Sunday, January 20

रामदेवबाबांची आता दूध क्षेत्रातही ‘एँट्री’

नवी दिल्ली, योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजलीने यापूर्वी कापड उद्योगात पदार्पण केले होते. त्यानंतर आता त्यांनी दूध क्षेत्रातही ‘एंट्री’ केली आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांनी आज (गुरुवार) ही एंट्री केली आहे. पतंजलीचे दुग्धजन्य उत्पादन दिल्ली-एनसीआर, राजस्थान, पुणे आणि इतर काही ठिकाणी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती रामदेवबाबांकडून देण्यात आली.
रामदेवबाबांनी पतंजली दुग्ध व्यवसायात उतरत आहे. ”पतंजलीच्या उत्पादनामध्ये गायीचे दूध, पनीर, बटरमिल्क, दही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या दुग्धजन्य पदार्थांसह पालेभाज्या मिळणार आहेत. पतंजलीचे दूध शंभर टक्के शुद्ध असेल. हे दूध विक्रीपूर्वी याची चाचणी करण्यात येणार आहे. या दुधाच्या चाचणीनंतरच हे दूध विक्रीसाठी जाणार आहे. गायीच्या दुधाची निर्मिती अधिक व्हावी आणि पुढील वर्षापर्यंत 10 लाख लिटर दुधाची निर्मिती व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे”, असे रामदेवबाबांनी सांगितले.
रामदेवबाबा पुढे म्हणाले, ”सुमारे 40 लाख लिटर गायीच्या दुधाची विक्री उद्यापासून बाजारात केली जाणार आहे. कंपनीकडून 2 हजार गावातून एक लाख शेतकऱ्यांकडून दूध उपलब्ध केले जाणार आहे”.