Tuesday, December 18

राजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला, आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय

मुंबई, दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर गौतम गंभीरने आयपीएलमधील खराब कामगिरीची जबाबदारी घेऊन स्वतःचं २ कोटी ८० लाख रुपयांचं वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या कर्णधाराने खराब कामगिरी केल्यामुळे पगार न घेण्याचा निर्णय घेण्याची ही कदाचीत आयपीएलमधील पहिलीच घटना असू शकते.
”या सत्रात संघमालकांकडून वेतन न घेण्याचा निर्णय गंभीरने घेतला आहे. तो दिल्लीच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळण्यासाठी पैसे घेणार नाही. हा त्याचा स्वतःचा निर्णय आहे. गौतम असा व्यक्ती आहे ज्याच्यासाठी सन्मान मह्त्त्वाचा आहे, त्याला पैसे घ्यायची इच्छा नाहीये आणि हा त्याचा स्वतःचा निर्णय आहे. गंभीर किंग्ज इलेव्हन पंजाबविरूद्धच्या सामन्यानंतरच पायउतार होणार होता. एक खेळाडू म्हणून उर्वरित सामन्यांसाठी गंभीर उपलब्ध असेल मात्र, आयपीएल संपल्यानंतर तो आपल्या भविष्याबाबत निर्णय घेईन.” गोपनीयतेच्या अटीवर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वृत्तसंस्था पीटीआयने याबाबत वृत्त दिलंय.
दिल्लीच्या संघाला आपल्या ६ सामन्यांपैकी ५ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलाय. कर्णधार गंभीर केवळ ८५ धावाच करु शकला यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे. त्यामुळे गंभीरने अचानक दिल्लीच्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. श्रेयस अय्यर दिल्लीचा नवा कर्णधार असणार आहे.