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवावे. गव्हाची पोळी किवा रताळ्याच्या पोळ्यां सोबत मस्त मेजवानी झोडायची.

गुजराती स्पेशल : हंडवा

साहित्य : 2 वाटी तांदूळ, 1/2 वाटी चण्याची डाळ, 1/2 वाटी उडदाची डाळ, 1/4 वाटी तुरीची डाळ, 2 चमचे दही, 1 चमचा आलं, लसूण, मिरची पेस्ट, मीठ चवीनुसार, 1/4 चमचा हळद, 1 चमचा साखर, 1/2 चमचा धणे पूड, 1/2 चमचा सोडा. फोडणीचे साहित्य : 1 चमचा तीळ, 1/2 चमचा मोहरी, 1 चमचा तेल, कडी पत्ता, 4 लवंगा, कलमीचा तुकडा 1/2 इंच, 2 साबूत लाल मिरच्या. कृती : सर्वप्रथम तांदूळ व डाळींना 7-8 तासासाठी भिजत ठेवावे. नंतर त्यात दही घालून वाटून घ्यावे. 4-5 तास या मिश्रणाला खमीर येण्यासाठी तसेच ठेवावे. नंतर त्यात साखर, मीठ, सोडा, हळद व धणे पूड घालून 35 मिनिट बेक करावे. थंड झाल्यावर त्यांचे काप करावे. लवंग व कलमीला तव्यावर भाजून त्याची पूड करावी. गरम तेलात फोडणी देताना सर्व फोडणीचे साहित्य घालून फोडणी तयार करावी व काप केलेल्या तुकड्यांवर पसरवावी. चटणीसोबत सर्व्ह करावे.

कैरीचा सॉस

साहित्य : १ मध्यम आकाराची कैरी, चवीनुसार मीठ, मेथीची पूड पाव चमचा, गुळ १ चमचा, बडीशेप पूड १/४ चमचा, फोडणीसाठी १ चमचा तेल, हिंग व मोहरी, तिखट (लाल) १ चमचा.   कृती : प्रथम कैर्‍या कुकरमध्ये वाफवून घ्याव्यात. गार झाल्यावर त्याचा गर मिक्सरमधून काढावा, नंतर त्यात गूळ, मेथीची पूड, बडीशेप पूड, तिखट व मीठ घालावे. तेलाची हिंग मोहरीची फोडणी करून त्यात सर्व मिश्रण घालून एक उकळी आणावी व थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावे. उन्हाळ्याचा उकाडा कमी करण्यासाठी हे चटपटीत सॉस तोंडाला पाणी सोडणारे व रुचकर आहे. 

भाजणीच्या चकल्या

भाजणीचे साहित्य - 1 किलोग्रॅम तांदूळ, 1/2 किलो चणा दाळ, 1/4 किलो उडीद दाळ, अर्धा पाव मूग दाळ, एक मूठ धने, दोन चमचे जिरे, एक मूठ साबूदाणे. कृती - एका कढईत वरिल सर्व साहित्य एक एक करून गुलाबी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या. नंतर सर्व साहित्य एकत्र दळून घ्या. जितक्या कणकेच्या चकल्या करावयाच्या असतील तितकी कणिक एका कढईत घ्या. त्यात तेलाचे मोहन, चवीप्रमाणे तिखट, मीठ, ओवा, जिरे, चिमूटभर खाण्याचा सोडा दोन चमचे लोणी टाकून हे कणिक जास्त सैलही नाही व घट्टही नाही असे मळून घ्या. चकल्याचा साचा घेवून त्याला आतून तेल लावून वरिल भजिविलेली थोडी थोडी कणिक घेऊन चकल्या पाडून घ्या. एका कढईत तेल तापवून तयार केलेल्या चकल्या लालसर रंग होईपर्यंत तळून घ्या.