Sunday, January 20

देश

3,700 कोटींची ऑनलाईन फसवणूक; टोळीला अटक

3,700 कोटींची ऑनलाईन फसवणूक; टोळीला अटक

नोएडा - ऑनलाईन फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून साडे सहा लाख युजर्सची तब्बल 3 हजार 700 कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. नोएडातील सेक्‍टर 63 मधून उत्तर प्रदेश पोलिसांनी अनुभव मित्तल, श्रीधर प्रसाद आणि महेश दयाल यांना ताब्यात घेतले आहे. गाझियाबादमधील मित्तल हा बी.टेक. पदवीधारक असून या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. तर प्रसाद हा विशाखापट्टनममधील आणि दयाल मथुरेचा आहे. socialtrade.biz या संकेतस्थळाद्वारे हे तिघे युजर्सना ऑनलाईन पैसे कमाविण्याचे आमीष दाखवित होते. मात्र त्यासाठी युजर्सना 5,750 ते 57,500 दरम्यान कितीही रक्कम गुंतविणे आवश्‍यक असल्याचे सांगत होते. दरम्यान, ही टोळी वेळोवेळी संकेतस्थळाचे नाव बदलत होती. याद्वारे त्यांनी आतापर्यंत साडे सहा लाख लोकांना फसवून त्यांच्याकडून 3 हजार 700 कोटी रुपये मिळविले
संरक्षण दलांसाठी 2.74 लाख कोटी

संरक्षण दलांसाठी 2.74 लाख कोटी

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात संरक्षण दलांसाठी 2.74 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ही वाढ 6.2 टक्के आहे. संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाच्या कार्यक्रमांतर्गत भांडवली आराखड्यात 10.05 टक्के वाढ झाली आहे. संरक्षण दलांच्या तीनही विभागांना नवी शस्त्रास्त्रे, विमाने, लढाऊ जहाजे आणि अन्य लष्करी सामग्री खरेदी करण्यासाठीचा भांडवली आराखडा 86 हजार 488 कोटी रुपयांचा आहे. संरक्षण दलांसाठी दोन लाख 74 हजार 114 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यात संरक्षण भांडवलासाठीच्या 86 हजार कोटी रुपयांचा समावेश असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर संरक्षण दलांतील कर्मचाऱ्यांसाठी मध्यवर्ती प्रवास योजनाही त्यांनी जाहीर केली. संरक्षण दलांसाठीच्या भांडवली आराखड्यात 9.3 टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे सांगून संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांन