Saturday, August 18

Author: admin

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात

लोणावळा, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर भरधाव कंटेनरची तीन वाहनांना धडक बसून विचित्र अपघातझाला आहे. या अपघातात एक चालक जखमी झाला असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास किमी 45/700 जवळ हा अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेल्या एका कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कंटेनरने समोर जाणार्‍या इनोव्हा गाडीला धडक दिली. त्यामुळे इनोव्हा गाडी समोर जाणार्‍या बीएमडब्लू कारला धडकली तर सदरचा कंटेनरअजून एका कंटेनरला धडकला. यामध्ये कंटेनरचा चालक काही वेळ गाडीत अडकला होता. अपघाताची माहिती समजताच खंडाळा महामार्गचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, आयआरबी व देवदूत पथक यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला गाडीतून बाहेर काढले. अपघातग्रस्त वाहने बाजुला करत वाहतूक सुरु केली आहे. मात्र अपघातामुळे काही काळ मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली ह

13 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू

पुणे, महापालिकेच्या पथदिव्याच्या विजेच्या खांबाला धक्का लागून वारजे परिसरातील तेरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पृथ्वीराज विशाल चव्हाण (वय 13, रा. वारजे माळवाडी शनि मंदिराजवळ) याचा बळी गेला. पृथ्वीराज हा सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान महामार्गाजवळील सेवा रस्त्यावर जॉगिंग करण्यासाठी गेला असता त्याने आपली सायकल महापालिकेच्या पथदिव्याच्या खांबाला लावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळेस त्याला खांबातून शॉक लागून त्याच खांबाला तो चिकटून बसला. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पृथ्वीराजला काठीच्या साह्याने बाजूला करून जवळच असलेल्या माई मंगेशकर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुढील तपास वारजे पोलिस स्टेशनचे पुणे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर करत आहेत.
पंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर

पंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर

तिरुअनंतपुरम, केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधानांनी हवाई पाहणी केली असून, त्यांनी केरळसाठी 500 कोटींची तत्काळ मदत जाहीर केली. केरळमधील पुरात आत्तापर्यंत 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर कोट्यवधींचे नुकसान झाले. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमधील कोचीमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हवाई पाहणी करत पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी यांच्यासह केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, राज्यपाल पी. सथासिवम आणि केंद्रीय पर्यटनमंत्री के. जे. अल्फोन्सो यांनी हवाई पाहणी केली. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी दोन लाख तर यातील गंभीर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली. यापूर्वी 100 कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता 500 क
अटल बिहारी वाजपेयी पंचतत्वात विलीन

अटल बिहारी वाजपेयी पंचतत्वात विलीन

नवी दिल्ली, भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रीय स्मृती स्थळावर हे अंत्यसंस्कार पार पडले. मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी अटलींना मुखाग्नी दिला. त्यापूर्वी अटलजींना लष्कराच्या ३०० जवानांनी मानवंदना दिली. तीनही सेनादलांकडून पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. अटलींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांना अश्रू अनावर झाले होते. अटलींच्या अंत्ययात्रेला दिल्लीत लाखो लोकांनी गर्दी केली होती. एका फुलाने सजवलेला ट्रकवर अटलजींचं पार्थिव होतं, यामागे हजारो नागरिक, कार्यकर्ते धावत होते. अटलबिहारी वाजपेयी यांना निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. अटल बिहारी वाजपेयी यांना निरोप देण्यासाठी भाजपाचे देशभरातील नेते आणि पदाधिकारी कालच दिल्लीत दाखल झाले होते. अटलजींच्या अंतयात्रेत ट्रक मागे चालत होते, भारताचे पंतप
भारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान खान

भारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान खान

इस्लामाबाद, पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करणे हाच वाजपेयींचा खरा सन्मान ठरेल, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी दिल्लीतील ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’च्या (एम्स) रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी यांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये थेट लाहोरची बस यात्रा केली होती. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली. अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोक व्यक्त करत इम्रान खान पुढे म्हणाले, भारत- पाकिस्तानमध्ये राजकीय मतभेद आहे. पण दोन्ही देशा
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन

नवी दिल्ली, भारताचे माजी पंतप्रधान, कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख अनेकांगी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाजपेयी प्रकृती खालावल्यामुळे गेले नऊ आठवडे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होते. गुरुवारी संध्याकाळी ५.५ मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे. जनता पक्षाच्या प्रयोगानंतर फाटाफूट झालेल्या जनसंघापासून ते केंद्रात भाजपाच्या पहिल्या सरकारचे पंतप्रधान असा वाजपेयींचा राजकीय प्रवास झाला. त्यांनी तीनवेळा पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडली. संघपरिवारातील भारतीय जनता पक्षाच्या उभारणीतील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. कृष्णबिहारी वाजपेयी व
निवडणुका आल्या की काँग्रेसला दलितांची आठवण : नरेंद्र मोदी

निवडणुका आल्या की काँग्रेसला दलितांची आठवण : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, मोदी सरकार दलित आणि मागासवर्गीयांविरोधात असल्याचा आरोप केला जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुका आल्या की काँग्रेसला दलित आणि मागासवर्गीयांची आठवण येते. समाजात गैरसमज पसरवले जातात, अशी टीका त्यांनी केली. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी भाजपा सरकार जनहितासाठीच काम करत असल्याचे जनतेला माहित आहे, असा दावाही मोदींनी केला. विरोधकांनी दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या मुद्द्यांवरुन भाजपाची कोंडी करण्याची रणनिती आखली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी म्हणाले, आरक्षण कधीही बंद होणार नाही. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आरक्षण गरजेचे आहे. आरक्षणाद्वारे दलित समाजाला सक्षम करण्याची प्रक्रिया सुरु राहील, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस हा पक्ष आधीपासून दलित आणि मागासवर्गीय समाजाविरोधात आहे. राजीव गांधी यांनी संसदेत मंडल आयोगाविरोधात
कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर आजपर्यंतचा मोठा सायबर हल्ला; ९४ कोटींची लूट

कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर आजपर्यंतचा मोठा सायबर हल्ला; ९४ कोटींची लूट

पुणे, गणेशखिंड रोडवरील कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्विच (सर्व्हर) वर सायबर हल्ला झाला असून हॅकरने जवळपास १५ हजाराहून अधिक व्यवहार करुन व्हिसा आणि रुपे कार्डद्वारे तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये हाँगकाँगला वळते केले आहेत. या सर्व प्रकारामुळे बँक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार ११ ऑगस्टला दुपारी ३ ते रात्री १० आणि १३ ऑगस्टला सकाळी साडेअकरापर्यंत घडला. ११ ऑगस्टला झालेल्या हल्ल्यात कॅनडा सह २४ देशातून केवळ २ तासात ८० कोटी रुपये काढले गेले. तर १३ ऑगस्टला दुपारी १३ कोटी ९२ लाख रुपये काही मिनिटांत हाँगकाँगमधील एका खात्यात वळविण्यात आले व तातडीने ते काढून घेतले गेले. याबाबत बँकेच्या एका वरिष्ठांनी सांगितले की, शनिवारी जेव्हा हा सायबर हल्ला झाला त्यात एकाचवेळी इतके इंटरनॅशनल व्यवहार होत असल्याचे पाहून व्हिसा कार्ड देणाऱ्या कंपनीने ही बाब रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आणून दिली. त्यांनी तातडीने कॉसमॉस ब
देशात लॉन्च झाली सर्वात महागडी बाईक

देशात लॉन्च झाली सर्वात महागडी बाईक

मुंबई, इंडियन मोटरसायकलने भारतात टॉप-ऑफ-द-लाइन मॉडल लॉन्च केली आहे. कंपनीने याची किंमत 38 लाख रुपये ठेवली आहे. नवी इंडियन चीफटेन एलीटमध्ये फीचर्सला स्टँडर्ड व्हर्जनमध्ये स्पेशल अपग्रेड केलं गेलं आहे. या बाईकमध्ये बीस्पोक पेंट जॉब, अतिरिक्त इक्विपमेंट, कस्टम लेदर सीट्स सारखे फीचर्स दिले आहेत. इंडियन चीफटेन एलीटची मागच्य़ा वर्षी घोषणा झाली होती. जगभरात फक्त 350 बाईक बनणार आहेत. इंडियनची ही दुसरी लिमिटेड एडिशन बाईक आहे. याआधी कंपनीने रोडमास्टर एलीटने यावर्षीच्या सुरुवातील लॉन्च केली होती. 2018 इंडियन चीफटेन एलीटमध्ये नवी पेंट स्कीम देण्यात आली आहे. कंपनीच्या मते संपूर्ण बाईकला पेंट करण्यासाठी 25 तास लागले आहेत. क्रूजरमध्ये इंडियन राइड कमांड इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आला आहे. जो ब्लूटूथ कनेक्टिविटी, नेविगेशन आणि 200-वॅट प्रीमियम ऑडियो सिस्टम देखील देण्यात आलं आहे. याशिवाय बाईकमध्ये कस्टम ले
राजकरणापासून लांब राहणार : अामिर खान

राजकरणापासून लांब राहणार : अामिर खान

पुणे, मागील तीस वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करीत असल्याने राजकीय मंडळाशी चांगले संबंध आहे. मात्र कधी राजकारणात जाणार नसून त्यापासून लांब राहणार असल्याची भूमिका पानी फाऊंडेशनचे संयोजक आणि सिनेअभिनेता आमिर खान यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. राजकारणात असल्यावरच सामाजिक क्षेत्रात काम करता येते असे नसून त्याच्या बाहेर राहून देखील चांगले काम करता येते. असे त्यांनी सांगितले. तुम्हाला चांगल्या कामाच्या जोरावर राज्यसभेवर जाणार का या प्रश्नावर अमीर खान यांनी भूमिका मांडली.यावेळी अमीर खान म्हणाले की,महाराष्ट्रामध्ये पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून काम शेवटच्या घटकापर्यँत पोहचवणार आहे.त्यासाठी प्रत्येक घटकाला सामावून घेणार आहे.हे सर्व घटक एकत्र आल्यास लवकरच महाराष्ट्र पाणीदार होईल.त्याचबरोबर पानी फाऊंडेशन पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीमुळे टीम एक वर्षांसाठी ब्रेक होण्याच्या तयारीत होती.म