Saturday, February 23

19 वर्षीय तरुणीने सेक्स टॉय वापरून केला महिलेवर बलात्कार, 2 तरुणांनीही दिली साथ

नवी दिल्ली, दिल्लीच्या सीमापुरी परिसरात बिझनेसमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 2 जणांनी एका 25 वर्षीय महिलेवर रेप केला. महिलेचा आरोप आहे की, या दोन मुलांशिवाय एका 19 वर्षीय तरुणीनेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, सीमापुरी पोलिस ठाण्यात रेपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर जबाब नोंदवताना सांगितले की, ती गुरुग्राममध्ये एका खासगी कंपनीत काम करत होती, परंतु काही महिन्यांपूर्वी तिने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी नोकरी सोडली.
एका दिवशी तिची भेट आरोपींपैकी एकाशी झाली. त्याने स्वत:ला एका आयटी फर्मचा सीनियर असोसिएट असल्याचे सांगितले. त्याच व्यक्तीने इतर दोन्ही आरोपींसोबत तिची भेट घडवली आणि सर्वजण एकत्र ऑनलाइन कपड्यांची विक्री करण्याचा बिझनेस सुरू करण्यासाठी तयार झाले.
यानंतर तरुणीने पंजाबहून बिझनेसशी संबंधित कोर्स केला. एका दिवशी आरोपींनी बिझनेससाठी तिला 1.5 लाख रुपये अरेंज करण्यासाठी सांगितले. तरुणीन आपल्या वडिलांचे पैसे घेऊन गुरुग्रामला पोहोचली.
यानंतर त्या आरोपीने पीडितेला पैसे देऊन दिल्लीच्या दिलशाद कॉलनीमध्ये आपल्या फ्लॅटवर बोलावले, जेथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपींनी तिचा व्हिडिओही बनवला.
पीडितेने सांगितले की, तरुणीने तिचे सेक्स टॉयच्या माध्यमातून लैंगिक शोषण केले. तिला अनेक दिवस फ्लॅटमध्ये बंद ठेवण्यात आले. काही दिवसांनी तिला फ्लॅटमधून पळून जाण्यात यश मिळाले. तेथून बाहेर येताच तिने थेट पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
डीसीपी (शाहदरा) मेघना यादव म्हणाल्या की, पीडितेच्या जबाबाच्या आधारे एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.