Saturday, February 23

मोदी भ्रष्टाचारात अडकले हे चांगलंच झालं : मसूद अझहर

इस्लामाबाद, राफेल विमान करारामधील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपावरून केंद्रातील मोदी सरकार सध्या अडचणीत आले आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारात अडकले, हे चांगलंच झालं, असे विधान जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याने केले आहे.
जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याने एक ऑडिओ टेप जारी केली आहे. या टेपमधून त्याने भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरगरळ ओकली आहे. तसेच जर पाकिस्तान सरकारने त्यांच्यावर लादलेले निर्बंध हटवले तर आपले काश्मिरी मुजाहिद्दीन भारताला योग्य धडा शिकवतील, अशी वल्गना त्याने केली आहे.
गेल्या काही काळापासून भारताकडून दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताने दहशतवादाविरोधात सक्त भूमिका घेतली आङे. त्यामुळे दहशतदवाद्यांचा तीळपापड झाला आहे. त्या संतापातूनच मसूद अझहरने भारताला धमकी दिली आहे.
पाकिस्तान सरकारने जर आमच्यावरील सर्व बंधने सहा महिन्यांसाठी शिथिल केली, तर आम्ही भारताला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ. भारत पाकिस्तानला वरवर धमक्या देतो. मात्र स्वत: भयाने ग्रासले आहे, असे मसूद अझहरने म्हटले आहे. तसेच  भारतातील एका शक्तीशाली लॉबीच्या दबावामुळेच पाकिस्तानी सरकार भारतासोबत चर्चा करते, असा आरोपही त्याने केला.
या ऑडिओ क्लिपमधून मसूद अझहरने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातही गरळ ओकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराच्या आरोपाड अडकले हे चांगलेच झाले. आता मोदींनी लष्करप्रमुखांना पुढे केले आहे. ते पाकिस्तानला धकम्या देत आहेत. मात्रा आम्हाला भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध नको आहे. आमचे मुजाहिद्दीन केवळ भारतालाच धडा शिकवत आहेत, अशी विधाने अझहरने केली आहेत.
पाकिस्तानने भूतकाळात केलेल्या चुकांमुळेच भारताचा आत्मविश्वास वाढला आहे, असेही त्याने म्हटले आहे.