Sunday, January 20

सीबीएसई टॉपर तरुणीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार

चंदिगड, हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी सीबीएसई टॉपर असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी (13 सप्टेंबर) ही घटना घडली आहे. संतापजनक बाब म्हणजे याप्रकरणी अद्याप एकाही आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या नाहीत.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी शिकवणीसाठी जात असताना आरोपींनी बुधवारी (12 सप्टेंबर) तिचे अपहरण केले. कारनं आलेल्या आरोपींनी तरुणीला लिफ्ट देण्याबाबत विचारणा केली. दरम्यान, हे सर्वजण तरुणीच्या गावातीलच रहिवासी असल्यानं ती त्यांना ओळख  होती. लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं आरोपींना तरुणीला निर्जन स्थळी नेऊन, गुंगी मिसळलेले पेय पाजले आणि तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर तिला कनिनामध्ये एक बस स्टॉपवर बेवारस अवस्थेत सोडून आरोपी फरार झाले. पीडितेच्या तक्रारीनंतर रेवाडीतील पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महेंद्रगड पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत.