Tuesday, May 22

देश

महिलांनी अंगप्रदर्शन होणार नाही असे कपडे घालावे, सपा नेता बरळला

महिलांनी अंगप्रदर्शन होणार नाही असे कपडे घालावे, सपा नेता बरळला

नवी दिल्ली, समाजवादी पार्टीचे महासचिव रामशंकर विद्यार्थी यांनी महिलांच्या पोशाखावरून धक्कादायक विधान केलं आहे. महिलांच्या अश्लील कपडे वापरण्यामुळे लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं रामशंकर विद्यार्थी यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अंगप्रदर्शन करणारे कपडे घालू नये, असं धक्कादायक विधानही त्यांनी केलं आहे. 'देवाने स्त्री व पुरूषाच्या शरीराची ज्या प्रमाणे रचना केली आहे. त्याच प्रमाणे त्यांनी कपडे वापरायला हवे. अंगप्रदर्शन होणार नाही, असे कपडे त्यांनी वापरावे, असं रामशंकर विद्यार्थी म्हणाले. रामशंकर विद्यार्थी यांचं विधान सगळीकडेच चर्चेचा विषय आहे. रामशंकर विद्यार्थी यांनी वाईट प्रवृत्तीच्या विचारांसाठी मोबाइल फोन आणि इंटरनेटलाही दोषी ठरवलं आहे. 'देशाच लैंगिक समस्यांच्या वाढत्या घटनांमागे मोबाइल फोन आणि इंटरनेट हे महत्त्वाचं कारण आहे. वाईट प्रवृत्तीच्या घटनांना मोबाइल जबाबदार आहे. अल्पव
आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप, काँग्रेसने तर तबेलाच विकला : अमित शाह

आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप, काँग्रेसने तर तबेलाच विकला : अमित शाह

नवी दिल्ली, आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप केला जात आहे, मात्र काँग्रेसने तर संपूर्ण तबेलाच विकून खाल्ला आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली. कर्नाटक मतदान, निवडणूक निकाल आणि नंतर सत्ता स्थापनेच्या नाट्यमय घडामोडी या सर्व गोष्टींनंतर पहिल्यांदाच अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ओलीस ठेवले. काँग्रेस आणि जेडीएसने आपल्या आमदारांना विजयी रॅली काढण्याची परवानगी जरी दिली असती, तरी कर्नाटकात आज भाजपची सत्ता असती.”, असे अमित शाह म्हणाले. कर्नाटकमध्ये भाजप मोठा पक्ष असल्याने आम्ही सत्ता स्थापनेचा दावा केला. मात्र गोवा किंवा मणिपूरमध्ये काँग्रेसने मोठा पक्ष असतानाही सत्ता स्थापनेचा दावा केला नव्हता, त्यांचे नेते आराम करत होते, असे अमित शाह म्हणाले. तसेच, काँग्रेस पक्ष इतिहास विसरला असून, द
गांधी जयंतीदिनी रेल्वे होणार शाकाहारी!

गांधी जयंतीदिनी रेल्वे होणार शाकाहारी!

नवी दिल्ली, शाकाहाराचे खंबीर पुरस्कर्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीला तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुम्हाला संपूर्ण शाकाहारी बनावे लागेल. कारण, त्या दिवशी म्हणजे दोन ऑक्‍टोबरला कोणत्याही रेल्वे गाडीत किंवा स्थानकांवर मांसाहरी खाद्यपदार्थ उपलब्ध नसतील. रेल्वेने हा मांसाहार बंदीचा प्रस्ताव संस्कृती मंत्रालयाकडे दिला आहे. तो मंजूर झाल्यावर यंदापासून गांधी जयंती ही राष्ट्रीय स्वच्छता दिनाबरोबरच राष्ट्रीय शाकाहार दिन म्हणून साजरी केली जाण्याची, परिणामी मांसाहारी प्रवासी बांधवांसाठीही गांधी जयंती "ड्राय डे' ठरण्याची चिन्हे आहेत. गांधीजींच्या 150व्या जयंतीचा धडाका उडवून देण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. हा मुहूर्त 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतरचा असला तरी तो आपल्याच राजवटीत साजरा होईल, अशा जबर विश्‍वासाने मोदी सरकारने त्याची तयारी चालू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच
बहुमतचाचणीपूर्वीच येडियुरप्पांच्या राजीनाम्याची शक्यता

बहुमतचाचणीपूर्वीच येडियुरप्पांच्या राजीनाम्याची शक्यता

बंगळुरू, बहुमतापूर्वी बीएस येडियुरप्पा यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला जाण्याची शक्यता आहे. बहुमत चाचणीला अवघा एक तास शिल्लक असताना येडियुरप्पा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसा निरोप त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला पाठवला असल्याचं सांगण्यात येत आहे. बहुमत जुळण्याची शक्यता कमी असल्याने असं म्हटलं जात आहे. बहुमतासाठी ६ आमदारांची गरज आहे, ती पूर्ण होत नसल्याने, बहुमत चाचणीपूर्वीच येडियुरप्पा राजीनामा देतील असं अंदाज आहे. तसेच बहुमत चाचणीपूर्वी भाजपाच्या गोटात मोठी निराशा देखील दिसून येत आहे. बहुमताचा आकडा पार करण्याच्या सर्व आशा संपुष्टात आल्याने, येडियुरप्पांकडून आपली भूमिका भाषणातून मांडल्यानंतर ते राजीनामा सोपवतील असं म्हटलं जात आहे. येडियुरप्पा यांनी केंद्रीय नेतृत्वाला, बहुमत नसल्याने राजीनामा देण्याचा निरोप दिला असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व प्रकारच्या आटापिटा करून
गुजरातमध्ये सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक उलटला, १९ ठार

गुजरातमध्ये सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक उलटला, १९ ठार

अहमदाबाद, गुजरातमधील भावनगर- अहमदाबाद महामार्गावर सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक उलटल्याने १९ जणांचा मृत्यू झाला.या भीषण अपघातात ७ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भावनगर- अहमदाबाद महामार्गावर शनिवारी सकाळी सिमेंटच्या गोण्यांनी भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटला. या भीषण अपघातात ट्रकमधील १९ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ७ जण जखमी झाले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण तपासानंतरच समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
भाजपा आता सत्तेसाठी पैसा व बळाचा वापर करणार : राहुल गांधी

भाजपा आता सत्तेसाठी पैसा व बळाचा वापर करणार : राहुल गांधी

नवी दिल्ली, सुप्रीम कोर्टाने शनिवारी कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली. ‘भाजपाला कायद्याने रोखले आहे. पण आता सत्तास्थापनेसाठी भाजपा पैसा व बळाचा वापर करणार’ अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली. कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे काँग्रेसने स्वागत केले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला म्हणाले, अखेर संविधानाचा विजय झाला असून लोकशाही वाचली. येडियुरप्पा आता एक दिवसाचेच मुख्यमंत्री ठरतील. कर्नाटकच्या राज्यपालांचा संविधानविरोधी निर्णय हायकोर्टाने फेटाळला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरुन राज्यपाल वाला यांचा निर्णय अयोग्य असल्याचे
आता आयपीएलप्रमाणे कर्नाटकमधील आमदारांसाठी बोली लागणार : यशवंत सिन्हा

आता आयपीएलप्रमाणे कर्नाटकमधील आमदारांसाठी बोली लागणार : यशवंत सिन्हा

नवी दिल्ली, आयपीएलच्या धर्तीवर आता आमदारांचा लिलाव होईल, अशा शब्दांमध्ये भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीवरुन भाजपावर शरसंधान साधलं. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी बहुमत नसतानाही भाजपाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिल्यानं सिन्हा यांनी जोरदार टीका केली. 'राज्यपालांच्या निर्णयामुळे आता आयपीएलच्या धर्तीवर आमदारांचा लिलाव होईल, त्यांच्यासाठी बोली लागेल,' असं सिन्हा यांनी म्हटलं. 'भाजपाकडे सत्ता स्थापनेसाठी बहुमत नाही. त्यांना आठ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत भाजपा बहुमत कसं काय सिद्ध करणार? दुसऱ्या पक्षातील काही आमदार फोडूनच त्यांना बहुमत सिद्ध करावं लागले,' असं सिन्हा यांनी म्हटलं. राष्ट्रीय मंचाकडून 'घटना बचाव' आंदोलन सुरू असताना ते बोलत होते. भाजपाला सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण देणाऱ्या राज्यपाल वजुभाई वाला यांच्या भूमिकेबद्दल
येडियुरप्पांची खुर्ची राहणार की जाणार; उद्या 4 वाजता ठरणार

येडियुरप्पांची खुर्ची राहणार की जाणार; उद्या 4 वाजता ठरणार

नवी दिल्ली, उद्या संध्याकाळी 4 वाजता कर्नाटक विधानसभेत बहुमताची चाचणी घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा, अशी मागणी भाजपाच्या वकिलांकडून न्यायालयाकडे करण्यात आली होती. तर आम्ही उद्याही बहुमत सिद्ध करण्यास तयार आहोत, असा आक्रमक पवित्रा काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी घेतला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं उद्या 4 वाजता बहुमताची चाचणी घ्या, असा आदेश दिला आहे. त्यामुळे आता भाजपाला बहुमत टिकवण्यासाठी आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी दिला होता. भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं या दिवसांमध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या प्रकरणी काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर आज सुनावणी झाली. यावेळी येडियुरप
RSS जे करतंय तसं पाकिस्तान किंवा हुकूमशाहीतच होऊ शकतं : राहुल गांधी

RSS जे करतंय तसं पाकिस्तान किंवा हुकूमशाहीतच होऊ शकतं : राहुल गांधी

रायपूर, सध्या देशाच्या राज्यघटनेवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशातील स्वायत्त संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. असे केवळ पाकिस्तान किंवा हुकूमशाहीतच घडू शकते, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. ते गुरुवारी छत्तीसगढमधील जाहीर सभेत बोलत होते. कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर राहुल गांधींनी पहिल्यांदाच जनतेशी संवाद साधला. यावेळी राहुल यांनी कर्नाटकमधील आमदारांच्या पळवापळवीच्या राजकारणावर टीका केली. कर्नाटकमध्ये एका बाजूला आमदार आणि दुसरीकडे राज्यपाल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपामध्ये येण्यासाठी जनता दलाच्या (सेक्युलर) प्रत्येक आमदारासमोर 100 कोटी रूपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे यावेळी राहुल यांनी सांगितले. तत्पूर्वी राहुल यांनी ट्विटरवरूनही कर्नाटकमधील राजकीय नाट्यावर भाष्य केले होते. भाजपाचे नेते येडियुरप्पा य
येडियुरप्पांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

येडियुरप्पांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

बंगळूर, कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेसाठी बुधवारी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सत्तासुंदरीची माळ भाजपच्याच गळ्यात पडल्याचे आज (गुरुवार) पहाटे स्पष्ट झाल्यानंतर आज सकाळी नऊ वाजता भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजूभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केल्यानंतर आज सकाळी नऊ वाजता येडियपुरप्पा यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आल्यामुळे राजकीय घोडेबाजार तेजीत येणार हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज पहाटे याचिकेवर सुनावणी करताना येडियुरप्पा यांचा शपथविधीचा मार्ग मोकळा केला होता. मात्र, त्यांना समर्थन असलेल्या आमदारांचे पत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे. उद्या (शुक्रवार) पुन्हा या प्रकर