Monday, October 15

देश

फोर्ब्स मॅगझिन : श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानीच अव्वल

फोर्ब्स मॅगझिन : श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानीच अव्वल

नवी दिल्ली, फोर्ब्स मॅगझिननं श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रिज(आरआईएल)चे अध्यक्ष मुकेश अंबानी पहिल्या स्थानी आहेत. फोर्ब्स इंडियानं जाहीर केलेल्या ''इंडियाज 100 रिचेस्ट लिस्ट"मध्ये मुकेश अंबानींनी लागोपाठ अकराव्यांदा पहिलं स्थान पटकावलं आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे 4730 कोटी डॉलर(3.40 लाख कोटी)ची संपत्ती आहे. तसेच विप्रोचे अध्यक्ष अजिम प्रेमजी या यादीत दुस-या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2100 कोटी डॉलर(1.51लाख कोटी रुपये) आहे. आर्सेलर मित्तलचे मालक लक्ष्मी मित्तल हे 1830 कोटी डॉलर(1.31 लाख कोटी रुपये)सह तिस-या क्रमांकावर आहेत. चौथ्या स्थानी हिंदुजा ब्रदर्सना संधी मिळाली आहे. अशोक, गोपीचंद, प्रकाश आणि श्रीचंद हिंदुजा यांची एकूण संपत्ती 1800 कोटी डॉलर(1.29 लाख कोटी रुपये) आहे. बांधकाम व्यावसायात दबदबा असलेल्या शापूरजी पालोनजीचे मालक पालोनजी मिस्त्र
काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा मायावतींचा निर्णय

काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा मायावतींचा निर्णय

लखनऊ, लोकसभा निवडणुकीआधी महाआघाडी करुन भाजपाची कोंडी करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसलामायावतींनी धक्का दिला आहे. मध्य प्रदेश, राजस्थानात काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा असलेल्या मायावतींनीघेतला आहे. काँग्रेसचा दृष्टीकोन जातीयवादी असून त्या पक्षातील काहींना दोन्ही पक्षांची आघाडी नको असल्याचं मायावतींनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या सोहळ्यात देशातील भाजपाविरोधी पक्षांचे महत्त्वाचे नेते एकत्र आले होते. त्यावेळी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि मायावतींनी एकमेकांना आलिंगन दिलं होतं. तेव्हापासून मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेस आणि बसपाची आघाडी होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र काँग्रेसच्याच काही नेत्यांना आघाडी करण्याची इच्छा नसल्याचं म्हणत मायावतींनी 'एकला चलो रे'चा पवित्रा घेतला आहे. दि
पिता नव्हे हैवानच! सख्खा बाप करायचा मुलीवर रेप, गर्भधारणा झाल्याने समोर आले कृत्य

पिता नव्हे हैवानच! सख्खा बाप करायचा मुलीवर रेप, गर्भधारणा झाल्याने समोर आले कृत्य

जयपूर, कुठलीही मुलगी आपल्या विवाहात माहेर सोडताना आईला नव्हे तर वडिलांच्या गळ्यात पडून रडते. तिला आपल्या आईपेक्षा वडिलांवरच प्रेम आणि विश्वास असतो. परंतु, जयपूरमध्ये अशी घटना घडली की जगातील सर्वात पवित्र नात्याला काळिमा लागली आहे. येथे राहणारा एक बाप आपल्या सख्ख्या 16 वर्षांच्या मुलीला मारहाण आणि बळजबरी बलात्कार करायचा. आई घरात नसताना तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत तो तिच्यावर रोज अत्याचार करायचा. याच अत्याचारातून तिला गर्भधारणा झाली. आरोपी बिहारचा राहणारा असून तो सध्या फरार आहे. बापाचे पाप समोर आले तेव्हा आई आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी ठाकली. तिने आपल्या लेकीसाठी नराधमाचा सामना केला. त्यावर आरोपीने आपल्या पत्नीला लाठ्या-काठ्यांनी इतकी मारहाण केली की तिचा पाय तोडला. यानंतर तिला घरातून हकलून दिले. मोठे धाडस दाखवून मायकेलींनी पोलिस स्टेशन गाठले आणि नराधमाच्या विरोधात तक्रार दाखल केली
राफेल विमान खरेदी : अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या

राफेल विमान खरेदी : अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या

मुंबई, राफेल विमान खरेदी वरून सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अनिल अंबानींच्या अडचणीत भर पडली आहे. अनिल अंबानी आणि त्यांच्या उद्योग समूहातील दोन वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्याची परवनागी नसावी अशी मागणी करणारी याचिका स्विडीश दूरसंचार कंपनी एरिक्सननं केली आहे. अनिल अंबानींच्या कंपनीनं जाणून बुजून एरिक्सनचे ५५० कोटी रुपये थकवल्याचा स्विडीश कंपनीचा आरोप आहे.  अनिल अंबनींच्या एडीएजी उद्योग समूहाच्या डोक्यावर जवळपास ४५ हजार कोटींच कर्ज आहे.  या पार्श्वभूमीवर एरिक्सन कंपनीनं प्रत्यक्षातील १६०० कोटी रुपयांची थकबाकीची रक्कम तडजोड करून ५५० कोटींपर्यंत खाली आणली. अनिल अंबनींच्या समूहानं रक्कम ३० सप्टेंबरपर्यंत देण्यास कबुलीही दिली. प्रत्यक्षात मात्र रक्कम अदा करताना मुदत पाळण्यात आली नसल्याचा आरोप एरिक्सननं याचिकेत केला आहे. अनिल अंबानी आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना न्यायालयाच्या
रंजन गोगोई देशाचे 46 वे सरन्यायाधीश

रंजन गोगोई देशाचे 46 वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली, देशाचे 46 वे सरन्यायाधीश म्हणून न्या. रंजन गोगोई यांची निवड करण्यात आली आहे. आज (ता.03) त्यांनी सरन्याधीशपदाची शपथ घेतली. गोगोई यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2019 पर्यंत असणार आहे. माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सप्टेंबरमध्ये गोगोई यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीशपदासाठी केली होती. त्यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिल्यानंतर कायदा मंत्रालयाने अधिसूचना जारी करत गोगोई यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले होते. दीपक मिश्रा यांचा कार्यकाळ संपला असून बुधवार रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोगोई यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गोगोई यांचा कार्यकाल नोव्हेंबर 2019 पर्यंत असून त्यांना एकूण 13 महिन्यांचा कार्यकाळ असणार आहे. न्या. रंजन गोगोई यांची बहुतांश कारकिर्द गुवाहाटी उच्च न्याय
सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार बालाभास्कर यांचे निधन

सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार बालाभास्कर यांचे निधन

नवी दिल्ली, सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार बालाभास्कर यांचे मंगळवारी (2 ऑक्टोबर) सकाळी निधन झाले. गेल्या आठवड्यात कार अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले होते. तिरुवअनंतपुरममधील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. ते 40 वर्षांचे होते. या भीषण अपघातात बालाभास्कर यांची दोन वर्षांची मुलगी तेजस्विनीचा जागीच मृत्यू झाला होता. 25 सप्टेंबर रोजी थ्रिसूरमधील मंदिराचे दर्शन घेऊन बालाभास्कर कुटुंबीयांसोबत परतीचा प्रवास करत होते. यावेळेस पल्लिपुरम येथे त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. कारमध्ये चालक, बालाभास्कर, त्यांची पत्नी, मुलगीदेखील होते. अपघातात बालाभास्कर यांच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याला गंभीर इजा झाली होती. त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी बालाभास्कर यांचे निधन झाले. बालाभास्कर यांच्या पत्नी लक्
भारतीय सैन्याकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राइक?; गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे संकेत

भारतीय सैन्याकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राइक?; गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे संकेत

नवी दिल्ली, सीमेवर दोन-तीन दिवसांपूर्वी भारतीय सैन्याकडून सर्जिकल स्ट्राइकसारखी मोठी कारवाई केल्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. आपल्या जवानांनी सीमेवर सर्जिकल स्ट्राइक सारखं असं काही केलं आहे ज्याची माहिती तुम्हाला लवकरच कळेल, असे त्यांनी सुचकपणे म्हटले आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूरमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे संकेत दिले. त्याचबरोबर आपल्या सैन्यासोबत क्रूरता सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. राजनाथ म्हणाले, पाकिस्तानकडून नुकतेच आपल्या जवानांसोबत काही चुकीच्या गोष्टी केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या जवानांनी सीमेवर काही केलं आहे, काही लोकांना याची माहिती आहे. पुढील काही दिवसांत आपल्यालाही याची माहिती कळेल. भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईनंतरही पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवत नाहीए. त्यामुळे
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

जलपायगुडी, जलपायगुडी जिल्ह्यात एका तयार होणाऱ्या इमारतीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. मंगळवारी सायंकाळी जलपायगुडी सदर ब्लॉकमधील जहूरी तालमा भागात घडली. घटना घडली त्या वेळी पीडित मुलगी आपल्या बहिणीच्या घरी चालली होती, असे पोलिसांनी सांगितले. दोन तरुणांनी सायकलवरून जाणाऱ्या पीडित मुलीला थांबविले आणि जबरदस्तीने तिला पकडले. त्यानंतर ते एका इमारतीमध्ये घेऊन गेले, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. अन्य तीन जण तेथे थांबले होते. त्यानंतर त्यांनी सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जसजसे नागरिक घटनास्थळी जमायला लागले तसे आरोपींनी पलायन केले, असे पोलिसांनी सांगितले.
‘राष्ट्रवादी’चे खासदार तारीक अन्वर पक्षातून बाहेर; खासदारकीही सोडली

‘राष्ट्रवादी’चे खासदार तारीक अन्वर पक्षातून बाहेर; खासदारकीही सोडली

नवी दिल्ली, राफेल करारावरील वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतल्याने नाराज झालेले पक्षाचे खासदार तारीक अन्वर यांनी आज (शुक्रवार) तडकाफडकी राजीनामा दिला. अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचाही राजीनामा दिला आहे. तारीक अन्वर हे बिहारमधील कटिहार येथून लोकसभेवर निवडून गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अन्वर पवार यांच्यासोबत होते. 'राफेल करारामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हेतूंबद्दल काहीही शंका नाही', असे विधान शरद पवार यांनी केले होते. त्यावर अन्वर नाराज झाले होते. 'राफेल करारामध्ये पंतप्रधान मोदीही सहभागी आहेत. आतापर्यंत मोदी स्वत:ला निर्दोष सिद्ध करू शकलेले नाहीत. फ्रान्सच्या माजी अध्यक्षांच्या विधानावरून या करारामध्ये गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे'
अमित शाह यांच्या जीवाला धोका; राष्ट्रपती, पंतप्रधानांसारखी सुरक्षा तैनात

अमित शाह यांच्या जीवाला धोका; राष्ट्रपती, पंतप्रधानांसारखी सुरक्षा तैनात

नवी दिल्ली, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता एएसएलचे सुरक्षा कवच मिळाले आहे. देशातील निवडक व्यक्तींना ही सुरक्षा देण्यात येते. आतापर्यंत त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येत होती. गुप्तचर विभागाच्या समीक्षेनंतर गृहमंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुरक्षेअंतर्गत शाह यांना ज्या भागाचा दौरा करायचा आहे. तिथे सर्वांत आधी एएसएलचे पथक जाऊन सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करेल आणि त्यांच्या सुरक्षेसंबंधीच्या सूचनांचे राज्यांच्या पोलीस प्रशासनाला पालन करावे लागेल. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना अमित शाहंच्या नव्या सुरक्षा व्यवस्थेशी निगडीत प्रक्रियेचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. शाह यांच्या दौऱ्याच्या दोन आठवड्यांपूर्वी एएसएलचे पथक कार्यक्रमस्थळी