Wednesday, September 26

वसईत गर्भवती महिलेचे बोटीने स्थलांतर

वसई, वसईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे एका गर्भवती महिलेला आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्थलातरीत केलं आहे. आशा डिसुजा असं या महिलेच नाव आहे. वसईच्या १०० फूट रोड वरच्या मथूरा इमारतीत ही महिला राहत होती. वसईत वाढता पाऊस आणि साचलेलं पाणी यामुळे तिला काहीं वेळापूर्वी घरातून हलवण्यात आलं. वसई अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या साह्याने महिलेला बाहेर काढलं. महिलेला अॅम्ब्युलन्सच्या मदतीनं नातेवाईकांच्या घरी हलवण्यात आलं आहे. कुठल्याही वेळी तीची प्रसुती होवू शकते त्यामुळं खबरदारी म्हणून तिला हलवण्यात आले. सध्या तिची प्रकृती ठीक आहें.