Sunday, January 20

विराट कोहली ठरला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू

नवी दिल्ली, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अनेकांच्या गळ्यातील ताईत असलेला विराट कोहली सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू ठरला आहे. फोर्ब्स या मॅगझिनने सर्वाधिक श्रीमंक खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आणि भारतीय खेळाडू ठरला आहे.
विराटने 161 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये सर्वात जास्त हिस्सा हा जाहीरातींमधून येणाऱ्या मिळकतीचा आहे. कारण बीसीसीआय आणि सामना जिंकल्यानंतर मिळणाऱ्या राशीमधून कोहलीने 27 कोटी रुपये कमावले आहेत, तर जाहीरातींमधून कोहलीने 134 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कोहलीच्या कमाईबाबत फोर्ब्सने म्हटले आहे की, ” खेळामधून मिळणाऱ्या मानधनापेक्षा कोहलीने जाहीरातींमधून जास्त राशी कमावली आहे. कोहलीकडे सध्याच्या घडीला प्युमा, पेप्सी, ऑडी या नामांकित कंपन्यांच्या जाहिराती आहेत. ”
फोर्ब्सने जाहिर केलेल्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत कोहली 83व्या स्थानावर आहे. या यादीत पहिल्या स्थानावर अमेरिकेचा बॉक्सर फ्लॉयड मेवेदर आहे, त्याने 1913.3 कोटी रुपये कमावले आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी दुसऱ्या स्थानावर आहे, तर पोर्तुगालचा अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो तिसऱ्या स्थानावर आहे.