Tuesday, December 18

मोहम्मद कैफ सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्त

नवी दिल्ली, भारताचा फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफने आज सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने तब्बल 12 वर्षांपूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
योगायोगची गोष्ट म्हणजे २००२ साली झालेल्या ऐतिहासिक नॅटवेस्ट मालिकेला आज 16 वर्षे पूर्ण झाली. या मालिकेत इंग्लंडविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांनी दमदार खेळी करून भारताला विजय मिळवून दिला होता. कैफ नेहमी त्याने नॅटवेस्ट मालिकेत लॉर्ड्सवर केलेल्या 87 धावांसाठी लोकांच्या स्मरणात राहील. या मालिकेतील विजयानंतर गांगुलीने टी-शर्ट काढून विजय साजरा केला होता ज्याची देशभर फार चर्चा झाली होती.
या विजयाला आज 16 वर्षे पूर्ण होत असतानाच कैफने निवृत्तीची घोषणा केली. 37 वर्षीय कैफने 13 कसोटी आणि 125 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने बीसीसीआयचे अध्यक्ष सी के खन्ना आणि सचिव अमिताभ चौधरी यांना इमेलद्वारे निवृत्तीचा निर्णय कळवला. ”नेटवेस्ट मालिकेला आज 16 वर्षे पूर्ण होत आहेत, विजयी संघात असल्याचा मला फार आनंद आहे आणि म्हणूनच आज मी निवृत्तीची घोषणा करत आहे.” अये त्याने त्यात म्हटले आहे.