Saturday, February 23

९०% भारतीय तिशी गाठण्यापूर्वीच करतात सेक्स

भारतातील ९० टक्के लोक तिशीच्या आतच पहिल्यांदा सेक्स करतात, असे निरीक्षण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनं २०१५-१६मध्ये केलेल्या अभ्यासातून नोंदवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पंधरा वर्षांपेक्षा कमी वय असतानाच सेक्स केल्याचे या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या २५ ते ४९ वयोगटातील १० टक्के महिलांनी सांगितले.
भारतात खूपच कमी वयात मुलींची लग्नं लावून दिली जातात. त्यामुळेच पुरुषांच्या तुलनेत येथील मुली कमी वयातच सेक्स करतात, असं भीषण वास्तव या अहवालातून मांडण्यात आलं आहे. ३८ टक्के महिलांनी १८ वर्षांहून कमी वय असताना सेक्स केल्याचे सांगितले. सर्व्हेनुसार, २५ ते ४९ वयोगटातील ५८ टक्के महिलांनी विसाव्या वर्षात पर्दापण करताना पहिल्यांदा सेक्स केले होते, अशी माहिती दिली.
हा सर्व्हे करताना देशभरातील लोकसंख्या, आरोग्य, आहार याबाबत माहिती घेण्यात आली. वास्तव समोर आणणं हा या सर्व्हेमागचा हेतू होता. मात्र, देशात अजूनही सेक्ससंबंधी मोकळेपणाने बोलण्यास कचरतात. त्यामुळे काहींनी त्याबाबत चुकीची माहिती दिल्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही या अहवालात म्हटलं आहे.