Sunday, January 20

मोदींनी विकासाची स्वप्ने दाखवली मात्र, गांधी परिवाराने देशासाठी बलिदान दिलं : शरद पवार

नवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची स्वप्ने दाखवली मात्र, गांधी कुटुंबाने देशासाठी बलिदान दिले आहे, अशा शब्दांत राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
शरद पवार म्हणाले, सार्वजनिक सभांमध्ये मोदी नेहमी गांधी परिवारावर टीका करताना या कुटुंबाने या देशावर राज्य केले असे सांगत असतात. मात्र, स्वातंत्र्य लढ्यादरम्यान जवाहरलाल नेहरू अनेकदा तुरुंगात गेले होते. त्याचबरोबर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या करण्यात आल्याचे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांचे देशासाठी मोठे बलिदान दिले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना पवार म्हणाले, आपण विकासाची स्वप्ने दाखवली, मात्र आता तुमच्याकडे विकासाबाबत बोलण्यासाठी काहीही नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी एका कुटुंबावर बोलत असतात.