Saturday, February 23

खेल

‘आयपीएल’मध्ये या पाच खेळाडूंच्या बोलीकडे असेल सर्वांचे लक्ष..

‘आयपीएल’मध्ये या पाच खेळाडूंच्या बोलीकडे असेल सर्वांचे लक्ष..

‘आयपीएल’मध्ये या पाच खेळाडूंच्या बोलीकडे असेल सर्वांचे लक्ष.. ‘आयपीएल’च्या १० व्या पर्वासाठी खेळाडूंच्या लिलावासाठी सर्व संघ मालक संपूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहेत. आयपीएल म्हटलं की, क्रिकेट प्रेमींसाठी रोमांचक सामन्यांसाठीची पर्वणी असते. स्पर्धेतील आठ संघ लिलावासाठीच्या तयारीला लागले आहेत. प्रत्येक संघ आपल्या ताफ्यात सर्वोत्तम खेळाडूला दाखल करण्यासाठी उत्सुक आहेत. गेल्या वर्षभरात क्रिकेट विश्वात काही खेळाडूंनी आपल्या अप्रतिम कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयपीएल स्पर्धेचा इतिहास पाहता या स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स हे संघ यशस्वी ठरले आहेत. यातील चेन्नई सुपरकिंग्ज संघावर दोन वर्षांची बंदी आहे. या संघांसोबतच यावेळी इतरही संघ आपली कामगिरी उंचावण्यासाठी संघात सध्या चांगल्या फॉर्मात असलेले खेळाडू दाखल करून घेण्याच्या तयारीत असणार आहेत. यातील कोणत

मराठमोळ्या मधुरिकाला राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेचं जेतेपद

मुंबई : महाराष्ट्राच्या मधुरिका पाटकरनं पहिल्यांदाच राष्ट्रीय टेबल टेनिसच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. महिला एकेरीमध्ये मधुरिकाने ही अभिमानास्पद कामगिरी बजावली. हरयाणातल्या मानेसरमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मधुरिका पाटकरनं सहावेळा राष्ट्रीय विजेत्या ठरलेल्या पौलोमी घटकवर 4-0 अशी मात केली. तिनं चार गेम्समध्ये 11-5, 11-9, 11-5, 12-10 असा विजय मिळवला. मधुरिकाने अंतिम सामन्यात पूर्ण एकाग्रतेने पौलोमीला टक्कर दिली. पहिल्या तीन गेम्समध्ये मधुरिकाने पौलोमीला चांगलंच तंगवलं. शेवटच्या गेममध्ये पौलोमीने काँटेकी टक्कर दिली, मात्र अखेर मधुरिकाने आपलं पहिलंवहिलं जेतेपद पटकावलं. सेमीफायनलमध्ये मधुरिकाने मनिका बत्रावर 4-2 ने मात केली होती. मधुरिका पाटकर ही मूळची ठाण्याची असून, लग्नानंतर ती मुंबईतल्या मुलुंडमध्ये स्थायिक झाली आहे.
सचिननंतर पहिल्यांदाच क्रिकेटच्या ‘धर्मग्रंथा’वर विराटचा फोटो

सचिननंतर पहिल्यांदाच क्रिकेटच्या ‘धर्मग्रंथा’वर विराटचा फोटो

मुंबई : क्रिकेटचा धर्मग्रंथ अशी ओळख असलेल्या विस्डेन मासिकाच्या मुखपृष्ठावर यंदा विराट कोहलीला स्थान मिळणार आहे. एप्रिलमध्ये प्रकाशित होणाऱ्या विस्डेनच्या आवृत्तीवर विराटचा रिव्हर्स स्वीप शॉट मारतानाचा फोटो छापला जाणार आहे. विस्डेन मासिकाच्या मुखपृष्ठावर छायाचित्र प्रसिद्ध होणारा विराट हा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी 2014 साली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर त्याचा फोटो विस्डेनच्या मुखपृष्ठावर छापण्यात आला होता. कसोटी, वन डे आणि टी ट्वेंटी या तिनही प्रकारांमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराटने त्याच्या कारकीर्दीतली सर्वोच्च 235 धावांची पारी खेळली होती. या इनिंगमधील रिव्हर्स स्वीप मारतानाचा फोटो कव्हर पेजवर छापण्यात येणार आहे. विराटपूर्वी 2014 मध्ये सचिनचा फोटो या मासिकाच
आता वन डेतही सुपर ओव्हर…!

आता वन डेतही सुपर ओव्हर…!

दुबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तानं वन डे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच सुपर ओव्हर खेळवण्यात येऊ शकते. इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत आणि महिलांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकात उपांत्य फेरीचे सामने किंवा अंतिम सामना टाय झाल्यास, निकालासाठी सुपर ओव्हरच्या पर्यायाला आयसीसीनं मंजुरी दिली आहे. याआधी केवळ अंतिम सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरचा पर्याय ठेवण्यात आला होता. ट्वेन्टी20 क्रिकेट स्पर्धांमध्ये अनेकदा साखळी फेरीच्या लढतींमध्येही सुपर ओव्हरचा वापर झाला आहे. मात्र वन डेत याआधी एकदाही सुपर ओव्हरचा वापर झालेला नाही.
अॅलेस्टर कूकचा इंग्लंडच्या कर्णधारपदाचा राजीनामा

अॅलेस्टर कूकचा इंग्लंडच्या कर्णधारपदाचा राजीनामा

लंडन : भारत विरोधात टेस्ट, वनडे आणि टी-20 मध्ये पराभव झाल्यानंतर इंग्लंडच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे. इंग्लंडचा टेस्टच फॉरमॅटचा कर्णधार अॅलेस्टर कूकने राजीनामा दिला आहे. 5 वर्षापासून कूक इंग्लंडचं नेतृत्व करत होता. कूकच्या नेतृत्वात इंग्लंडने 2013 आणि 2015 साली झालेल्या अॅशेस सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर दक्षिण आफ्रिका, भारत, श्रीलंका यांना देखील इंग्लंडने पराभवाचा धक्का दिला.
दृष्टिहीन खेळाडूंच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा दणदणीत विजय

दृष्टिहीन खेळाडूंच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा दणदणीत विजय

क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लांइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम ) आणि क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड ऑफ इंडिया (सीएबीआय ) यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या आणि आजपासून मुंबईत सुरु झालेल्या दृष्टिहीन खेळाडूंच्या दुसऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. मुंबईतील एमसीए मैदानावर हा क्रिकेटचा सामना रंगला होता. या स्पर्धेत भारतीय संघाने 13.5 ओव्हरमध्ये 168 धावा काढून नवा विक्रम प्रस्थापित केला. तर दक्षिण आफ्रिकेला 157 धावांवर समाधान मानावे लागले. मुंबईत सुरु असलेल्या दृष्टिहीन खेळाडूंच्या या टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टॉस भारताने जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यास्पर्धेत भारताचा खेळाडू गणेश मुंडकर हा सामनावीर ठरला. दृष्टिहीन खेळाडूंचा हा अनोखा सामना याची देही याची डोळा पाहण्यासाठी अभिनेता अतुल कुलकर्णी, अभिनेता अनुपम खेर तसे
तुम्ही कोहलीला डिवचु नका; अन्यथा…: हसी

तुम्ही कोहलीला डिवचु नका; अन्यथा…: हसी

मेलबर्न - ""भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली याला डिवचु नका; अन्यथा त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही,'' असा इशारा ज्येष्ठ ऑसी खेळाडू मायकेल हसी याने दिला आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान विराट हा ऑस्ट्रेलियाचा "सर्वांत महत्त्वाचा सार्वजनिक शत्रु' असेल, अशी प्रतिक्रियाही हसी याने व्यक्त केली. भारत व ऑस्ट्रेलियामधील कसोटी सामन्यांच्या मालिकेस येत्या 23 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. कोहली याला चिडविणे ऑस्ट्रेलियास महाग पडू शकण्याचा इशारा देत हसी याने कोहली याला लवकरात लवकर बाद करण्याची योजना आखण्यावर ऑस्ट्रेलियाने लक्ष केंद्रित करावे, असे म्हटले आहे. आशिया खंडामध्ये पाच वा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांपैकी हसी हा सर्वाधिक सरासरी असलेला फलंदाज आहे. 2013 मध्ये निवृत्ती घेतलेल्या हसी याने 79 कसोटी सामन्यांत 6235 धाव
8 धावांत 8 बळी : 71 वर्षांतील अनोखा विक्रम

8 धावांत 8 बळी : 71 वर्षांतील अनोखा विक्रम

बंगळुरू : यजुवेंद्र चहालने एका पाठोपाठ एक गडी बाद करीत इंग्लंडच्या संघाला तंबूत परत पाठविल्यामुळे मागील 71 वर्षांमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पराभव इंग्लंडला स्वीकारावा लागला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे 8 धावांमध्ये शेवटचे 8 बळी या एका वेगळ्या विक्रमाची काल नोंद झाली. टी-20 मालिकेतील इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताने 75 धावांनी धूळ चारत मालिका जिंकली. या सामन्यामध्ये भारताने इंग्लंडचे 8 धावांमध्ये शेवटचे 8 बळी घेतले. 119 धावसंख्या असताना इंग्लंडचे तिसरा गडी बाद झाला. त्यानंतर 127 धावांवर त्यांचा शेवटचा फलंदाज बाद झाला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 1946 साली कसोटी सामन्यामध्ये न्यूझीलंडचे 5 धावांमध्ये 8 गडी बाद केले होते. त्या विक्रमाच्या जवळ जाणारा हा विक्रम भारताकडून टी-20 सामन्यात नोंदविला गेला. दरम्यान, सुरेश रैनाने काल एक जोरदार षटकार मारला तेव्हा