Sunday, January 20

विजय हजारे चषकासाठी अजिंक्य रहाणे मुंबईचा कर्णधार

मुंबई, इंग्लंड दौऱ्यात आपल्या फलंदाजीने फारशी चांगली कामगिरी न करु शकलेल्या अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर आता आणखी एक जबाबदारी असणार आहे. आगामी विजय हजारे चषकासाठी मुंबईच्या संघाचं कर्णधारपद अजिंक्यकडे सोपवण्यात आलेलं आहे. १९ सप्टेंबरपासून बंगळुरुत या स्पर्धेला सुरुवात होणार असून, मुंबईचा समावेश अ गटात करण्यात आलेला आहे. श्रेयस अय्यरकडे संघाच्या उप-कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. अ गटात मुंबईला बडोदा, कर्नाटक, रेल्वे, विदर्भ, पंजाब, हिमाचल प्रदेश, गोवा आणि महाराष्ट्र या संघांशी सामना करायचा आहे.

असा असेल मुंबईचा संघ :- अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), पृथ्वी शॉ, जय बिस्ता, सुर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, आदित्य तरे (यष्टीरक्षक), एकनाथ केरकर, शिवम दुबे, आकाश पारकर, धवल कुलकर्णी, शम्स मुलानी, विजय गोहील, तुषार देशपांडे, रोस्टन डायस