Monday, October 15

देश

शहीदांच्‍या कुटुंबियांना मदत करण्यासाठी नाना पाटेकर सरसावला, 10 कोटींचा निधी जमा करणार

उत्‍कृष्‍ट अभिनय, सेडेतोड प्रत्‍युत्‍तर आणि लोकांच्‍या मदतीसाठी ओळखल्‍या जाणाऱ्या नाना पाटेकरने भारतीय जवानांच्‍या संदर्भात महत्त्‍वाची घोषणा केली आहे. बॉलिवूड भास्‍करच्‍या एक्‍सक्‍ल्‍यूसिव्‍ह मुलाखतीमध्‍ये शहिद जवानांच्‍या कुटुंबियांना मदत करण्‍याची इच्‍छा नाना पाटेकरने व्‍यक्‍त केली आहे. यावेळी नाना पाटेकर म्‍हणाले, ' भारतीय जवान कोणत्‍या परिस्थितीमध्‍ये काम करत असतात, हे सर्वांना ठाऊक आहे. त्‍यांचे कुटुंबही कोणत्‍या मनोभूमिकेत जगत असतील, याचा आपण विचार करु शकतो. विशेषत: शहिद झालेल्‍या जवानांच्‍या कुटुंबावर काय परिस्थिती ओढावत असेल? म्‍हणूनच अशा कुटुंबीयांसाठी नाम फाउंडेशनने 10 कोटी रुपयांचा निधी जमा करण्‍याचे उद्दीष्‍ट ठेवले आहे.' पुढे नाना म्‍हणाले, 'मला माहिती आहे की, इतकी मोठी रक्‍कम जमा करणे काही सोपे उद्दीष्‍ट नाही. मी माझ्यातर्फे 50 लाख रुपये देणार आहे. आणखी 9.50 लाख रुपये ज
100 रुपयांची नवी नोट येणार

100 रुपयांची नवी नोट येणार

नोटबंदीनंतर आता 100 रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची तयारी रिझर्व्ह बँकेने सुरू केली आहे. मात्र 100 रुपयांच्या सध्या चलनात असलेल्या नोटा बाद न होता चलनात कायम राहणार आहेत. ही नोट महात्मा गांधी सीरिज-2005 सारख्याच असतील. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात आलेल्य अधिसूचनेत म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेकडून लवकरच नव्या बँक नोटा जारी करण्यात येणार आहेत. या नोटा महात्मा गांधी सीरिज-2005 सारख्याच असतील. या नोटांच्या दोन्ही नंबर पॅनलवर इनसेटलेटरमध्ये आऱ हे अक्षर लिहिलेले असेल. तर नोटांचा छपाई वर्ष 2017 असेल.  त्याबरोबरच आरबीआय 50 आणि 20 रुपयांच्या नव्या नोटाही चलनात आणणार आहे. मात्र त्यांच्याही जुन्या नोटा चलनात कायम राहतील.
सत्य अखेर बाहेर आले: साध्वी प्रज्ञा

सत्य अखेर बाहेर आले: साध्वी प्रज्ञा

भोपाळ- सुनील जोशी हत्याप्रकरणात निर्दोष सुटका झालेल्या साध्वी प्रज्ञा‍ सिंग ठाकूरयांनी सुटकेबाबत प्रतिक्रिया देताना सत्य अखेर बाहेर आल्याचे सांगितले. तसेच एक देशभक्त दुसर्‍या देशभक्ताची हत्या करू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातही आपल्याला गोवण्यात आल्याचा दावा करताना आपल्याला यामधून जामीन मिळेल असे त्या म्हणाल्या. साध्वी प्रज्ञा ही सध्या नायायालयीन कोठडीत असून त्यांच्यावर भोपाळ येथील इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
रिचार्ज शॉपवर 50 आणि 500 रुपयांमध्ये विकण्यात येत मुलींचे नंबर

रिचार्ज शॉपवर 50 आणि 500 रुपयांमध्ये विकण्यात येत मुलींचे नंबर

साधारण लुक असणार्‍या मुलींचे फोन नंबर 50 रुपयात आणि  सुंदर मुलींचे फोन नंबर 500 रुपयांमध्ये रिचार्जच्या दुकानांवर विकण्यात येत आहे. तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल की युपीत मोबाइल रिचार्जच्या दुकानांमध्ये बेकायदेशीर व्यवसाय चालत आहे. यानंतर सुरू होते असली कहाणी. मुलं या नंबरांवर फोन लावतात आणि जर मुलीने फोन उचलला तर तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतात. जर मुलगी बोलण्यास नकार देते तर तिच्यासोबत अभद्र गोष्टी करू लागतात. या रॅकेटचा भंडाफोड़ तेव्हा उघडकीस आला जेव्हा महिला हेल्प लाइन 1090 वर या प्रकाराच्या तक्रारी जास्त येऊ लागल्या. तुम्हाला सांगायचे म्हणजे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी महिलांसोबत उत्पीडनाची तक्रार नोंदवण्यासाठी 1090 हेल्पलाइन सुरू केली होती. या नंबरावर मागील 4 वर्षांमध्ये 6 लाखापेक्षा जास्त उत्पीडनाची तक्रार नोंदवण्यात आल्या आहेत. यात 90 टक्के तक्रार महिलांसोबत फोनवर उ
3,700 कोटींची ऑनलाईन फसवणूक; टोळीला अटक

3,700 कोटींची ऑनलाईन फसवणूक; टोळीला अटक

नोएडा - ऑनलाईन फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून साडे सहा लाख युजर्सची तब्बल 3 हजार 700 कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. नोएडातील सेक्‍टर 63 मधून उत्तर प्रदेश पोलिसांनी अनुभव मित्तल, श्रीधर प्रसाद आणि महेश दयाल यांना ताब्यात घेतले आहे. गाझियाबादमधील मित्तल हा बी.टेक. पदवीधारक असून या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. तर प्रसाद हा विशाखापट्टनममधील आणि दयाल मथुरेचा आहे. socialtrade.biz या संकेतस्थळाद्वारे हे तिघे युजर्सना ऑनलाईन पैसे कमाविण्याचे आमीष दाखवित होते. मात्र त्यासाठी युजर्सना 5,750 ते 57,500 दरम्यान कितीही रक्कम गुंतविणे आवश्‍यक असल्याचे सांगत होते. दरम्यान, ही टोळी वेळोवेळी संकेतस्थळाचे नाव बदलत होती. याद्वारे त्यांनी आतापर्यंत साडे सहा लाख लोकांना फसवून त्यांच्याकडून 3 हजार 700 कोटी रुपये मिळविले
संरक्षण दलांसाठी 2.74 लाख कोटी

संरक्षण दलांसाठी 2.74 लाख कोटी

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात संरक्षण दलांसाठी 2.74 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ही वाढ 6.2 टक्के आहे. संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाच्या कार्यक्रमांतर्गत भांडवली आराखड्यात 10.05 टक्के वाढ झाली आहे. संरक्षण दलांच्या तीनही विभागांना नवी शस्त्रास्त्रे, विमाने, लढाऊ जहाजे आणि अन्य लष्करी सामग्री खरेदी करण्यासाठीचा भांडवली आराखडा 86 हजार 488 कोटी रुपयांचा आहे. संरक्षण दलांसाठी दोन लाख 74 हजार 114 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यात संरक्षण भांडवलासाठीच्या 86 हजार कोटी रुपयांचा समावेश असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर संरक्षण दलांतील कर्मचाऱ्यांसाठी मध्यवर्ती प्रवास योजनाही त्यांनी जाहीर केली. संरक्षण दलांसाठीच्या भांडवली आराखड्यात 9.3 टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे सांगून संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांन