Saturday, February 23

रंजन गोगोई देशाचे 46 वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली, देशाचे 46 वे सरन्यायाधीश म्हणून न्या. रंजन गोगोई यांची निवड करण्यात आली आहे. आज (ता.03) त्यांनी सरन्याधीशपदाची शपथ घेतली. गोगोई यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2019 पर्यंत असणार आहे. माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सप्टेंबरमध्ये गोगोई यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीशपदासाठी केली होती. त्यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिल्यानंतर कायदा मंत्रालयाने अधिसूचना जारी करत गोगोई यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले होते.
दीपक मिश्रा यांचा कार्यकाळ संपला असून बुधवार रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोगोई यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गोगोई यांचा कार्यकाल नोव्हेंबर 2019 पर्यंत असून त्यांना एकूण 13 महिन्यांचा कार्यकाळ असणार आहे.
न्या. रंजन गोगोई यांची बहुतांश कारकिर्द गुवाहाटी उच्च न्यायालयात गेली. त्यांची 2001 मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर 2010 मध्ये त्यांची पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. 23 एप्रिल 2012 पासून ते सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.