Saturday, February 23

खेल

रवी शास्त्री करतोय या बॉलीवूड अभिनेत्रीला डेट?

रवी शास्त्री करतोय या बॉलीवूड अभिनेत्रीला डेट?

क्रिकेट आणि बॉलीवूडचं नातं काही रसिकांना नवीन नाही. विराट कोहली आणि अनुष्का शर्मानं लग्न केल्यानंतर आता नव्या जोडप्याची चर्चा सुरु झाली आहे. भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री हा अभिनेत्री निमरत कौरला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. ५६ वर्षांचा रवी शास्त्री ३६ वर्षांच्या निमरत कौरला डेट करत असल्याचं वृत्त आहे. निमरत कौर ही अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट या चित्रपटात होती. रवी शास्त्री यांनी २०१२ साली पत्नी रितू सिंग यांच्याशी घटस्फोट घेतला. रवी शास्त्री आणि रितू सिंग यांना एक मुलगीही आहे. याआधी रवी शास्त्रीचं नाव अभिनेत्री अमृता सिंगसोबतही जोडलं गेलं होतं. १९८० साली रवी शास्त्री आणि अमृता सिंगबद्दल बोललं गेलं होतं. मागच्या २ वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. २०१५ साली एका कार लॉन्चिंगच्या कार्यक्रमादरम्यान या दोघांची भेट झाली होती. रवी शास्त्री हे सध्या इंग्लंडमध्ये भारतीय ट
इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकचा निवृत्तीचा निर्णय

इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकचा निवृत्तीचा निर्णय

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि ३३ वर्षीय अनुभवी फलंदाज अॅलिस्टर कूक याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. भारताविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेनंतर तो निवृत्त होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो पूर्णपणे निवृत्त होणार असल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. ७ ते ११ सप्टेंबर दरम्यान तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. कुक हा इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज आहे. कुकने अद्याप १२ हजार २५४ धावा केल्या असून कसोटी फलंदाजांच्या सर्वाधिक धावांच्या यादीत तो ६व्या क्रमांकावर आहे. आपल्या ६० कसोटी सामन्यात त्याने ३२ शतके आणि ५६ अर्धशतके झळकावली आहेत. तसेच सलामीवीर म्हणून खेळताना त्याने सर्वाधिक ११ हजार ६२७ धावा केल्या आहेत. मात्र यंदाच्या वर्षी त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याने १६ डावांमध्ये १८.६२च्या सरासरीने धावा केल्या आहेत. सध्या सुरु असलेल्
Asia Cup 2018: भारतीय संघ जाहीर; विराट कोहलीऐवजी रोहित शर्मा नेतृत्त्व करणार

Asia Cup 2018: भारतीय संघ जाहीर; विराट कोहलीऐवजी रोहित शर्मा नेतृत्त्व करणार

मुंबई, आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या स्पर्धेतून कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित शर्माआशिया चषक स्पर्धेत संघाचं नेतृत्त्व करेल. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी शिखर धवनकडे असेल. वेगवान गोलंदाज खलील अहमद या संघातील नवा चेहरा आहे. 15 सप्टेंबरपासून यूएईमध्ये आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होईल. 18 सप्टेंबरला भारताचा स्पर्धेतील पहिला सामना होईल. विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यानं या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्त्व करेल. तर शिखर धवन उपकर्णधार असेल. भारतीय फलंदाजीची जबाबदारी या दोघांसह के. एल. राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, एम. एस. धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या यांच्यावर असेल. भारतीय गोलंदाजीची धुरा फिरकीपटू कुलदीप यादव, यजुर्वेंद्र चहल, अक्षर पटेल, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकू
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात मोईन अलीचा समावेश

चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात मोईन अलीचा समावेश

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड  : भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. इंग्लंडच्या संघात अष्टपैलू मोईन अलीला यावेळी स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आदिल रशिद आणि मोईन अली हे दोन फिरकीपटू इंग्लंडचा संघ या सामन्यात खेळवणार आहे.
शिल्पा शेट्टीचा पती बुकीच्या संपर्कात : तपास अधिकाऱ्याचा दावा

शिल्पा शेट्टीचा पती बुकीच्या संपर्कात : तपास अधिकाऱ्याचा दावा

मुंबई, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा हा बुकीच्या संपर्कात होता आणि त्याने बुकीकडून भेटवस्तूही स्वीकारली होती, असा खुलासा आयपीएल सट्टेबाजी प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी बी बी मिश्रा यांनी केला आहे. राज कुंद्राने सुरुवातीला बुकीच्या संपर्कात नाही, असे सांगितले. मात्र तपास अधिकाऱ्यांनी बुकींच्या फोन नंबरचा विषय काढताच राज कुंद्राने बुकींच्या संपर्कात असल्याचे कबुली दिली. आयपीएल सट्टेबाजी प्रकरणाचा तपास करणारे बी बी मिश्रा यांनी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी राज कुंद्रा आणि बुकींच्या संबंधांबाबत भाष्य केले. मिश्रा म्हणाले,चौकशीच्या सुरुवातीला कुंद्राने बुकीशी संपर्कात नसल्याचे सांगितले. मात्र, यानंतर आम्ही त्याला बुकीने दिलेला कबुलीजबाब सांगितला. शेवटी त्याने बुकीच्या संपर्कात असल्याचे सांगितले आणि बुकीकडून भेटवस्तू स्वीकारल्
शेवटच्या २ टेस्ट मॅचसाठी भारतीय टीममध्ये मोठे बदल

शेवटच्या २ टेस्ट मॅचसाठी भारतीय टीममध्ये मोठे बदल

नॉटिंगहम, इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या टेस्ट मॅचसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. या टीममध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबईचा युवा ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ आणि आंध्र प्रदेशचा मधल्या फळीतला बॅट्समन हनुमा विहारीची भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. ओपनर मुरली विजय आणि स्पिनर कुलदीप यादवला डच्चू देण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन्ही मॅचमध्ये मुरली विजयची कामगिरी खराब झाली. दुसऱ्या टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये विजय शून्यवर आऊट झाला. यानंतर तिसऱ्या टेस्ट मॅचमधून विजयला डच्चू देण्यात आला. आता विजयऐवजी पृथ्वी शॉचा टीममध्ये समावेश झाला आहे. तर इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या स्पिनरसाठी फारशा अनुकूल नसल्यामुळे कुलदीप यादवऐवजी निवड समितीनं हनुमा विहारीच्या रुपात जादा बॅट्समन टीममध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वात भारतानं अंडर १९ वर्ल्ड कप जिंकला होता
पी. व्ही. सिंधू श्रीमंत भारतीय महिला खेळाडू, फोर्ब्सच्या यादीत सर्वोत्तम १० खेळाडूंमध्ये समावेश

पी. व्ही. सिंधू श्रीमंत भारतीय महिला खेळाडू, फोर्ब्सच्या यादीत सर्वोत्तम १० खेळाडूंमध्ये समावेश

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. २०१८ सालात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्यायादीत सिंधूला पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान मिळालं आहे. या यादीमध्ये सिंधू सातव्या स्थानावर आहे. जाहीरातींच्या माध्यमातून सिंधूने यंदाच्या वर्षात अंदाजे ६० कोटी रुपये कमावले आहेत. महत्वाची गोष्ट मध्ये पहिल्या १० जणांमध्ये सिंधू ही एकमेव बॅडमिंटन खेळाडू आहे. अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने या यादीमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. सेरेनाने यंदाच्या वर्षात जाहीरातींच्या माध्यमातून १८.१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई केली आहे. काल फोर्ब्सने ही यादी जाहीर केली.
सानिया मिर्झा लग्नाच्या ८ वर्षांनंतर या महिन्यात देणार बाळाला जन्म

सानिया मिर्झा लग्नाच्या ८ वर्षांनंतर या महिन्यात देणार बाळाला जन्म

आधी गुडघ्यांची दुखापत त्यानंतर प्रेग्नेंट असल्याने टेनिस कोर्टपासून दूर राहिलेली दिग्गज भारतीय खेळाडू सानिया मिर्झा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गुडघे दुखापतीमुळे तिला बराच काळ बाहेर बसावे लागले. करिअरच्या महत्त्वाच्या स्थानी तिला हा मोठा धक्का होता. त्यातून ती बाहेर आली पण आता प्रेग्नेंसीसाठी तिला काही काळ विश्रांती घ्यावी लागतेय. यामुळे तिच्या चाहत्यांसाठी दु;ख, काळजी अशा भावना आहेत. मला २०२० टोक्यो ऑलोम्पिक खेळायचे असल्याचे तिने सांगितले आहे.  महिला जोडी गटात एक्स वर्ल्ड नंबर १ सानिया ऑक्टोबरमध्ये बाळाला जन्म देणार आहे. ऑलोम्पिक खेळाआधी टेनिस कोर्टवर परतण्याचं आश्वासन तिनं चाहत्यांना दिलंय. आपण आता २०१८ मध्ये आहोत आणि २०२० ऑलोम्पिक खेळात मला खेळायचं असल्याचे सानियाने सांगितले. हे एक यथार्थवादी लक्ष्य असून एका वर्षाच्या आत मी बाळाला जन्म देईन असेही तिने म्हटले. मी कधीच पारंपारिक महिलांप्
आयसीसीच्या जागतिक गुणांकनात विराट टॉपवर

आयसीसीच्या जागतिक गुणांकनात विराट टॉपवर

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीत आयसीसीच्या जागतिक गुणांकनात टॉपवर पोहचला आहे. असा पराक्रम करणारा कोहली सातवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एखाद्या हिंदुस्थानी फलंदाजाने जागतिक गुणांकनात नंबर वन स्थान पटकावले आहे. विराटने ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला मागे टाकत टॉप स्थानावर मजल मारली आहे. कोहली ९३४ गुणांसह पहिल्या तर स्मिथ ९२९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यात चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणामुळे स्टिव्ह स्मिथवर आयसीसीने एक वर्षाची बंदी लादली आहे. डिसेंबर २०१५पासून स्मिथ फलंदाजी गुणांकनात टॉपवर होता.यापूर्वी जानेवारी २०११ मध्ये मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आयसीसी फलंदाजी गुणांकनात टॉपच्या स्थानावर होता. आतापर्यंत असा पराक्रम हिंदुस्थानच्या सात फलंदाजांनी केला आहे. त्यात विराट आणि सचिनव्यतिरिक्त वीरेंद्र सेहवाग,गौतम गं
भारताची झुंज अपयशी; इंग्लंडकडून 31 धावांनी पराभव

भारताची झुंज अपयशी; इंग्लंडकडून 31 धावांनी पराभव

एजबस्टन : विजयाकरीता 194 धावांचा पाठलाग करणे इंग्लंडमधे किती कठीण असते हे एजबस्टन कसोटी सामन्यात दिसून आले. बेन स्टोक्सने चौथ्या दिवशी गोलंदाजीला आल्यावर विराट कोहलीला पायचित केले, तोच क्षण निर्णायक ठरला. कोहलीचा अडसर दूर झाल्यावर इंग्लंडने विजयाकडे दमदार वाटचाल केली. स्टोक्सने हार्दिक पंड्याला बाद करून इंग्लंडचा 31 धावांचा विजय नक्की केला. दोन्ही डावांत गरजेच्या वेळी फलंदाजी आणि उत्तम स्वींग गोलंदाजी करणार्‍या सॅम करनला सामन्याचा मानकरी ठरवले गेले. चौथ्या दिवशीचा खेळ चालू होत असताना इंग्लंडला विजय मिळवायला चार फलंदाजांना बाद करायचे होते. जिमी अँडरसनने दिनेश कार्तिकला लगेच बाद केल्याने गोलंदाजांना हुरूप आला. त्यानंतर  विराट कोहलीने हार्दिक पंड्यासह डगमगणारी नौका स्थिर केली. विराट कोहली आत्मविश्वासाने प्रत्येक चेंडू खेळत होता आणि त्याचाच कित्ता गिरवत हार्दिक पंड्याने चांगली फलंदाजी चालू के