Saturday, February 23

श्रद्धा कपूरला डेंग्यू, थांबवले सायना नेहवालच्या बायोपिकचे शूटींग

श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकची घोषणा झाली; अगदी तेव्हापासून या चित्रपटाच्या मार्गात अनेक अडचणी येत आहेत. आधी अनेक कारणांनी हा चित्रपट पुढे ढकलण्यात आल. यानंतर श्रद्धा कपूरला या चित्रपटातून काढल्याची बातमी आली. अर्थात ही बातमी खोटी ठरली आणि अगदी काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे शूटींग सुरू झाले. पण शूटींग सुरू होऊन काही दिवस होत नाहीत, तोच पुन्हा एकदा हा चित्रपट रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. होय, याचे कारण म्हणजे, श्रद्धा कपूरला डेंग्यूने ग्रासले आहे. यामुळे श्रद्धाने चित्रपटाचे शूटींग थांबवले आले. गेल्या अनेक दिवसांपासून श्रद्धाची प्रकृती चांगली नव्हती. २७ तारखेला तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाले आणि चित्रपटाचे शूटींग थांबवण्याचा निर्णय तिने घेतला. तथापि येत्या दोनेक दिवसांत ती पुन्हा सेटवर परतण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच या बायोपिकचा फर्स्ट लूक जारी झाला होता.  या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करणार आहेत व निर्मिती भूषण कुमार यांची आहे. सायना नेहवाल बायोपिकसाठी श्रद्धा कपूरने महिनाभर खूप मेहनत केली आहे. सकाळी सहा वाजता ती बॅडमिंटनचे ट्रेनिंग घेत होती.