Saturday, February 23

यामुळे लग्नापूर्वी शारीरिक संबंधासाठी तयार होतात मुली

लग्नापूर्वी शारिरीक संबंध हा विषय अजूनही आपल्या समाजामध्ये सहज मान्य होईल असा नाही. पण तसे असले तरी तसे काही घडतच नाही असेही नाही. शहरांमधील लोकांची मानसिकता मोठ्या प्रमाणावर बदललेली पाहायला मिळते. तसेच नोकरी करणारे तरुण तरुणीदेखिल स्वतंत्र विचार करू लागले आहेत. त्यामुळे ही गोष्ट किमान शहरांमध्ये तरी अगदीच अमान्य अशी राहिलेली नाही. हळू हळू त्याचे प्रमाण वाढत असल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये समोर आले आहे. यामागे कारणे मात्र अनेक आहेत. आपल्या समाजामध्ये पुरुषांना किंवा मुलांना अशा गोष्टीसाठी थेट कोणी प्रश्न विचारत नाही. पण मुली मात्र तसे करू शकत नाही, अशी आपल्या समाजाची मानसिकता आहे. मुलींनी विवाहापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे म्हणजे तर अगदी गुन्हा मानला जावा असे असते. पण तरीही काही मुली तसे करतात, पण त्यामागची नेमकी कारणे काय असतात हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

प्रियकरासाठी, तो म्हणतो म्हणून – तरुणींनी लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवण्याचे हे सर्वात मोठे कारण म्हणायला हरकत नाही. प्रेमामध्ये जेव्हा प्रियकर प्रेयसीला शारिरीक संबधांबाबत विचारतो, तेव्हा अनेक तरुणी तो नाराज होऊ नये म्हणूनही त्याला सहजपणे होकार देतात. आपण जर नाही म्हटलो तर तो आपल्यासा सोडेल किंवा आपल्याबरोबर लग्न करणार नाही, अशा भितीपोटीही अनेक तरुणी विवाहापूर्वी शारिरीक संबंध ठेवायला तयार होतात.

शारिरीक आकर्षण – शारिरीक आकर्षण हे लग्नापूर्वी शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यामागचे एक मोठे कारण आहे. मुली जेव्हा वयात येत असतात त्यावेळी त्यांच्या मध्ये शारिरीक आकर्षणाची भावना मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असते. शरिरात होत असलेल्या हार्मोनल चेंज हे त्यामागचे एक मुख्य कारण असते. त्यामुळे अशा आकर्षणापोटी तरुणी या विवाहापूर्वी शारिरीक संबंथ प्रस्थापित करण्यास तयार होतात.

मुले करतात मग आम्ही का नाही – गेल्या काही दिवसांमध्ये हा विचार वेगाने वाढत आहे असे म्हणायला हरकत नाही. मुले कॉलेजमध्ये असताना किंवा सार्वजनिक जीवनातदेखिल त्यांना हवे तसे वागत असतात. त्यांना पाहून मुलींमध्येही बरोबरची भावना निर्माण होते. मुले जर सगळं काही करत असतील तर आम्ही कशासाठी मागे राहायचे, या विचारातूनदेखिल अनेक मुली विवाहापूर्वी शारिरीक संबंध ठेवण्याच्या विचारापर्यंत येतात.

इतर करतात म्हणून – अनेकदा अशा गोष्टी या मैत्रिणी किंवा इतर मुलींना पाहूनही करायला तयार होतात. आपण ज्या मैत्रिणींबरोबर रोज राहतो त्या जे काही करतात ते आपणही का करू नये, असे मुलींना वाटते, त्यामुळे इतर मैत्रिणींचे पाहूनही मुली विवाहापूर्वी शारिरीक संबंधास तयार होतात.

अनुभवासाठी – महाविद्यालयात शिकताना किंवा स्वतंत्र म्हणून काम करताना मुली अनुभव म्हणूनही विवाहापूर्वी शारिरीक संबंध ठेवायला तयार होतात. आजच्या काळात व्हर्जिनिटी किंवा अशा प्रकारच्या विषयावर मुलींची अगदी स्पष्ट मते तयार झालेली आहेत. त्यामुळे शारिरीक संबंधांचा अनुभव नेमका कसा असतो हे आजमावण्यासाठीही तरुणी यासाठी तयार होत असतात.

पैशासाठी, बळजबरी – पैसा हा व्यक्तीला काहीही करायला भाग पाडतो असे म्हटले जाते. बऱ्याच अंशी ते बरोबरही आहे. ही बाबही त्याला अपवाद नाही. पैसा मिळवण्यासाठी तरुणी विवाहापूर्वी शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यास तयार होतात. अनेकदा यात बळजबरीचा भागही असतो. आई वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी किंवा इतर कारणांनी दलालांच्या तावडीत अडकलेल्या तरुणी याचे उदाहरण आहे.

उत्सुकतेपोटी – मैत्रिणि किंवा मित्रांबरोबर अशा विषयावर चर्चा होत असेल आणि ते मित्र मैत्रीणी त्यांचे अनुभव सांगत असतील किंवा तसे काही असेल तर तरुणींमध्ये उत्सुकता निर्माण होते. त्या उत्सुकतेपोटी तरुणी हळू हळू लग्नापूर्वी शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यास तयार होतात.

वय आहे महत्त्वपूर्ण – एका सर्वेक्षणादरम्यान समोर आले की, पूर्वीच्या काळी 18-20 या वयामध्ये विवाह व्हायचे. आता हे वय 26-28 अगदी 30 पर्यंतही गेले आहे. अशा वेळी अनेकदा शारिरीक किंवा मानसिक गरजेपोटी तरुणी विवाहापूर्वी शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यास तयार होत असतात.

अचानक घडून आले – एखाद्या कार्यक्रमात किंवा पार्टीत काही ठरलेले नसताना अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरे जावे लागल्याचे काही वेळा समोर आले आहे. मित्रांबरोबर बोलताना किंवा मस्करी करताना सहजपणे एकमेकांबाबत भावना निर्माण होऊन, तरुण तरुणींमध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित होत असतात.

भितीही आहे कारणीभुत – तरुणींना भिती दाखवून धमकावून त्यांना बळजबरीने शारिरीक संबंध ठेवण्यास राजी करण्याचे अनेक प्रकार घडत असतात. यामागे अनेक प्रकारची कारणे असू शकतात, पण सामाजिक असुरक्षिततेपोटी अशी अनेक प्रकरणे समोरच येत नाहीत.