Thursday, November 15

गुढीपाडवा

ट्रेण्ड रेडिमेड गुढीचा

ट्रेण्ड रेडिमेड गुढीचा

गुढी म्हणजे आनंद, विजय आणि स्वागताचे प्रतीक. उंच बांबूपासून गुढी तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंबाचा, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे (तांब्या) बसवला जातो. नंतर गुढी पाटावर उभी केली जाते. मात्र आताच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात गुढी उभारण्यासाठी पुरेसा वेळही मिळणे कठीण झाले आहे. याला पर्याय म्हणूनच रेडिमेड गुढीचा नवा ट्रेण्ड निर्माण झाला. आता गुढीपाडवा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबई, ठाणे येथील बाजारपेठांमध्ये विविध आकाराच्या आकर्षक गुढय़ा ग्राहकांना भुरळ पाडत आहेत. साधारण ६५ ते २३0 रुपयांपर्यंत विविध आकाराच्या गुढय़ा बाजारात उपलब्ध आहेत. यंदा ५ ते १0 रुपयांनी गुढय़ांच्या किमतीत वाढ झाली असल्याचे दुकानदार प्रतीक विध्वंस यांनी सांगितले. तर गेल्या चार-पाच वर्षांपासून रेडिमेड गुढीचा ट्रेण्ड बाजारात आला असून अलीकडे या छोट्या गुढय़ा
गुढीपाडव्याचा गुढार्थ

गुढीपाडव्याचा गुढार्थ

चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. शालिवाहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो. शालिवाहन शक नावाच्या कुंभार समाजाच्या मुलाने याच दिवशी मातीचे सैनिक बनवून त्यावर पाणी शिंपडले आणि त्यांना सजीव बनविले. त्यांच्या मदतीने शत्रूंचा सामना केला. या विजयाच्या प्रित्यर्थ शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला. शालिवाहनाने मातीच्या सैन्यातही प्राणांचा संचार केला ही लाक्षणिक कथा आहे. त्यावेळी लोक चैतन्यहीन, पौरूषहीन आणि पराक्रमहीन बनले होते. त्यामुळे शत्रूसमोर त्यांचा टिकाव लागत नव्हता. मातीपासून निर्मित सैन्य विजयश्री कसे मिळवून देऊ शकते? पण शालिवाहनने त्या चैतन्यहीन लोकांमध्येही चैतन्यांचा संचार केला. पौरूष्य आणि पराक्रम जागविला आणि शत्रू पराजीत झाला. आजच्या झोपलेल्या चैतन्यहीन समाजाला जागे करण्यासाठीही अशा शालिवाहनांची आवश्यकता आहे. मानवा
यंदा दोन दिवस गुढीपाडवा

यंदा दोन दिवस गुढीपाडवा

महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी दोन दिवस गुढीपाडव्याचा सण साजरा होणार आहे. २८ मार्च रोजी फाल्गुन अमावस्या सकाळी ८ वाजून २७ मिनिटांपर्यत आहे. त्यानंतर ‘अमा समारती’चे स्नान करूनच घरच्या देवांचे पूजन आणि गुढी (ब्रम्हध्वज) पूजन करावे. हा दिवस क्षय तिथी असल्यामुळे शुभकार्याला वर्ज्यच आहे. मात्र, सूर्य सिद्धांत पंचांग मानणा-या दक्षिण-उत्तर भारतात सर्वत्र चैत्र शुद्ध प्रतिपदेचा वर्षारंभ, रामनवरात्रारंभ हे चैत्राचे वसंतोत्सव दि. २९ मार्च रोजी होणार आहेत, त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा दोन दिवस असणार आहे.