Sunday, January 20

जरा हटके

चार पाय आणि दोन लिंग असलेल्या बाळाचा जन्म!

गोरखपूर, उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात जिगिना गावात एका महिलेने चक्क चार पाय आणि दोन लिंग असलेल्या बाळाला जन्म दिला आहे! हा दैवी चमत्कार असल्याचं मानून गावकरी बाळाला पाहायला एकच गर्दी करत आहे. बाळाची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले आहे. मात्र डॉक्टरांनी याबाबत आताच काहीही सांगता येणार नसल्याचे म्हटले असून वैद्यकीय तपासणी नंतरच याबाबत काही कळेल असे सांगितले. येथील जिगिना गावात भूलन निषाद हे आपली पत्नी रंभा हिच्यासोबत राहतात. भूलन हे मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचे पोट भरतात. रंभाला शनिवारी (ता. 15) प्रसूतीकळा सुरू झाल्या. स्थानिक सरकारी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तिथे तिने चार पाय आणि दोन लिंग असलेल्या बाळाला जन्म दिला. हे पाहून डॉक्टरांसह त्याच्या आई-वडिलांनाही धक्का बसला.

28 वर्षांपूर्वी Nurse ने ज्या बाळाचा जीव वाचवला, त्याच रुग्णालयात तो Doctor होऊन परतला

कॅलिफोर्निया, अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात एका रुग्णालयामध्ये नवीन डॉक्टरची भरती झाली. त्या नवीन डॉक्टरने जॉइनिंग करताच तेथील एका नर्सची भेट घेऊन तिला आपले नाव सांगितले. सुरुवातीला तिला काहीच कळाले नाही, पण यानंतर तिला याच रुग्णालयात 28 वर्षांपूर्वी घडलेला किस्सा आठवला आणि तिच्या डोळ्यात आश्रू तरळले. ती इतकी भावूक झाली की तिने हसऱ्या चेहऱ्यासह त्या डॉक्टरला घट्ट मिठी दिली. हा डॉक्टर तोच मुलगा होता ज्याचा जीव वाचवण्यासाठी नर्सने दिवसरात्र मेहनत घेतली होती. तोच मुलगा आता तिच्यासोबत या रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करणार आहे. कॅलिफोर्नियातील ल्यूसल पॅकर्ड बाल रुग्णालयात 1990 मध्ये अतिशय गंभीर अवस्थेत एका मुलाला दाखल करण्यात आले होते. बाळाला आयसीयूत दाखल करण्यात आले होते. शरीरातील अंतर्गत अंगांची वाढ व्यवस्थित न झाल्याने त्याला अत्यंत काळजीची गरज होती. अवघ्या 29 आठवड्यात जन्मलेल्या प्री-मॅ
प्रोमोशन ची वाट पाहत होता कर्मचारी, कंपनीने बोनसमध्ये दिली चक्क पॉर्न स्टार!

प्रोमोशन ची वाट पाहत होता कर्मचारी, कंपनीने बोनसमध्ये दिली चक्क पॉर्न स्टार!

बीजिंग, प्रत्येक कर्मचारी प्रोमोशन, पगारवाढ आणि बोनससाठी आणखी चांगले परफॉर्म करण्याचा प्रयत्न करत राहतो. यात कंपन्या सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी दरवर्षी पगारवाढीसह बोनस आणि इन्सेंटिव्हची घोषणा करत असतात. हे बोनस आणि इन्सेंटिव्ह कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पैसे किंवा शेअर्सच्या स्वरुपात देतात. परंतु, चीनच्या एका कंपनीने हद्दच केली. यात कर्मचाऱ्याला जे मिळाले त्याने विचारही केला नव्हता. ऐकायला विचित्र वाटेल परंतु, हेच सत्य आहे. चीनच्या शांघाय येथील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याला बोनसमध्ये प्रसिद्ध पॉर्नस्टारसोबत एक रात्र दिली. कंपनीने वार्षिक परफॉर्मन्सनुसार, सर्वांची यादी तयार केली. त्यामध्ये एका कर्मचाऱ्याला इतरांच्या तुलनेत बेस्ट मानले. त्याने एकट्यानेच केलेल्या मेहनतीमुळे कंपनीला करोडोंचा फायदा झाला होता. त्याने कंपनीला अनेक डील मिळवून दिल्या. त्यावर कंपनी इतकी खुश झाली

कोल्ड ड्रिंक्स पितोय हा चायनीज बकरा

अलीगड, उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये असलेला अडीच फुटाचा बकरा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या बकऱ्याची खाशियत त्याच्या उंचीवरुनच नाही तर खाण्या-पिण्यावरुन सुद्धा आहे. हा बकरा चीनहून आणला आहे. त्यामुळे या बकऱ्याचे नाव 'चायनीज' असे ठेवले आहे. 'चायनीज'ला पाहण्यासाठी मालकाच्या घरासमोर लोकांची गर्दी होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी येथील स्थानिक मीडियामध्ये 'चायनीज'बद्दल बातमी आली होती. या बातमीनंतर 'चायनीज'चे मालक अब्दुल वासिद यांच्या घराबाहेर त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. लांबून लोक 'चायनीज'ला पाहण्यासाठी येत आहेत. काही लोकांनी 'चायनीज'ला खरेदी करण्यासाठी मालकाला ऑफर दिली आहे. मात्र अब्दुल वासिद यांनी 'चायनीज'ला विकण्यास नकार दिला आहे. अब्दुल वासिद यांनी सांगितले की, माझ्या घरातील मंडळी 'चायनीज'ची कुर्बानी देणार होते. मात्र त्याला काही दिवस पाळण्याचा मी निर्णय घेतला आहे. 'चायनीज'च

महिलेनं कापलं पतीचं गुप्तांग

वेल्लोरे, प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले गेल्यानंतर गावकऱ्यांसमोर आपल्या प्रेमाची पोलखोल होईल या भीतीने घाबरलेल्या एका महिलेने तिच्या पतीचं गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून तिला अटकही केली आहे. वेल्लोरेच्या गुडियाट्टम येथे ही धक्कादायक घटना घडली. जयंथी असं या महिलेचं नाव आहे. तिचा नवरा सेंथामराई हा शेतकरी आहे. रविवारी गावातील मंदिरात आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात या दोघांनीही भाग घेतला होता. त्यानंतर या दोघांनी रस्त्यावर सुरू असलेलं पथनाट्यही पाहिलं. दुपारी दीडच्या सुमारास जयंथी या गर्दीतून बाहेर पडली. तासभर झाला तरी जयंथी परत न आल्याने सेंथामराईने तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या प्रियकराशी काही तरी वाद घालताना त्याने तिला पाहिलं. सेंथामराईने या दोघांनाही रंगेहाथ पकडून त्यांना त्यांच्या अनैतिक संबंधांची कबुली देण्य

फेसबुकवर ‘विकी डोनर’; स्पर्म डोनेट करून ‘तो’ झाला २२ मुलांचा बाप

ग्लास्गो, फेसबुकवर अवैधपणे आपल्या स्पर्मची जाहिरात देऊन 22 मुलांचा पिता झाल्याचा आरोप एका व्यक्तीवर ठेवण्यात आला आहे. ग्लास्गोमध्ये राहणाऱ्या 39 वर्षीय व्यक्तीनं त्याच्यावर झालेले हे आरोप मान्य केले आहेत. ज्या महिलांना मुलं हवं असतं, मात्र त्यांना ते होत नाही, अशा महिलांना मी घरी बोलावून स्पर्म द्यायचो, अशी कबुली अँथनी फ्लेचरनं (नाव बदललं आहे) दिली आहे. यासाठी कोणत्याही महिलेकडून पैसे घेतले नसल्याचंही आरोपीनं सांगितलं. 'द सन'नं दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडमधील जवळपास 50 महिलांना स्पर्म डोनेट केल्याची माहिती अँथनी फ्लेचरनं दिली. या महिला मातृत्त्वासाठी आसुसलेल्या होत्या, असंही त्यानं सांगितलं. '5 वर्षांपूर्वी मला याबद्दलची प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी महिलांना मोफत स्पर्म देऊन त्यांची मदत करु लागलो. मुलं होऊ न शकलेल्या महिलांना सहाय्य करण्याचं काम मी केलं,' असं अँथनी यांनी सांगितलं. फ्लेच

सोन्याचे बूट, सोन्याची टाय नवरदेवाचा लग्नात राजेशाही थाट!

लग्न म्हटलं की काही लोक अगदी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. काहीजण लग्न समारंभ अगदी भव्यदिव्य करण्यासाठी वाट्टेल तितके पैसे खर्च करायलाही मागेपुढे पाहत नाही. सध्या पाकिस्तानमधल्या एका नवरदेवाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या नवरदेवानं आपल्या लग्नात फक्त बूट आणि टायवर चक्क २५ लाखांचा खर्च केला. लग्नासाठी त्यानं १० तोळ्यांची सोन्याची टाय तयार करून घेतली होती ज्याची पाकिस्तानी मुल्याप्रमाणे किंमत होती पाच लाख. तर सोन्याचा मुलामा असलेला कोटही त्यानं परिधान केला होता यासाठी त्यानं ६३ हजार रुपये मोजले तर सोन्याची टाय आणि कोटला साजेसे असे सोन्याचे बूटही त्यानं तयार करुन घेतले होते ज्यासाठी त्यानं १७ लाख मोजले होते. त्याच्या शूट आणि टायच्या किंमतीत एखाद्याचं थाटामाटात लग्न झालं असतं इतकंच काय एखाद्याला छोटंसं घरही विकत घेता आलं असतं. या नवरदेवाचं नाव हाफिज सलमान शाहदिद असल्याचं समजत आहे. स्

वडिलांच्या जिद्दीला सलाम! तब्बल २४ वर्षांनी शोधलं हरवलेल्या मुलीला

‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे’ असं म्हणतात. चिनमधील या वडिलांच्याबाबतीत ही म्हण तंतोतंत खरी ठरते. कारण अथक शोधाशोध केल्यानंतर अखेर तब्बल २४ वर्षानंतर त्यांना त्यांची हरवलेली मुलगी सापडली आहे. वॅंग मिंगक्विंग असं त्या वडिलांचं नाव आहे. १९९४ मध्ये त्यांची मुलगी हरवली होती. तेव्हापासून मिंगक्विंग आणि त्यांची पत्नी मुलीचा शोध घेत होते. वॅंग मिंगक्विंग हे त्यावेळी फ्रूट स्टॉल चालवायचे. त्या दिवशी आपल्या तीन वर्षाच्या मुलीला एकटं ठेवून अगदी काही मिनिटांसाठी ते बाहेर गेले होते, पण तेवढ्या वेळातच त्यांची मुलगी बेपत्ता झाली. मुलीचा शोध कसा घ्यावा हेच त्या दांपत्याला समजत नव्हतं. त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली, सार्वजनिक ठिकाणी मुलीचे पोस्टर बनवून लावले, रूग्णालयामध्ये, पाळणाघरात ज्या ज्या ठिकाणी मुलगी असण्याची शक्यता त्यांना वाटली त्या सर्व ठिकाणी त्यांनी आपल्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्

अबब ! बँक खात्यात अचानक जमा झाले 9,99,99,999 रुपये

जहांगीरपुरी, जर तुमच्या बँक खात्यात अचानक १० कोटी रुपये जमा झाल्याचा मेसेज आला तर नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. असंच काहीसं झालं जेव्हा एक मोबाइल शॉप चालवणा-या तरुणाच्या मोबाइलवर हा मेसेज आला. आपण एका मिनिटात करोडपती झालो आहोत यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. खात्यात ९ कोटी, ९९ लाख, ९९ हजार, ९९९ रुपये जमा झालेले पाहून त्याच्या कुटुंबियांचाही आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. पण त्यांचा आनंद काही क्षणांपुरताच होता. पैसे काढण्यासाठी तरुण गेला असता अकाऊंट ब्लॉक करण्यात आल्याचं त्याला समजलं. बातमी पसरताच तरुणाच्या घरी लोकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. विनोद कुमार आपल्या कुटुंबासोबत जहांगीरपुरी परिसरात राहतो. घराजवळच त्याचं मोबाइल शॉप आहे. जहांगीरपुरी येथील एसबीआय ब्रांचमध्ये त्याचं बचत खातं आहे. रविवारी दुपारी जवळपास दोन वाजण्याच्या सुमारास पैसे जमा झाल्याचा मेसेज आला होता.

मुलगा हवा म्हणून 83 वर्षाच्या वृद्धाने 30 वर्षाच्या मुलीबरोबर केले लग्न

जयपूर, कुटुंबाला वारस हवा म्हणून राजस्थानात राहणाऱ्या सुकराम बैरवा या 83 वर्षाच्या वृद्धाने त्याच्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीबरोबर लग्न केले. बैरवाचे हे दुसरे लग्न आहे. वडिलोपार्जित संपत्तीची देखभाल करण्यासाठी मुलगा हवा म्हणून 83 वर्षाच्या सुकरामने 30 वर्षाच्या मुलीबरोबर लग्न केले. सुकराम आधीपासूनच विवाहित असल्यामुळे दुसरे लग्न गुन्हा ठरतो. या प्रकरणी आपण लक्ष घालू असे अधिकाऱ्यांनी सांगितले. राजस्थानच्या सामराडा गावात हा विवाह पार पाडला. या लग्नासाठी आसपासच्या 12 गावातून पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. एका गंभीर आजारपणामध्ये सुकराम बैरवाने 20 वर्षांपूर्वी त्याचा एकुलता एक मुलगा गमावला. त्याच्याकडे भरपूर पैसा, जमीन जुमला आहे. त्याची काळजी घेण्यासाठी वारस हवा म्हणून सुकराने त्याच्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीबरोबर लग्न केले. सुकरामची पत्नी बॅट्टो त्याच्या या दुसऱ्या लग्नासाठी त