Saturday, August 18

खेल

मिताली राजने 5,500 धावांचा गाठला टप्पा – ठरली दुसरी महिला क्रिकेटर

मिताली राजने 5,500 धावांचा गाठला टप्पा – ठरली दुसरी महिला क्रिकेटर

महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात 5,500 धावांचा टप्पा पार करणारी मिताली राज दुसरी महिला क्रिकेटर ठरली आहे. श्रीलंकेत खेळल्या जाणा-या विश्वकप क्वालिफायरमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कप्तान मिताली राज हिने शानदार खेळी करत 5,500 धावांचा टप्पा पार केला. जागतिक  महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा व्रिक्रम इंग्लंडची खेळाडू कार्लोट एडवर्ड हिच्या नावावर आहे. कार्लोट एडवर्डने 5,992 धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसरा क्रमांक मिताली राज हिचा आहे. विशेष म्हणजे, मिताली राज हिने आयसीसी वनडे रँकिंगमध्‍ये फलंदाजांच्‍या यादीत दुसरा क्रमांक मिळविला आहे.
मॅच फिक्सिंगप्रकरणी पाकच्या आणखी एका खेळाडूचं निलंबन

मॅच फिक्सिंगप्रकरणी पाकच्या आणखी एका खेळाडूचं निलंबन

लाहोर : पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये मॅच फिक्सिंगप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आणखी एका क्रिकेटरवर कारवाई केली आहे. पीसीबीने कसोटी क्रिकेटर नासिर जमशेदचं निलंबन केलं आहे. पीसीबीने गेल्या आठवड्यातच शर्जिल खान आणि खलिद लतीफवरही निलंबनाची कारवाई केली होती. त्या दोघांनी तपासणीदरम्यान नासिर जमशेदने आपली संशयित सट्टेबाजासोबत भेट घडवून आणण्याचं ठरवलं होतं, अशी माहिती दिली होती. त्यानंतर जमशेदवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 27 वर्षीय नासिरने दोन कसोटी, 48 वन डे आणि 18 ट्वेन्टी20 सामन्यांत पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं होतं. पण 2015 सालच्या विश्वचषकानंतर तो संघाबाहेरच आहे. दोन वर्षांपूर्वी बांगलादेश प्रीमियर लीगदरम्यान बीसीबीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकानंही नासिरची चौकशी केली होती.
अश्विनने केली भज्जीच्या विक्रमाशी बरोबरी

अश्विनने केली भज्जीच्या विक्रमाशी बरोबरी

हैदराबाद, दि. 13 - भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने आपला सहकारी भज्जी (हरभजन सिंग)च्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटीत गोलंदाजी करताना अश्विनने पहिल्या डावत दोन आणि दुसऱ्या डावात चार बळी घेतले. कसोटीमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची अश्विनची ही 25 वेळ आहे. आश्विनने 45 कसोटी सामन्यांत हा पराक्रम करताना भज्जीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. 45 कसोटीत 84 डावात गोलंदाजी करताना अश्विनने हा पराक्रम केला आहे. सध्या संघाबाहेर असलेला भारतीय ऑफ स्पिनर भज्जीने 103 कसोटीत 190 डावात हा 25 वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले आहेत. अश्विनने सामन्यांत सात वेळा १० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले आहेत. त्याने चार शतके झळकावताना १८१६ धावा फटकावल्या आहेत. तर या मोसमात 63 बळी घेतले आहेत. काल अश्निनने सर्वांत कमी कसोटी सामन्यांत २५० बळी घेण्याचा विक्रम नोंदव
मला मुरलीधरनची भीती वाटायची : सेहवाग

मला मुरलीधरनची भीती वाटायची : सेहवाग

अनेक गोलंदाजांना धडकी भरवणाऱ्या टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने, त्याला कोणत्या गोलंदाजाची भीती वाटत होती, याबाबतचं गुपीत उघड केलं आहे. “माझ्या 14 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत मला श्रीलंकेचा माजी गोलंदाज  मुथय्या मुरलीधरनचीच भीती वाटायची”, असं सेहवागने कबूल केलं. मुरलीधरनचा अचूक टप्पा आणि गोलंदाजी शैलीमुळे त्याच्या गोलंदाजीवर खेळणं अवघड होतं, असं सेहवागने सांगितलं. क्रिकेट कारकिर्दीत सेहवाग आणि मुरलीधरन यांचा अनेकदा सामना झाला. मुरलीधरनने तीनवेळा सेहवागला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मात्र सेहवागने 2008 च्या श्रीलंका दौऱ्यात मुरलीधरन आणि अजंता मेंडिस यांच्या गोलंदाजीवर चांगलाच प्रहार केला होता. गॅले कसोटीत सेहवागने नाबाद 201 धावा ठोकल्या होत्या. याशिवाय सेहवाग आणि मुरलीधरन यांच्यातील आणखी एक द्वंद्व 2009 मध्ये मुंबई कसोटीत पाहायला मिळालं होतं. त्यावेळीही सेहवागने श्र
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर कपिल शर्माच्या शोमध्ये अखेर का आलेला नाही..?

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर कपिल शर्माच्या शोमध्ये अखेर का आलेला नाही..?

कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील मोठमोठ तारे दिसले आहेत. पण काही स्टार्स असेही आहेत, ज्यांना कपिल शर्माने अनेक वेळा त्याच्या शोमध्ये आणण्याचे प्रयत्न केले आहेत. पण कोणत्या ना कोणत्या कारणांनी त्यांनी कपिलला नकार दिला आहे. या कलाकारांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा समावेश आहे. पण कपिल शर्माने अशाच एका रहस्यावरुन पडदा उठवला आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर कपिल शर्माच्या शोमध्ये अखेर का आलेला नाही, याचा उलगडा स्वत: कपिलने केला आहे. कपिल म्हणाला की, जे लोक चांगली कामं करतात, ज्यांचं आयुष्य प्रेरणादायी आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला मला माझ्या शोमध्ये आमंत्रित करायचं असतं. लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर हे अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. ते माझा शो पाहतात. पण मी त्यांना शोमध्ये येण्याचं आमंत्रण देतो, तेव्हा आम्ही शोमध्ये येऊन काय बोलणार, असं उत्तर ते
बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत भारताचा विजय

बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत भारताचा विजय

हैदराबाद, दि. 13 - कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली एकापोठापाठ एक मालिका जिंकत सुटलेल्या भारतीय संघाने बांगलादेशचाही दणदणीत पराभव केला. बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशवर 208 धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या 459 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 250 धावांवर आटोपला. अखेरच्या दिवशी बांगलादेशमसोर विजयासाठी 356 धावांचे आव्हान होते. रविंद्र जाडेजा, आर अश्विन यांच्या फिरकीसमोर बांगलादेशचे फलंदाज ढेपाळले. अश्विनने 4 , जाडेजाने 4 तर, इशांत शर्माने 2 गडी बाद केले. पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर शाकीब अल हसनच्या रुपाने बांगलादेशला चौथा धक्का बसला. रविंद्र जाडेजाने त्याला 22 धावांवर चेतेश्वर पूजारकरवी झेलबाद केले. त्यानंतर 162 धावांवर कर्णधार मुशाफीकुर रहमानच्या रुपाने बांगलादेशला पाचवा धक्का बसला. त्याने 23 धावा केल्या. अश्विनने
आता शिखर धवनचं एकच लक्ष्य!

आता शिखर धवनचं एकच लक्ष्य!

भारतीय संघातून वगळण्यात आलेला सलामीचा फलंदाज शिखर धवननं राष्ट्रीय संघातल्या पुनरागमनासाठी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. यंदा 1 ते 18 जून या कालावधीत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या निवडीला अजूनही तीन महिन्यांचा अवधी आहे, याकडे लक्ष वेधून धवन म्हणाला की, त्या अवधीत मला तीन-चार स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यात सर्वोत्तम कामगिरी बजावली, तर मला भारताच्या वन डे संघात पुनरागमनाची संधी मिळू शकते, असा विश्वासही धवननं व्यक्त केला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांत शिखर धवन अपयशी ठरला होता. तिसऱ्या सामन्यापासून त्याला भारताच्या वन डे संघातून वगळण्यात आलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर तो कसोटी क्रिकेटही खेळलेला नाही.तसंच 2016 सालच्या मार्च महिन्यानंतर शिखर धवनला भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघातूनही व
युसूफ पठाण हाँगकाँग लीगमध्ये खेळणार

युसूफ पठाण हाँगकाँग लीगमध्ये खेळणार

युसूफ पठाण हा परदेशी लीगमध्ये खेळणारा भारताचा पहिला क्रिकेटर ठरणार आहे. बीसीसीआयनं त्याला हाँगकाँग ट्वेन्टी ट्वेन्टी लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. या लीगच्या सामन्यांना आठ मार्चपासून सुरुवात होत आहे. या लीगमध्ये युसूफ पठाण कोवलून कॅन्टॉन्सचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्याला हाँगकाँग लीगमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयची परवानगी मिळाल्यानं भारतीय क्रिकेटची परिमाणं बदलणार आहेत. पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी आणि इंग्लंडचा टायमल मिल्स यांच्यानंतर युसूफ पठाण हा कोवलून कॅन्टॉन्सचा सर्वात महागडा खेळाडू आहे. हाँगकाँग ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या दुसऱ्या सत्राला 8 मार्चला सुरुवात होणार आहे. 12 मार्चपर्यंत ही स्पर्धा रंगेल. या स्पर्धेत 4 संघ सहभागी झाले आहेत. पहिल्या चार दिवसात साखळी सामने होतील, त्यानंतर 12 मार्चला फायनल होईल. दरम्यान, स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर या महिला खेळाडूंनाही ऑस्ट्रेलियाच्या
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोन खेळाडूंवर निलंबनाची कारवाई

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोन खेळाडूंवर निलंबनाची कारवाई

कराची : पाकिस्तानचे दोन क्रिकेटर खालिद लतीफ आणि शरजील खान यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं निलंबित केलंय. या दोघांनाही दुबईहून परत पाठवण्यात आलंय. खालिद आणि शरजील यांच्यावर पाकिस्तान सुपर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप आहे. पीसीबीनं दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे आता क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मेटमधून निलंबित राहतील. इंटरनॅशनल क्रिकेटर काऊन्सिल (आयसीसी) या प्रकरणाची पुढील चौकशी करेल. ओपनर बॅटसमन असलेला शरजील नुकताच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियच्या दौऱ्यावर गेला होता. शरजील हा गेल्या वर्षी पीएसएल एलिमिनेटरमध्ये शतक ठोकणारा एकमेव खेळाडू ठरला होता.
हाशिम आमलाने तोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड

हाशिम आमलाने तोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड

शुक्रवारी जेव्हा भारतीय कर्णधार विराट कोहलीने सलग चौथं कसोटी द्विशतक साजरं करत सर डॉन ब्रॅडमॅन आणि राहुल द्रविड यांचा रेकॉर्ड तोडला, तेव्हा जगाच्या दुस-या कोप-यात दक्षिण अफ्रिकेच्या हाशिम आमलाने विराट कोहलीचा एक वन-डे रेकॉर्ड तोडला. रेकॉर्डबद्दल बोलायचं गेलं तर हाशिम आमला विराट कोहलीला नेहमी स्पर्धा देत असतो. आता हाशिम आमलाने सर्वात जलद गतीने 24 वन-डे शतक करण्याचा रेकॉर्ड तोडला आहे. हाशिम आमलाने 142 सामन्यांमध्ये हा रेकॉर्ड केला आहे. कोहलीला हा रेकॉर्ड करण्यासाठी 161 सामने खेळावे लागले होते. आश्चर्य वाटेल मात्र हाशिम आमला आणि विराट कोहलीमध्ये सुरु असलेल्या या शतकांच्या स्पर्धेत अजून एक खेळाडू आहे. शुक्रवारी जेव्हा आमलाने विराटचा रेकॉर्ड तोडला, तेव्हा त्याच सामन्यात त्याचा साथीदार खेळाडू क्विंटन डी कॉकने हामलाचा रेकॉर्ड तोडला. कॉकने 74 सामन्यांमधलं आपलं 12वं शतक ठोकलं. कॉकने हामलाचा 81 सा