Sunday, January 20

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू रामपालला जन्मठेप

नवी दिल्ली, स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू व सतलोक आश्रमाचे प्रमुख रामपाल यांना चार महिला व एका लहान मुलाच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच एक लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. हिसार न्यायालयाने रामपालसह इतर 13 जणांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
हत्या व देशद्रोहाचा आरोप रामपालवर होता. 11 ऑक्टोबरला या दोन्ही गुन्ह्यांमध्ये त्यांना दोषी ठरवले होते. शिक्षा सुनावल्यानंतर हिसार येथील सतलोक आश्रम व आजूबाजूच्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये 1500 जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. तसेच जमावबंदी लागू करण्यात आला आहे.
1999 मध्ये रामपाल याने आपला पहिला आश्रम काढला होता. नंतर आपण संत कबीरांचा अवतार आहोत, असे त्याने सांगितले व हरयाणात अनेक भागात आश्रम काढले. 2006 मध्ये त्याच्यावर देशद्रोह आणि हत्येचा खटला सुरु झाला. हत्येप्रकरणी 2014 मध्ये रामपालला पोलिसांनी अटक केली होती.