Sunday, January 20

तकनीक

लवकरच फेस स्कॅनिंगद्वारे लॉगइन करता येणार फेसबुक!

लवकरच फेस स्कॅनिंगद्वारे लॉगइन करता येणार फेसबुक!

मुंबई, अनेकदा आपल्याला फेसबुकचा पासवर्ड लक्षात राहत नाही. पासवर्ड लक्षात न राहिल्याने वारंवार नव्या पासवर्डची मागणी करून आपल्याला फेसबुक अनलॉक करावं लागतं. आपल्या जवळच्या व्यक्तीला पासवर्ड माहिती असेल तर आपल्या नकळत फेसबुक अकाऊंट वापरले जाण्याची शक्यता असते. थोडक्यात काय तर सध्याच्या पासवर्ड प्रणालीमुळे आपल्याला अनेक अडचणी येतात. पण लवकरच तुमच्या या अडचणीवर तोडगा निघणार आहे. कारण फेसबुक सध्या फेस रिकग्नेशन या नव्या पर्यायाची चाचणी करत आहे. त्यामुळे युजर्सना आपला चेहरा स्कॅन करून फेसबुक अनकलॉक करता येणार आहे. ‘टेकक्रंच’ने फेसबुकच्या या नव्या फीचरबद्दल माहिती दिली आहे.  फेसबुकसाठी फेशियल रेकग्निशन हे तंत्र काही नवं नाही. तुमच्या सोबत फोटोमध्ये इतर मित्र मैत्रीणी असतील तर त्यांची नाव काय आहेत हे फेसबुक अगदी अचूक ओळखतो. तेव्हा एखाद्या मित्राला टॅग करताना तुम्हाला त्याच्या नावाची शोधाशोध करावी

व्हॉट्सअॅपचे जुने ‘स्टेटस फिचर’ परत येणार

व्हॉट्सअॅप युजर्सना हवे असलेले जुने व्हॉट्स अॅप स्टेटस फिचर हे पुढच्या आठड्यापासून परत येणार आहे. गेल्या महिन्यात व्हॉट्सअॅपने ‘व्हॉट्सअॅप स्टेटस’ हे नवे फिचर आणले होते. खरं तर या फिचरला लोकांचा नकारात्मक प्रतिसाद जास्त लाभला होता. हे फिचर आल्यापासूनच काही तासांतच ते काढून टाकण्यासाठी युजर्सने मागणी केली होती. त्यानंतर व्हॉट्स अॅपने जुने स्टेटस फिचर लवकरच परत आणणार असल्याचे सांगितले, पण आता पुढच्या आठवड्यापासूनच हे जुने फिचर परत येणार आहे. सुरूवातील अँड्राईड फोनवर हे जुने फिचर उपलब्ध होणार आहे नंतर आयफोनवर हे फिचर उपलब्ध होईल. त्यामुळे पूर्वीसारखेच व्हॉट्सअॅप युजर ‘Available’, ‘Busy’ यासारखे स्टेटस ठेवू शकतात. पूर्वीसारखे आपले स्टेटस ते कस्टमाईजही करू शकतात. जुन्या स्टेटसाठी एक वेगळा आयकॉन दिला जाणार आहे. पण याचबरोबर नवे फिचरही तसेच राहणार आहे. या फिचरचा वापर करून युजर्स पूर्वीसारखे फोटो,

फक्त आवाजावर हॅक केला जाऊ शकतो तुमचा स्मार्टफोन

यूनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन आणि यूनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कैरलाइनामधील संगणक सुरक्षा संशोधकांनी अशा एका त्रुटीची माहिती मिळवली आहे ज्यामध्ये डिव्हाइस फक्त अ‍ॅक्सेलेरोमीटरच्या माध्यमातून हॅक केलं जाऊ शकतं. अ‍ॅक्सेलेरोमीटर्स स्मार्टफोन, फिटनेस मॉनिटर्स आणि वाहनांमध्ये वापरलं जात. अ‍ॅक्सेलेरोमीटरच्या मदतीने कोणत्याही फिरत्या किंवा वायब्रेटिंग वस्तूचा प्रवेग मापला जातो. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी फिटबिट फिटनेस मॉनिटरमध्ये जाणुनबुजून चुकीच्या स्टेप्सची नोंद केली. यानंतर अ‍ॅक्सेलेरोमीटरला कंट्रोल करण्यासाठी स्मार्टफोनच्या स्पीकरमध्ये एक संशयित म्यूझिक फाईल प्ले केली. यामध्ये त्यांना स्मार्टफोन अवलंबून असणा-या सॉफ्टवेअरसोबत छेडछाड करण्याची संधी मिळाली. संशोधकांनी याचप्रमाणे रिमोट कंट्रोलवरील खेळण्याची गाडीला नियंत्रित करणा-या अॅपसोबतही छेडछाड करण्यात यश मिळवलं. संशोधक केविन फ्यू यांनी सांग
समुद्राच्या पाण्यापासून स्वस्तात पेयजल, चैतन्यचा अभिनव शोध

समुद्राच्या पाण्यापासून स्वस्तात पेयजल, चैतन्यचा अभिनव शोध

सॅन फ्रान्सिस्को : भारतीय वंशाच्या अमेरिकन विद्यार्थ्याने एक अभिनव शोध लावला आहे. समुद्राचं खारं पाणी पेयजलात बदलण्याचा सर्वात स्वस्त आणि सोपा उपाय चैतन्य करमचेडूने शोधून काढला आहे. उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचं लक्ष या युवा संशोधकाने वेधलं आहे. ओरेगनमधील पोर्टलँडमध्ये राहणारा चैतन्य माध्यमिक शाळेत शिकतो. चैतन्यने केलेल्या विज्ञानाच्या एका प्रयोगाने अवघ्या देशाचं लक्ष त्याच्याकडे लागलं आहे. ‘माझ्याकडे जगाला बदलवणारी मोठी योजना आहे. प्रत्येक आठ व्यक्तींमागे एकाला पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही. ही एक गंभीर समस्या असून ती दूर करण्याची गरज आहे. पृथ्वीचा जवळपास 70 टक्के भाग समुद्राने व्यापला आहे. मात्र त्यात खारट पाणी आहे. हे पाणी पिण्यायोग्य बनवण्याचा उपाय खूपच महागडा आहे. हाच या मार्गातला मोठा अडथळा आहे’ असं चैतन्यने सांगितलं. ‘शोषून घेणाऱ्या उच्च दर्जाच्या पॉलिमरसोबत मी हा प्