Wednesday, September 26

खेल

भारताची फुलराणी सायना लवकरच अडकतेय विवाहबंधनात

भारताची फुलराणी सायना लवकरच अडकतेय विवाहबंधनात

नवी दिल्ली, भारताची बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालनं विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतलाय. सायना नेहवाल आणि बॅडमिंटन खेळाडू पी. कश्यप यांचा विवाह या वर्षाच्या अखेरीस होणार आहे. १६ डिसेंबर रोजी सायना आणि कश्यप विवाहबंधनात अडकतील. अतिशय खासगी पद्धतीनं विवाह करण्याचा निर्णय या दोन बॅडमिंटन खेळाडूंनी घेतलाय. केवळ शंभर जणांनाच विवाहाला आमंत्रित करण्यात येणार आहे. दरम्यान २१ डिसेंबर रोजी भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात येणार आहे. सायना आणि कश्यप दोघेही हैदराबादमधले असून ते जवळपास दहा वर्षांपासून डेट करत असल्याचा खुलासा झालाय. सायना २८ वर्षांची असून तिनं ऑलिम्पिक आणि राष्टकुल स्पर्धेत भारताला पदकांची कमाई करुन दिलीय. तर पी. कश्यम ३२ वर्षांचा असून त्यानं राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पदक पटकावून दिलय. सानिया-शोएब, दिपिका पल्लिकल-दिनेश कार्तिक, इशांत शर्मा-प्रतिमा सिंग, गीता फोगट-पवन कुमार, साक्षी मलिक-
विजय हजारे चषकासाठी अजिंक्य रहाणे मुंबईचा कर्णधार

विजय हजारे चषकासाठी अजिंक्य रहाणे मुंबईचा कर्णधार

मुंबई, इंग्लंड दौऱ्यात आपल्या फलंदाजीने फारशी चांगली कामगिरी न करु शकलेल्या अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर आता आणखी एक जबाबदारी असणार आहे. आगामी विजय हजारे चषकासाठी मुंबईच्या संघाचं कर्णधारपद अजिंक्यकडे सोपवण्यात आलेलं आहे. १९ सप्टेंबरपासून बंगळुरुत या स्पर्धेला सुरुवात होणार असून, मुंबईचा समावेश अ गटात करण्यात आलेला आहे. श्रेयस अय्यरकडे संघाच्या उप-कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. अ गटात मुंबईला बडोदा, कर्नाटक, रेल्वे, विदर्भ, पंजाब, हिमाचल प्रदेश, गोवा आणि महाराष्ट्र या संघांशी सामना करायचा आहे. असा असेल मुंबईचा संघ :- अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), पृथ्वी शॉ, जय बिस्ता, सुर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, आदित्य तरे (यष्टीरक्षक), एकनाथ केरकर, शिवम दुबे, आकाश पारकर, धवल कुलकर्णी, शम्स मुलानी, विजय गोहील, तुषार देशपांडे, रोस्टन डायस
इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने रोहित शर्माची निवड न करून चूक केली : दिलीप वेंगसरकर

इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने रोहित शर्माची निवड न करून चूक केली : दिलीप वेंगसरकर

मुंबई, भारत आणि इंग्लंड कसोटीः इंग्लंड दौऱ्यात भारताचे सलामीचे फलंदाज आपली छाप पाडण्यात अपयशी ठरले. चौथ्या कसोटीतही सलामीच्या फलंदाजांनी पत्करलेली शरणागती भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरली. त्यामुळे पुन्हा एकदा लोकेश राहुल आणि शिखर धवन यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यात अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी मुंबईकर रोहित शर्माला संघात संधी मिळायला हवी होती, असे परखड मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.  रोहितची निवड न करण्याची मोठी चूक निवड समितीने केल्याचे मत वेंगसरकर यांनी व्यक्त केले. तिसऱ्या कसोटीनंतर सलामीवीर मुरली विजयला डच्चू दिल्यानंतर रोहितची निवड निश्चित मानली जात होती, परंतु निवड समितीने मुंबईचाच युवा फलंदाज पृथ्वी शॉ याची निवड केली. मात्र त्याला चौथ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही. कर्णधार कोहलीने चौथ्या कसोटीत पुन्हा एकादा राहुल व धवन
पंड्या आणि अश्विन हे ऑलराऊंडर नाहीत : सुनील गावस्कर

पंड्या आणि अश्विन हे ऑलराऊंडर नाहीत : सुनील गावस्कर

नवी दिल्ली, भारत विरुद्ध इंग्लंड  : इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने कसोटी मालिका गमावली. त्यानंतर भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी संघाच्या कामगिरीवर तोफ डागली आहे. हार्दिक पंड्या आणि आर. अश्विन हे दोघेही अष्टपैलू खेळाडू नाहीत, असा स्ट्रेट ड्राइव्ह लगावला आहे. गावस्कर यांनी अश्विन आणि पंड्या यांच्यावर टीका करताना सांगितले की, " अश्विन आणि पंड्या या दोघांना लोकं ऑलराऊंडर म्हणतात, पण मी त्यांना तसे मानत नाही. कारण या दोघांकडेही संघाला सामना जिंकवून देण्याची सुवर्णसंधी होती. पण या दोघांनीही ही संधी लाथाडली. या दोघांकडे चांगली गुणवत्ता आहे, पण त्यांना एक ऑलराऊंडर म्हणून सिद्ध करता आलेले नाही. " इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत कसोटी मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले होते. भारताने चौ
गॅरी कर्स्टन आयपीएलच्या बंगळुरू टीमचा नवा प्रशिक्षक

गॅरी कर्स्टन आयपीएलच्या बंगळुरू टीमचा नवा प्रशिक्षक

बंगळुरू, आयपीएलमध्ये बंगळुरूच्या टीमनं गॅरी कर्स्टन यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. याआधी न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू डॅनियल व्हिटोरीकडे ही जबाबदारी होती. मागच्या ८ वर्षांपासून व्हिटोरी बंगळुरूच्या टीमचा आधी खेळाडू आणि मग प्रशिक्षक होता. भारतानं २०११ साली वर्ल्ड कप जिंकला तेव्हा गॅरी कर्स्टनच भारतीय टीमचा प्रशिक्षक होता. कर्स्टन मागच्या मोसमात बंगळुरूचा बॅटिंग प्रशिक्षकही होता. मागच्या मोसमात व्हिटोरीसोबत बंगळुरूच्या टीमचं प्रशिक्षण करताना मजा आली होती. बंगळुरुच्या टीमसोबत नवीन प्रवासासाठी मी तयार आहे. या कामासाठी मला लायक समजल्यामुळे मी टीमचे आभार मानतो, असं कर्स्टन म्हणाला. आठ वर्ष बंगळुरूसोबत घालवल्यानंतर मी टीमचा आभारी आहे. पहिले खेळाडू आणि मग प्रशिक्षक म्हणून मी टीमसोबत होतो. मी फ्रॅन्चायजीला शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया व्हिटोरीनं दिली आहे. बंगळुरूची फ्रॅन्चायजीनं कर
रवी शास्त्री करतोय या बॉलीवूड अभिनेत्रीला डेट?

रवी शास्त्री करतोय या बॉलीवूड अभिनेत्रीला डेट?

क्रिकेट आणि बॉलीवूडचं नातं काही रसिकांना नवीन नाही. विराट कोहली आणि अनुष्का शर्मानं लग्न केल्यानंतर आता नव्या जोडप्याची चर्चा सुरु झाली आहे. भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री हा अभिनेत्री निमरत कौरला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. ५६ वर्षांचा रवी शास्त्री ३६ वर्षांच्या निमरत कौरला डेट करत असल्याचं वृत्त आहे. निमरत कौर ही अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट या चित्रपटात होती. रवी शास्त्री यांनी २०१२ साली पत्नी रितू सिंग यांच्याशी घटस्फोट घेतला. रवी शास्त्री आणि रितू सिंग यांना एक मुलगीही आहे. याआधी रवी शास्त्रीचं नाव अभिनेत्री अमृता सिंगसोबतही जोडलं गेलं होतं. १९८० साली रवी शास्त्री आणि अमृता सिंगबद्दल बोललं गेलं होतं. मागच्या २ वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. २०१५ साली एका कार लॉन्चिंगच्या कार्यक्रमादरम्यान या दोघांची भेट झाली होती. रवी शास्त्री हे सध्या इंग्लंडमध्ये भारतीय ट
इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकचा निवृत्तीचा निर्णय

इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकचा निवृत्तीचा निर्णय

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि ३३ वर्षीय अनुभवी फलंदाज अॅलिस्टर कूक याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. भारताविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेनंतर तो निवृत्त होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो पूर्णपणे निवृत्त होणार असल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. ७ ते ११ सप्टेंबर दरम्यान तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. कुक हा इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज आहे. कुकने अद्याप १२ हजार २५४ धावा केल्या असून कसोटी फलंदाजांच्या सर्वाधिक धावांच्या यादीत तो ६व्या क्रमांकावर आहे. आपल्या ६० कसोटी सामन्यात त्याने ३२ शतके आणि ५६ अर्धशतके झळकावली आहेत. तसेच सलामीवीर म्हणून खेळताना त्याने सर्वाधिक ११ हजार ६२७ धावा केल्या आहेत. मात्र यंदाच्या वर्षी त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याने १६ डावांमध्ये १८.६२च्या सरासरीने धावा केल्या आहेत. सध्या सुरु असलेल्
Asia Cup 2018: भारतीय संघ जाहीर; विराट कोहलीऐवजी रोहित शर्मा नेतृत्त्व करणार

Asia Cup 2018: भारतीय संघ जाहीर; विराट कोहलीऐवजी रोहित शर्मा नेतृत्त्व करणार

मुंबई, आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या स्पर्धेतून कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित शर्माआशिया चषक स्पर्धेत संघाचं नेतृत्त्व करेल. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी शिखर धवनकडे असेल. वेगवान गोलंदाज खलील अहमद या संघातील नवा चेहरा आहे. 15 सप्टेंबरपासून यूएईमध्ये आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होईल. 18 सप्टेंबरला भारताचा स्पर्धेतील पहिला सामना होईल. विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यानं या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्त्व करेल. तर शिखर धवन उपकर्णधार असेल. भारतीय फलंदाजीची जबाबदारी या दोघांसह के. एल. राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, एम. एस. धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या यांच्यावर असेल. भारतीय गोलंदाजीची धुरा फिरकीपटू कुलदीप यादव, यजुर्वेंद्र चहल, अक्षर पटेल, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकू
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात मोईन अलीचा समावेश

चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात मोईन अलीचा समावेश

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड  : भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. इंग्लंडच्या संघात अष्टपैलू मोईन अलीला यावेळी स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आदिल रशिद आणि मोईन अली हे दोन फिरकीपटू इंग्लंडचा संघ या सामन्यात खेळवणार आहे.
शिल्पा शेट्टीचा पती बुकीच्या संपर्कात : तपास अधिकाऱ्याचा दावा

शिल्पा शेट्टीचा पती बुकीच्या संपर्कात : तपास अधिकाऱ्याचा दावा

मुंबई, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा हा बुकीच्या संपर्कात होता आणि त्याने बुकीकडून भेटवस्तूही स्वीकारली होती, असा खुलासा आयपीएल सट्टेबाजी प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी बी बी मिश्रा यांनी केला आहे. राज कुंद्राने सुरुवातीला बुकीच्या संपर्कात नाही, असे सांगितले. मात्र तपास अधिकाऱ्यांनी बुकींच्या फोन नंबरचा विषय काढताच राज कुंद्राने बुकींच्या संपर्कात असल्याचे कबुली दिली. आयपीएल सट्टेबाजी प्रकरणाचा तपास करणारे बी बी मिश्रा यांनी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी राज कुंद्रा आणि बुकींच्या संबंधांबाबत भाष्य केले. मिश्रा म्हणाले,चौकशीच्या सुरुवातीला कुंद्राने बुकीशी संपर्कात नसल्याचे सांगितले. मात्र, यानंतर आम्ही त्याला बुकीने दिलेला कबुलीजबाब सांगितला. शेवटी त्याने बुकीच्या संपर्कात असल्याचे सांगितले आणि बुकीकडून भेटवस्तू स्वीकारल्